Ticker

10/recent/ticker-posts

पर्यावरण शिक्षण

५ जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. परंतु अजूनही पर्यावरण समतोलाचे गांभीर्य जनतेच्या लक्षात न आल्यामुळे पर्यावरण समतोलासाठी प्रभावी तोडगा निघू शकला नाही.


पर्यावरण हा सर्वाना सुपरिचित असाच विषय आहे. पर्यावरण व मानव यांचे अतूट असे नाते आहे. परंतु, वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. पर्यायाने मानव, वन्यप्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हणून पर्यावरण समतोल राखण्यासाठी पूर्ण जगभर प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण समतोल कायम राखण्यासाठी उपलब्ध भूक्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र हे वनांखाली असणे गरजेचे आहे. पण, बेसुमार जंगलतोडीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. १९७२ साली स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली. या परिषदेत मानवी जीवन व पर्यावरण या विषयावर चर्चा करून जगातील सर्व राष्ट्रांना भावी काळातील पर्यावरण असमतोलाच्या धोक्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच सर्व देशांना पर्यावरण समतोल राखण्याचे व पर्यावरण संरक्षणासाठी उपाय योजण्याचे आवाहन करण्यात आले.  तेव्हापासून ५ जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. परंतु अजूनही पर्यावरण समतोलाचे गांभीर्य जनतेच्या लक्षात न आल्यामुळे पर्यावरण समतोलासाठी प्रभावी तोडगा निघू शकला नाही.



भारत हा मूलतः कृषिप्रधान देश असल्याने इतर राष्ट्रंच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था व आरोग्यविषयक सुरक्षा ही संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. वाढत्या प्रदूषणाचा पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. झपाट्याने होणारी औद्योगिक प्रगती, यंत्रनिर्मित उत्पादन प्रक्रिया व यासाठी केली जाणारी भरमसाठ वृक्षतोड यामुळे जलप्रदूषण, वायूप्रदूषण आपल्याकडे झपाट्याने होत आहे. औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असला तरी सामूहिक जबाबदारीच्या अभावाने प्रदूषण समस्या संतुलित पर्यावरणातील अडसर झाली आहे. खऱ्या अर्थाने प्रदूषण ही समस्या मानवनिर्मितच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे प्रदूषणाला वृद्धींगत करणाऱ्या गोष्टींना व कृतीला विचारपूर्वक पायबंद घालणे गरजेचे आहे.


मूलभूत गरज

आजवर होत असलेल्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत ऐहिक व भौतिक सुखासाठी माणसाने वृक्ष, खनिज तेल, कोळसा यांसारख्या निसर्ग संपत्तीचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केला आहे. हवा, पाणी, अन्न, जमीन या अत्यावश्यक घटकांचे प्रदूषण केले असल्याने हवेत व पाण्यात असणारे भौतिक, रासायनिक व जीवशास्त्रीय गुणधर्म कमी होत चालले आहेत. यामुळे यात झालेल्या अहितकारक व अयोग्य बदलाचा परिणाम मानवी जीवन व औद्योगिक प्रगतीवर होत आहे. हवेत सोडलेल्या धुरातील कार्बन मोनोऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड व गंधयुक्त वायूमुळे वाहनातील जळालेल्या इंधनामुळे व धूप्रपानामुळे तसेच कारखान्यांतून हवेत सोडलेल्या विषारी घटकांमुळे वनस्पती व मानवी जीवितांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक व्यक्तीला शुद्ध हवा मिळणे ही एक मूलभूत गरज राहणार आहे. हवा प्रदूषणाचे पर्यावरणावर अर्थात, जीव सृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. वेळीच सावधगिरी बाळाणे ही सध्याच्या युगाची अनिवार्यता आहे. हवेतील प्रदूषणाला आळा बसण्यासाठी स्वयंचलित यंत्रणांचा वापर, वृक्षाचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे. किटकनाशके व तणावामुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबवणे आवश्यक आहे. जंगलतोड व घनकचऱ्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी होण्यासाठी घनकचऱ्याचे गरजेचे आहे. कारण पर्यावरणाचा ऱ्हास होत हवामानात बदल होऊन कमी होते. वातावरणाच्या वरच्या ओझोनचे प्रमाण कमी होऊन जमिनीची धूप होते. यासाठी खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे संतुलन राहण्यासाठी पृथ्वी ही वृक्षाने बहरून जाणे गरजेचे आहे. याकरिता मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून नवीन जंगलनिर्मिती झाली पाहिजे. वनीकरण खात्यामार्फत वनराईची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना वनस्पती तसेच वनांचे महत्त्व पटवून देण्याची नितांत गरज आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी व वनशेतीवर भर दिला तरच विविध अशा प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा समतोल ढासळणार नाही, नैसर्गिक वापर करून व मानव यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.


