-दादासाहेब येंधे
थंडीमध्ये आपल्या त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणे गरजेचे असते. थंडीत केस रुक्ष, कोरडे आणि निस्तेज झालेले आपल्याला दिसून येतात. डोक्याची त्वचा कोरडी होते. केस गळणे, कोंडा होणे अशादेखील समस्या थंडीमध्ये दिसून येतात. ज्यांचे केस लांब आहेत अशा महिलांना तर केसांची जास्त काळजी घ्यावी. बाहेर जाताना कोरड्या हवेचा परिणाम केसांवर होतो. जर लग्नसमारंभामध्ये केस जर असे निस्तेज दिसले तर मूडच खराब होतो. थंडीमध्ये महिला केसांच्या त्रासामुळे अगदी हैराण होतात. अनेकदा त्यांच्यासाठी महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट देखील घेतल्या जातात. पण, थंडीत केसांसाठी अगदी घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय आपण करू शकतो.
१) तेलाने मालिश करा - थंडीमुळे केस कोरडे पडतात. त्यातच डोक्याची त्वचा कोरडी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तेलाने डोक्याची मालिश करणे गरजेचे आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते. थंडीत तेलाने मालिश केल्यामुळे केस तुटणे, गळणे किंवा कोरडे होण्याचा त्रास कमी होतो. खोबऱ्याचे तेल किंवा तुम्हाला जे तेल सूट होईल ते मालिश करण्यासाठी वापरू शकता.



४) कंडिशनिंग - थंडीमध्ये शाम्पू लावून केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका. केसांना कंडिशनर लावणं महत्त्वाच आहे. त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि रुक्ष होणार नाहीत. त्यातील ओलसरपणा तसाच टिकून राहील. थंडीत केस लवकर कोरडे पडतात. त्यामुळे केसांना कंडिशनर लावल्यानंतर ते रुक्ष होत नाहीत. थोड्या वेळाने कंडिशनर धुवून टाकावे. नेहमी चांगल्या प्रतिचाच कंडिशनर वापरावा.
५) भरपूर पाणी प्या - आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाला माहीत आहेच की, केसांच्या पोषणासाठीही पाणी पिणे गरजेचे आहे. व्यवस्थित आणि भरपूर पाणी पिल्याने केसांना योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळतं.




1 टिप्पण्या
खूप छान
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.