एखाद्या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्यावर दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याचा दबाव देखील असेल. जे तुम्हाला नियमितपणे बचत करायला भाग पाडेल. इतर गुंतवणूक बाबतही एक शिस्त असेल जे तुम्हाला नियमित बचतीसोबतच नियमितपणे गुंतवणूक करण्यात नेहमी प्रोत्साहित ठरेल. जितक्या लवकर तुम्ही बचत करायला सुरुवात कराल तितकी तुमची बचत जास्त होईल आणि तुम्हाला अधिक परतावा मिळेल.
महिला आपल्या संपत्तीबाबत किंवा पैशांबाबत खूप जागरूक नसतात. या बाबींना त्या पतीच्या वाट्याला येणारी जबाबदारी मानतात असे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण, महिलांनीही सजग आणि सक्रीय असले पाहिजे ते त्यांच्याबरोबर सर्वांच्या फायद्याचे ठरेल. खरंतर बचत हा इमारतीचा पाया आहे. ज्यावर भविष्याची भक्कम इमारत बांधली जाऊ शकते. पैशाच्या बाबतीत समजून घेण्याच्या दोन सर्वात महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. आधी बचत करा आणि मग गरजेनुसार त्याचा वापर करा.
बचत खाते उघडा - महिलांनो तुमच्या नावावर बँक खाते नसल्यास किंवा पतीसोबत संयुक्त खाते असल्यास तुम्ही लगेच कोणत्याही बँकेत वैयक्तिक बचत खाते उघडा. अनेक बँका महिलांसाठी विशेष बचत खर्चाची सुविधा देखील देतात. खात्यासोबतच ऑटो स्वीप सुविधा उपलब्ध असते. या सुविधेअंतर्गत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जास्त रक्कम आपोआप एफडी मध्ये रूपांतरित केली जाते आणि बचत खात्याच्या तुलनेत अधिक व्याज देखील तेथे मिळते. खात्यात किमान शिल्लक नसेल तेव्हा एफडी ची रक्कम बचत खात्यात आपोआप हस्तांतरित होते.
बचत गुंतविणे गरजेचे - फक्त बचत करणे पुरेसं नाही. तर बचत केल्यानंतर नियमित गुंतवणूक करणे देखील आवश्यक असते. बहुतांश महिला बचत करतात. पण, गुंतवणूक करीत नाहीत किंवा ही जबाबदारी पुरुष सदस्यांवर सोडली जाते. महिन्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. अनेक पद्धती जोखीम न घेता नफा देतात. उदाहरणार्थ आरडी, ईपीएफ, सुकन्या समृद्धी खाते, एसआयपी हे नेहमी ठेवींच्या स्वरूपात चांगले पर्याय असू शकतात. एसआयपी द्वारे म्युच्युअल फंड देखील चांगला पर्याय आहे. मात्र, त्यांचा जास्त अभ्यास करून गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
जर तुम्ही अशाप्रकारे एखाद्या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्यावर दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याचा दबाव देखील असेल. जे तुम्हाला नियमितपणे बचत करायला भाग पाडेल. इतर गुंतवणूक बाबतही एक शिस्त असेल जे तुम्हाला नियमित बचतीसोबतच नियमितपणे गुंतवणूक करण्यात नेहमी प्रोत्साहित ठरेल. जितक्या लवकर तुम्ही बचत करायला सुरुवात कराल तितकी तुमची बचत जास्त होईल आणि तुम्हाला अधिक परतावा मिळेल. विशेषतः त्या पर्यायांसाठी कालावधी खूप महत्त्वाचा आहे जेथे व्याज चक्रवाढ होते. जास्तीत जास्त फायद्यांसाठी नियमित बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा.
वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना महागड्या भेटवस्तू देणे, हा एक मोठा खर्च असतो. त्याऐवजी गुंतवणूक करताना थोडा समंजसपणा दाखवला तर लाभदायी ठरेल. जसे की, महिलांना घरासारख्या गुंतवणुकीत कर सवलत मिळते. हे लक्षात घेऊन आपल्याला अशी काही गुंतवणूक करायची असेल तर ती महिलेच्या नावावर करू शकता. भेटवस्तूमधून मिळणाऱ्या तात्कालीक आनंदापेक्षा अशी समंजस गुंतवणूक भविष्यासाठी फायद्याची ठरू शकते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.