Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळ्यातील आजार दूर कसे ठेवावेत

निसर्गाच्या चक्राप्रमाणे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे त्रध्तुचक्र सारखे एकामागोमाग एक असे चालू असते. या तिन्ही ऋतुंनमध्ये आल्हाददायक ऋतू म्हणजे हिवाळा, तर आरोग्यास मारक ऋतू म्हणजे पावसाळा. उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यानंतर हलकासा पाऊस येणे म्हणजे मनाला तनाला प्रसन्नता लाभणे होय, मात्र हाच पावसाळा अनेक रोगांची उत्पत्ती करणारा असा आहे. पावसाळ्यात सर्वांनी खबरदारी घेतली तर प्रत्येकाला उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते


ऋतू बदलाच्या या काळात अनेक व्याधी उद्भवतात आणि म्हणूनच पावसाळा म्हणजे अनेक साथीच्या विकारांना निमंत्रणच. त्वचेचे विकार, टायफॉईड, मलेरिया, काविळ, जुलाब, कॉलरा, डोळे येणे, सर्दी, खोकला, आमवात, संधिवात यांसारखे आजारही त्यामुळे बळावतात. आर्द्रतायुक्त वातावरणात डास व माशांची झपाट्याने वाढ होते. डबक्यातले पाणी तसेच जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढीग ही तर या कीटकांची उत्पत्तीस्थानेच, तेव्हा वारंवार जंतुनाशकांचा वापर अपरिहार्य ठरतो. याकरिता परिसर स्वच्छ राखणं खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यात पाण्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. पोटाचे विविध प्रकारचे आजार दूषित पाण्यातून मोठ्या प्रमाणात होतात. नदी, ओढ्यांचे गढूळ पाणी, अतिशय घाणेरडे पाणी झिरपून विहिरी-तलावांत उतरते. तलाव धरणांत जमा होणारे पाणी अतिशय घाणेरडे दूणित असते. शहरातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज असते. पाईप फुटलेले असतात, नळांना तोट्या नसतात. अशा ठिकाणांहून हे घाणेरडे व अस्वच्छ पाणी पाईपांत जाते. दुसऱ्या दिवशी नळाला घाणेरडे पाणी येते हिवताप, मलेरिया, डेंग्यू पोटाचे आजार सुरू होतात. यासाठी पाईपांचे लिकेज काढणे आणि फुटलेले पाईप बदलणे गरजेचे आहे


या दिवसांत पायांच्या आणि नखांच्या स्वच्छतेची (विशेषत: लहान मुलांच्या) काळजी घ्यावयास हवी. साचलेल्या पाण्यात मुद्दामहून पाय बुडवत चालायला मुलांना खूप आवडते. तसेच चिखलात खेळताना माती नखात अडकून त्याद्वारे जंतू पोटात जाण्याची शक्‍यता असतेम्हणून बाहेरून घरात आल्यावर गरम पाण्यात मीठ घालून त्यात हात, पाय बुडवून स्वच्छ करावेत. तसेच पावसाळ्यात सर्वसाधारणपणे कोणत्या चपलांचा वापर केला जातो हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. जर बंद बूट वापरत असाल तर त्यात ओलावा टिकून राहिल्यामुळे पायाच्या बोटांमधल्या जागेत चिखल्या होण्याचा संभव असतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी साबणाचे कोमट पाणी घेऊन त्याने पाय धुवून स्वच्छ कोरडे करावेत. या काळात हलके पदार्थ आहारात असायला हवेत. मेथी, पडवळ, दुधी, पालक, सुरण, दोडकी, घोसाळी यांसारख्या भाज्या या दिवसांत बऱ्याच प्रमाणात येतात. तसेच टाकळा, कर्टुली, शेवळे यांसारख्या फक्त पावसाळ्यातच मिळणाऱ्या औषधी भाज्यांचा वापरही आहारात जरूर करावा. शिळे अन्न, उडदासारख्या पचांवयास जड  असलेल्या डाळी, मैद्याचे पदार्थ, थंड पेय, आईस्क्रीम, मिठाई यांसारख्या पदार्थांचा वापर टाळावा. जेणेकरून पचनशक्‍तीवर ताण येणार नाही.

 

शहरांच्या ठिकाणी मलेरियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. मुंबईसारख्या शीहरात सरकारी सोडाच पण खाजगी रुग्णालयेही मलेरियाच्या रुग्णांनी तुडूंब भरलेली असतात. परेल येथील केईएम रुग्णालयाने तर २०१० साली जागेअभावी रुग्णालयाच्या आवारात तंबू उभारले होते. मलेरिया हा ताप अँनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे पसरतो. सरकारला अपयश आले की, आपण सरकारच्या नावाने खडे फोडतो, पण सरकारबरोबरच या डासांची उत्पत्ती रोखायची जवाबदारी आपणा सर्वांची आहे हेदेखील विसरून चालणार नाही


अनोफिलीस डास हा अस्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. या अंड्यांपासून डास निर्माण व्हायला जवळ जवळ ते १० दिवस लागतात. डासांची उत्पत्ती रोखायची असेल तर काही उपाययोजना अमलांत आणणे जरूरीचे आहेम्हणजे घरातील पाण्याचे साठे झाकणाने पूर्णपणे बंद ठेवावेत, गच्चीवरील पाणीसाठ्याच्या टाक्या वेळच्या वेळी साफ करून त्यांची झाकणे बंद ठेवा, करवंट्या, टायर, बादल्या, बाटल्या यांचा नायनाट करावा, पाण्याच्या मोठ्या साठ्यात (विहिरी, कारंजे, डवकी) गप्पी मासे सोडावेत. कारण हे मासे डासांच्या अळ्या खातात. पावसाळ्यात डासांची पैदास रोखायची असेल तर घर, परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, तरच मलेरिया नियंत्रणात येईल,ग्रामीण भागातही विहिरींचे पाणी स्वच्छ असावे यासाठी विहिरीच्या पाण्यात जंतुनाशके टाकणे गरजेचे आहे. यावरील उपाय म्हणुन नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. बाजारात पाण्याच्या शुध्दिकरणाचे अनेक ड्रॉप्स मिळतात, त्याचा वापर करावा. पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थांवर खूप माशा इतर कीटक घोंघावत. असतात. हे कीटक घाणेरड्या जागेवरून येतात. त्यामुळे त्यांच्या पायाला जंतू असतात. उघड्यावरील पदार्थांचे सेवन केल्यास विविध आजार जडतात तसेच घरातील अन्नपदार्थ या काळात उघडे ठेवू नयेत. कारण पावसाळ्यात अन्नपदार्थावर बुरशी येते ते लवकर खराव होतात. यासाठी शिळे अन्न खाऊ नये आजारांना निमंत्रण देऊ नये.

 














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या