जलप्रदूषण नष्ट करावे

पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यात पाणी प्रदूषण हेही तितकेच जबाबदार आहे. पाणी म्हणजे जीवनच. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे हवेप्रमाणे निर्मळ पाणी पिण्यास व पिकांच्या निकोप वाढीसाठी मिळणे गरजेचे आहे. याच गरजेतून पाण्याचे प्रदूषण विरहित संवर्धन करणे मानवी आरोग्याच्या व जीवनसृष्टीच्या दृष्टीने हितावह आहे. कारखानदारीमुळे जलप्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. नदी, नाले, सरोवरात सोडले गेलेले प्रदूषित पाणी पिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे कॉलरा, टॉयफॉईंड, अतिसार अशा आजारांची लागण होते. यावर आळा बसण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यामध्ये जलप्रदूषण नष्ट करावे तसेच टूषित पाण्याचा वापर करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण याकडे लक्ष केंद्रित करावे. घनकचरा, सांडपाणी तसेच सेंद्रीय पदार्थ याचा वापर खत तयार करण्यासाठी करावा. शासनाने या संदर्भात वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक कायद्याचे काटेकोर पालन सर्व स्तरांवर होणे गरजेचे आहे. पाण्याचे साठे करणाऱ्या जलकुंभात क्लोरीनचा वापर करावा. त्यामुळे शुद्ध पाणी मिळेल. सागरी किनाऱ्यावर प्रदूषणाबाबत देखरेख करण्यासाठी समुद्रनिगा महामंडळ नियुक्त करण्याची गरज आहे. अशा विविध उपाययोजनांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली तर जलप्रदूषणाची समस्या दूर होण्यास निश्चितपणे मदत होईल.


समाजातील पर्यावरणप्रेमींनी प्रदूषणाचा विषय हाताळून तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्र यांद्रारे पर्यावरण शिक्षणाचा प्रसार लोकांपर्यंत नेला पाहिजे. नागरिकांमध्ये वृक्षलागवड, सामाजिक वनीकरणाचे “ महत्त्व पडीक जमिनीचा उपयोग,ऊर्जा निर्माण करण्यासाठी अपारंपरिक साधनांचा उपयोग, पर्यावरणातील लोकसंख्या वाढीचा परिणाम, प्रदुषण विरहित पर्यावरण निर्माण करण्याच्या कार्यामध्ये युवक व स्त्रियांचा महत्त्वाचा सहभाग व शासनाचे विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती असावी. पर्यावरण शिक्षण हाच पर्यावरण रक्षणासाठी योग्य असा उपाय आहे. पर्यावरण शिक्षण हा विषय शाळा, महाविद्यालयांतून सक्तीने शिकविला गेला पाहिजे. शिक्षण हे प्रभावी साधन आहे, त्यामुळे सद्य:काळातील व भविष्यातील पर्यावरण असमतोल कमी करण्यासाठी पर्यावरण शिक्षण आवश्यक आहे. आदिवासी व निरक्षरांना देखील पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या बोली भाषेतून त्यांना माहिती देण्याची व्यवस्था करून पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे मन वळविणे, सेवाभावी संस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा संस्थांनी जनतेमध्ये पर्यावरण समस्येविषयी जागृती घडवून आणण्यासाठी चर्चासत्रे, अभ्यास वर्ग आयोजित केले पाहिजे.


पर्यावरणाचा समतोल राखणे ही जनतेची चळवळ बनली पाहिजे. शाळा, देवालये, ग्रामपंचायत जमीन, खाजगी जमीन व सरकारी पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे व अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षण करणे पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर टाळणे यातूनच पर्यावरण संतुलित होऊन मानव व वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावरील संकट दूर होईल. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या