Ticker

10/recent/ticker-posts

महिलांनी मोबाईल वापरताना काळजी घ्यावी

ऑनलाईन बँकिंग करताना एक चूकही महागात पडू शकते. याचे भान असू द्यावे...

-दादासाहेब येंधे

स्मार्टफोन अर्थात मोबाईल हे चैनीचे नव्हे तर  गरजेचे गॅझेट झाले आहे.  मोबाईल म्हणजे संगणकाचेच प्रतिकृती. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी माहितीची देवाण-घेवाण, सोशल मीडियाचा वापर ते ईमेल आदींसाठी संपर्काचे साधन म्हणून मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, हाच मोबाईल वापरताना आपण योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली नाही तर महिलांना काही कठीण परिणामांना सामोरे जाऊ लक्ष शकते. आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

व्यक्तिगत माहिती - आपले नाव, जन्मतारीख, लिंग, राहण्याचे ठिकाण, ईमेल आयडी, शाळेचे नाव, कामाचे ठिकाण आणि फोटो यासारखी व्यक्तिगत माहिती कोणाला द्यावी याबाबत नेहमी जागरूक राहावे.


सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना - आपले फोटो कोण बघू शकतील याबाबत जागृत रहा. सोशल मीडियावरील गोपनीयता सहजतेने जपली पाहिजे. तुम्हाला हव्या असलेल्या ठराविक लोकांनाच ती माहिती दिसेल हे खात्रीपूर्वक पहा.  ज्या मंडळींशी संपर्क नसावा असे वाटते त्यांना ब्लॉक करा.


पासवर्ड वेगवेगळे ठेवा - वेगवेगळ्या अकाउंट साठी वेगवेगळे पासवर्ड ठेवावे.  ते पासवर्ड अंदाजाने ओळखता येतील असे असू नये. त्यात स्मॉल, कॅपिटल, अक्षरे, अंक, चिन्हे असा पासवर्ड असावा. वेळोवेळी तुमचे इंटरनेट वरील कॉन्टॅक्ट तपासत राहावे.


हे शेअर करू नका - 

१) ऑनलाइन भेटला आहात त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाऊ नये. भेटणे गरजेचे असल्यास एखाद्या व्यक्तीला सोबत घ्यावे. सार्वजनिक ठिकाणीच भेटावे.


२) कोणाच्या तरी ओळखीचा मित्र-मैत्रीण म्हणून अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.


३) कोणत्याही आमिषाला बळी पडून व्यक्तिगत माहिती शेअर करू नका. पासवर्ड किंवा ओटीपी सारखी गोपनीय माहिती कधीही शेअर करू नका.


४) मोबाईल फोन नंबर, ईमेल आयडी आदी माहिती सोशल नेटवर्किंग साइटवर टाकू नका.


सध्या प्रत्येक जण घरात बसून बँकिंग व्यवहार करत आहे. या ऑनलाइन बँकिंगमुळे काही मिनिटांत आज अनेक हजारो रुपयांचे व्यवहार करत आहेत. मात्र, कधी-कधी ऑनलाईन बँकिंग करताना एक चूकही महागात पडू शकते. याचे भान असू द्यावे. सध्या आपल्या देशात अनेक फसवणूकीची प्रकरणे समोर येत आहेत. म्हणून आपण सावध राहिले पाहिजे.


५) अज्ञात लिंक वर क्लिक करू नका - बऱ्याच वेळा मला आमचा व्हाट्सअप किंवा मेल मध्ये अशा अनोळखी लिंक्स मिळतात. ज्याद्वारे असा दावा केला जातो की, त्यावर क्लिक करून तुम्ही बक्षीस किंवा रोख रक्कम मिळवू शकता. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लोभापाई अडकला तर तुम्ही बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण अशा कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नये.


६) व्हेरिफाय बँकिंग ॲप्सच डाऊनलोड करा - मोबाईल ऑनलाईन बँकिंग ॲक्सेस करण्यासाठी नेहमी संबंधित बँकेच्या एप्लीकेशनचाच वापर करा. प्ले स्टोर वरून बँकिंग ॲप्स डाऊनलोड करण्यापूर्वी ते नीट तपासा आणि व्हेरिफाय ॲप डाऊनलोड करा. कारण, अनेक बनावट एप्लीकेशन येथे सक्रिय आहेत. लॉगिन केल्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचते यानंतर तुम्ही काही मोठ्या फसवणुकीचे बळी पडू शकता.


७) ऑनलाइन बँकिंग पासवर्ड तयार करताना लक्षात ठेवा - ऑनलाइन बँकिंग मध्ये आपल्याकडे पासवर्डही असतो. ऑनलाईन बँकिंग मध्ये आपण पासवर्ड तयार करताना आपण तयार करत असलेल्या पासवर्डचा कोणीही सहज अंदाज लावू शकत नाही याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. विशेषतः तुमची जन्मतारीख, तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर कधीही बँकिंग पासवर्ड म्हणून वापरू नये. कारण, या प्रकारच्या पासवर्डचा सहज अंदाज लावला जातो. त्यानंतर तुम्ही बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता. 

(लेखक सिनियर क्राईम रिपोर्टर आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या