Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळ्यातही करा फॅशन

 पावसाळ्यात देखील फॅशन करू शकता

-दादासाहेब येंधे

पावसात चिंब भिजणं कोणाला आवडत नाही; पण, भिजल्यानंतर कपडे, केस खराब होतात. आपला सगळा मेकअप निघून जातो आणि हे आपल्याला मुळीच आवडत नाही. पण, काही काळजी करण्याचे कारण नाही. पावसाळ्यातही फॅशन करण्याच्या पद्धती आहेत. त्या जाणून घेऊया...


बाहेर मस्त पाऊस पडत असतो. आपण घरात घड्याळ बघत बघत सारख्या चकरा मारत असतो. जीव कासावीस होत असतो. ऑफिसला जायचं असतं. पण, पाऊस थांबण्याची चिन्ह मुळीच दिसत नाहीत. इतक्यात मुसळधार पावसात बाहेर पडायचं म्हणजे स्टेशनला जाईपर्यंत आपण पुर्ण भिजणार. मग, ट्रेनमधल्या किंवा बसच्या गर्दीत तसंच उभं राहावं लागणार. ऑफिसातही तसंच काम करत बसावं लागणार! या कल्पनेने आपण बेचैन होतो. हा अस्वस्थपणा असतो. तो आपण त्या दिवशी घातलेला चांगला ड्रेस पावसात खराब होणार म्हणून. चेहऱ्यावरचा मेकअप निघून जाणार, केस भिजणार इत्यादी...


पावसात बहुतेक करून असंच होणार, भिजायला होणार... असा दरवर्षीचा अनुभव असलेले लोक पावसात फार चांगल्या वस्तू वापरत नाहीत. पावसात काय करायचंय चांगले कपडे घालून, सगळं भिजायला होतं.  असं त्यांना वाटतं. पण पावसातही तुम्ही एका ताज्या तवान्या मूडमध्ये बाहेर पडावे यासाठी पावसाळ्यात करायच्या फॅशनच्या काही युक्त्या आहेत.


- पावसाळ्यात सफेद कपडे, लॉंग ब्राउझर्स किंवा लॉंग स्कर्टस यामध्ये आपण जरी प्रोफेशनल किंवा कम्फर्टेबल वाटत असलो तरी पावसाळ्यात हे वापरण्यात टाळावे. 

- सफेद रंगाचे कपडे ओले झाल्यास पारदर्शक होतात तसेच त्यांच्यावर डाग पडल्यास ते सहजासहजी धुतले जात नाहीत. त्याऐवजी पावसाच्या ढगाळ वातावरणाशी सुसंगत निळा, लाल किंवा नारंगी अशा रंगाचे कपडे वापरावेत. 

- लॉंग ट्राउजर्स आणि स्कर्ट हे पाण्यामध्ये भिजून खालच्या बाजूस खराब होतात. त्यामुळे आपल्या ऑफिस मधून परवानगी असेल तर पावसाळ्यात स्मार्ट फॉर्मल स्कर्ट वापरावा.

- पावसातील ओलसर व थंडगार हवेपासून संरक्षण म्हणून कोट किंवा जॅकेट असा पाश्चिमात्य पेहराव करू शकता.

- इंडियन पेहरावातील सलवार किंवा पटियाला वापरण्याऐवजी शॉर्ट कुर्तीज त्याच्याखाली चुडीदार किंवा लेगीज वापरता येईल. तसेच मोठया ओढणी ऐवजी स्कार्फ सांभाळण्यास सोपे असतात.

- पावसात भिजल्यानंतर काही कपड्यांचे रंग पसरतात तेव्हा मोठी प्रिंट असलेले कपडे शक्यतो टाळलेलेच बरे.

- चपला या चामड्याच्या नसाव्यात. कारण चामडं पाणी शोषून घेते आणि त्या ओल्या झाल्या की, लवकर सुकत नाहीत. त्याला पर्याय म्हणून जेली शूज, फ्लॅटस, फ्लोटर्स किंवा पावसाळी चपला वापरण्यास योग्य आहेत. व्यवस्थित मापाच्या चपला घ्याव्यात. कारण, सैल चपलांमुळे मागील बाजूस कपड्यांवर चिखल उडला जातो.


- दमट आणि ओलसर हवामानामुळे केस कुरळे होतात. केस ओलेच राहिले तर ते खराब होतात. म्हणून शक्यतो केस सुटे न ठेवता त्याचा पोनीटेल बांधा.

- पावसाच्या दिवसात मेकअप लाईट असावा. वॉटरप्रूफ काजळ आणि आय लाइनर लावावे. फाउंडेशनचा वापर कमी प्रमाणात करावा.

- आपली बॅग वॉटरप्रूफ असावी. नाहीतर बॅगेतील समान ओले होईल. पावसाळ्यात हेवी ज्वेलरी किंवा आर्टिफिशल ज्वेलरी वापरू नये.


आपल्याला आवडेल तशी फॅशन करा. पण, पावसाचा आनंद मनसोक्त लुटा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या