-दादासाहेब येंधे
स्मार्टफोन अर्थात मोबाईल हे चैनीचे नव्हे तर गरजेचे गॅजेट बनले आहे. मोबाईल म्हणजे संगणकाचे प्रतिरूप. गृहिणींपासून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी माहितीची देवाण-घेवाण सोशल मीडियाचा वापर यापासून ते ईमेल आधीसाठीचे संपर्काचे साधन म्हणून मोबाईल महत्त्वाचे डिव्हाईस मानले गेले आहे. मात्र, हाच मोबाईल वापरताना आपण योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली नाही तर महिलांना काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- व्यक्तिगत माहिती- आपले नाव, जन्मतारीख, लिंग राहण्याचे ठिकाण, ईमेल आयडी, शाळेचे नाव, कामाचे ठिकाण आणि फोटो यासारखी व्यक्तिगत माहिती कोणाला द्यावी याबाबत नेहमी जागरूक राहावे.
- सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना - फोटो कोण बघू शकतील याबाबत जागरूक राहा. सोशल मीडियावरील गोपनीयता सहजतेने जपली पाहिजे. तुम्हाला हवे असलेल्या ठराविक लोकांनाच ती माहिती दिसेल हे खात्रीपूर्वक पहावे. ज्या मंडळींशी संपर्क नाही असे वाटते त्यांना ब्लॉक करून ठेवावे. कारण आपल्या ओळखीतलेच किंवा अनोळखी आपले फोटो मॉर्फ करून त्याचा वापर चुकीच्या ठिकाणी करून मुलींना, महिलांना ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेले आहे.
- व्हाट्सअप वर राहा सावधान- व्हाट्सअप चा वापर करताना सावध राहा व्हाट्सअप किंवा इतर मेसेज ॲप मधून मीडिया ऑटो डाउनलोड हे काढून टाकावे. तुमच्याशी अपरिचित व्यक्तीच्या संदर्भात तर हे टाळलेलेच बरे.
- पासवर्ड वेगवेगळे असावेत- वेगवेगळ्या अकाउंट साठी वेगवेगळे पासवर्ड ठेवावेत. हे पासवर्ड अंदाजाने ओळखता येतील असे असू नयेत. त्यात स्मॉल, कॅपिटल, अक्षरी अंक, चिन्हे असावीत. वेळोवेळी तुमचे इंटरनेटवरील कॉन्टॅक्ट देखील तपासात राहणे गरजेचे आहे.
हे शेअर करू नये...
१. ऑनलाईन भेटला आहात म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाऊ नये. भेटणे गरजेचे असल्यास एखाद्या व्यक्तीला सोबत घेऊन जावे आणि सार्वजनिक ठिकाणीच भेटावे.
२. कोणाच्यातरी ओळखीचा मित्र-मैत्रीण म्हणून अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट कधीही स्वीकारू नये.
३. काही आमिषाला बळी पडून व्यक्तिगत माहिती देऊ नका.
४. पासवर्ड किंवा ओटीपी सारखे गोपनीय माहिती शेअर करू नका.
५. मोबाईल फोन नंबर ईमेल आयडी आदी माहिती सोशल नेटवर्किंग साइटवर टाकू नका.
६. सायबर फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
Photo: google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.