Ticker

10/recent/ticker-posts

वेळीच घेतली काळजी, तर टळेल पैदास कीटकांची

बंदिस्त जागेत ओलसरपणा आला की, अप्रिय किडे-मुंग्या, पाल,  कीटकांना आमंत्रण जाते...

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

समर्थ लवकर जावेत अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते; पण हे येण्याला काही प्रमाणात आपणच कारण असतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण घरात फार सामान गोळा करतो. असु दे, असु दे म्हणत निरुपयोगी वस्तू जमा होतो. त्यांना वर्षानुवर्षे हातही लावत नाही. तिथे अंधार असेल, हवा खेळती नसेल, खाचा-फटी असतील तर सहाजिकच कीटकांचं फावतं. घरात धूळ येऊ नये म्हणून काही माणसं खिडक्या, दारं शक्यतो बंद ठेवतात. याने धूळ येत नाही तसेच ताजी हवा, उजेडही येत नाही. वाहत्या हवेने ओलसरपणा, दमटपणा जातो. उलट बंदिस्त जागेत जाणारी ओलसरपणा आला की, या अप्रिय किडे-मुंग्या, कीटकांना आमंत्रण जाते. लाकूड थोडसं ओलं झालं की, थोडंसं मऊ होतं.  त्यात मुंगी आपली वारूळ करून राहतात. वारुळामध्ये त्यांची पैदास होते.


काही वेळा आपल्या आसपासच्या भिंतींना पोपडे निघतात. त्या पोपड्यांच्या आडही कीटकांची वस्ती होऊ शकते. घरात कुठूनही, थोडे पाणी येत असलं आणि त्याचा थेट  आपल्याला त्रास होत नसला तरी ते बंद करणे फार गरजेचे असते. घराच्या आसपासच्या वनस्पतींच्या फांद्या घराला चिटकता कामा नये. फांद्या चिटकून असल्या किंवा घरात येत असल्या की किडे- मुंग्यांना किंवा इतर कीटकांना छानपैकी 'एक्सप्रेस वे'च  तयार झाल्यासारखा वाटतो. 




कावळे चिमण्या यापेक्षा कबुतरांचा खूपच उपद्रव होतो. कबुतरे वातानुकूलित यंत्रणेच्या पृष्ठभागावर खिडक्यांच्या सज्जावर व घराच्या /इमारतीच्या वळचणीखाली जेथे जागा मिळेल तेथे बसतात. आपली पिसे टाकतात. विष्ठा टाकतात व आपली घरटी बांधतात. त्यामुळे अशा ठिकाणी माशा व अन्य कृमी कीटक यांची सतत वाढ होते व ते आरोग्यास धोकादायक आहे. तसेच कबुतरांच्या विष्ठा व गाळलेली पिसे यामुळे घराच्या, इमारतीच्या, कार्यालयीन व सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या इमारतीच्या बाहेर सौंदर्यास बाधा येते व महापुरुषांचे पुतळे विद्रूप करतात. तसेच बांधकामास धोका निर्माण करतात आणि अन्नधान्याच्या गोदामातील धान्याचा फडशा पाडतात व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करतात. भारतातील डॉक्टरांनी संशोधन करून असे सिद्ध केले आहे की, ज्या विभागातील घरे व कचेऱ्या यांच्या आसपास कबुतरे बसतात, विश्रांती घेतात किंवा घरटी बांधून राहतात, तेथील लोकांना श्वसनसंस्थेशी संबंधित विकार झालेले आढळतात. कबुतरांची घरटी त्यांनी गाळलेली पिसे व त्यांची विष्ठा यापासून निर्माण होणाऱ्या कृमी-कीटके व बुरशीमुळे त्या भागातील हवा दूषित होते व तेथे राहणारे तीच दूषित हवा श्वासाद्वारे शरीरात घेत राहिल्याने रोग उद्भवतात.

अशा उपद्रवी, हानिकारक व रोग पसरविणारे कीटक व प्राणी तसेच श्वसन संस्थेच्या गंभीर आजारांपासून व अन्य आरोग्यविषयक तक्रारिंचा प्रादुर्भाव वाढवणारे आणि अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ दूषित व नष्ट करणारे पक्षी या समस्येची अगदी सुरुवातीपासूनच जर आपण गांभीर्याने दखल घेतली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या वास्तूच्या नुकसानीस व तुमच्या आरोग्यास धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. आपल्या घराची स्वच्छता राखणे म्हणजे दररोज घरातील केरकचरा व जळमटे काढणे व पाण्याने फरशी साफ करणे असा सर्वसामान्य समज आहे. घरातील अतिसूक्ष्म जंतूंचा नायनाट करणे व उपद्रवी, हानीकारक व रोग पसरविणारे कीटक, प्राणी तसेच पक्षी यापासून राहत्या घराचे व घरांमधील मौल्यवान फर्निचरचे होणारे संभाव्य नुकसान व आपल्या आरोग्यविषयक तक्रारींचे आधुनिक प्रकारची सुरक्षित कीटकनाशके व तंत्रज्ञान यांचा तंत्रज्ञान यांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापर करून मुक्तता मिळवणे म्हणजेच कीटक निवारण किंवा पेस्ट कंट्रोल करून घेणे होय.




आपल्या घरातील पाळीव प्राणी देखील बाहेरून किडे, कृमी, कीटक घरात घेऊन येतात. कुत्र्यांच्या अंगावर गोचिडी बसतात.मांजरं घरात येत-जात असतात. त्यांच्या पंज्यांनी ते उंदीर पकडतात. त्यांच्या पंज्यांमधून कीटक घरात येतात. प्रत्येकवेळी कुत्र्यामांजराचे पाय धुवून त्यांना घरात घेऊ शकत नाही. पण, त्यांनी घरात कुठपर्यंत फिरावं, हे आपण ठरवू शकतो.  


या सर्व खबरदाऱ्या घेणं हे स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी गरजेचं आहे. एक मात्र नक्की, एकदा कीटक घरात शिरले की त्या ठिकाणी त्यांची पैदास वाढायला वेळ लागत नाही. बघता-बघता डासांच्या झुंडी, मुंग्यांची रांग, किड्यांच्या ओळी तयार होतात. तेव्हा त्यांचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच रोखला गेला पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या