Ticker

10/recent/ticker-posts

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी

सध्या महाराष्ट्रातील दूधाचे ओघळ अहमदनगरबरोबरच औरंगाबादसांगलीसातारा या जिल्हयांतदेखील पोहोचले आहेत. दूधाच्या दरासोबतच त्यातील पाणीसुद्धा त्याच पटीने वाढत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेष म्हणजे दूध भेसळ ही उत्पादकांकडून होत नसून ज्या ठिकाणी दूध संकलन होते किंवा मोठया प्रमाणांत वितरीत होते तेथेच मोठया प्रमाणात होत आहे असे निदर्शनास येत आहे. खरेतर या भेसळ माफियांना  राजकिय वरदहस्त  असल्याशिवाय ते एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत. म्हणून दूध भेसळ रोखण्यास राजकीय इच्छाशक्तीची मोठया प्रमाणात गरज आहे. कारण भेसळ करताना आपण पकडलो गेलो तर एखादया पुढा-याच्या आशिर्वादाने आपली जामिनावर  सुटका होऊ. शकते. अशी पक्की खात्री असल्यानेच अशा गोरखधंद्याना प्रोत्साहन मिळते.

 

दूधामध्ये पाणी मिसळल्यावर त्याची स्निग्धता वाढविण्यासाठी त्यात युरिया, साखर, डिटर्जंट पावडर, कॉस्टिक सोडा यांचे मिश्रण घातले जाते. पूर्वी दूधात फक्त पाण्याची भेसळ होत होती. पण, आता तर रासायनिक पदार्थांचे मिश्रण तयार करून दूधासारखे द्रावण तयार केले जाते. असे भेसळयुक्त दूध इतके खरे वाटते की, ते सहजासहजी ओळखणे कठिण जाते. विशेष म्हणजे, ही कृत्रिम दूध बनविण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि लवकर होणारी असल्यामुळे ती सहज आणि स्वस्तात बनविली जाते खऱ्या दूधात अगदी बेमालूमपणे मिसळली जाते. असे रासायनिक, भेसळयुक्त दूध प्यायल्याने कॅन्सर होण्याची शक्‍यता मोठया प्रमाणात असते. तसेच युरियायुक्‍त दूधामुळे किडनी लिव्हर यांवर दुष्परिणाम होण्याची दाट शक्‍यता असते. विशेषतलहान मुले दूधाचे सेवन जास्त प्रमाणात करत असल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर तसेच आतडयांवर याचे घातक परिणाम होऊ शकतात.


दूधात प्रामुख्याने जास्त भेसळ होते ही पाण्याची, लॅक्टोम लीटरच्या साहाय्याने दूधाची घनता मोजल्यास पाण्याची भेसळ लगेच लक्षात येते. तसेच, दूधाची घनता वाढविण्यासाठी त्यात इतर पदार्थांची भेसळ झाली असल्यास अशा दूधात आयोडीन टाकल्यास दूध निळे होते.

 

दूधात साखरेची भेसळ असल्यास त्यात हायड्रोलिक आम्ल टाकल्यास दूधाचा रंग तांबडा होतो. दूधातील सोडयाची भेसळ ओळखायची असल्यास प्रथम त्यात अल्कोहोल मिसळावे नंतर दोन ते तीन थेंब रोझलिक अँसिड टाकावे. जर दूधाचा रंग लाल झाला तर त्वात धुण्याचा सोडा असतो करडा रंग झाल्यास त्यात खाण्याचा सोडा मिसळला आहे असे समजावे. भेसळ ओळखण्याच्या अशा अनेक पद्धती आहेत. परंतू असे गैरप्रकार आणि लोकांच्या आयुष्याशी होणारा खेळ पाहता अन्न प्रशासन खाते अस्तित्वात आहे असे जाणवतच नाही, या चाचण्या खास करून मोठमोठया डेअरी प्रयोगशाळेत करणे शक्य असल्याने वितरणाच्या वेळीं होणारी भेसळ जनसामान्यांना ओळखणे कठिण जाते.


गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय हा देशापुढील सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांचे पाठबळ  वेळोवेळी मिळत असल्यामुळे असे गुन्हेगार आणखी प्रबळ बनत चालले आहेत. त्यांचे धाडस वरचेवर वाढत असून एखादा अधिकारी अशा भेसळीचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्यास त्याला मारण्यासही ते मागेपुढे बघत नाहीत. भेसळ माफियांनी मांडलेला हा उच्छाद कोण आणि कसा थांबविणार असा प्रश्न सध्या प्रत्येकाला पडला आहे. पण, या साऱ्या प्रकाराला कंटाळून जर जनतेनेच मोठा उठाव केल्यास आश्‍चर्य वाटायला नको त्याचबरोबर हा भेसळीचा रोग मुळापासून उखडायचा असेल तर खरी गरज आहे ती त्याविरूद्ध सक्षम यंत्रणा उभारण्याची आणि कठोर कायदे करून ते अंमलात आणण्याची. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या