Ticker

10/recent/ticker-posts

चला, चालायला लागा...

चालणं हे असं एक औषध आहे, की जे अनेक रोगांचा अचूक इलाज करतं

-दादासाहेब येंधे

आजच्या या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात जिमला किंवा घरी व्यायाम करायला वेळ कोणाला आहे? असं असलं तरी शरीराची जर योग्य हालचाल झाली नाही तर शरीर आकसून जाते, अकार्यक्षम होतं. अनेक रोगांना आमंत्रणही मिळतं. पण एक व्यायाम असा आहे की, जो करण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षकाची आवश्यकता नसते आणि कोणत्या साधनांचीही गरज नसते, तो व्यायाम म्हणजे चालणं. हे असं एक औषध आहे, की जे अनेक रोगांचा अचूक इलाज करतं.


आपल्या शरीरातील पेशींना मजबूत बनविण्यासाठी पायी चालणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सैल झालेल्या पेशी पुष्ट होण्यास मदत होते. तसेच शरीर तेजस्वी होऊन अनेक रोग नाहिसे होतात. ज्यांचे हात, पाय, टाचा, गुडघे दुखतात अशांसाठी पायी चालणं हा सर्वोत्तम उपाय आहे. जे लोक हृदयरोगी आहेत, त्यांच्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम आहे. त्यांनी सावकाश चालायला हवं. त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि हृदय चांगल्याप्रकारे काम करू लागते.


 महिनाभर चालून बघा

शारीरिक श्रमाच्या अभावमुळे लोक केवळ लठ्ठ होतात, एवढेच नव्हे तर अनेक रोगांच्या विळख्यातही अडकतात. अशावेळेस ते जेव्हा डॉक्टरकडे जातात, तेव्हा डॉक्टरही त्यांना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देतात. जे लोक लठ्ठुपणाचे शिकार बनतात, त्यांच्यासाठी चालण्यासारखा दुसरा सर्वोत्तम व्यायाम नाही.लठ्ठुपणा कमी करण्यासाठी डाएटिंगची नाही तर पायी चालण्याची आवश्यकता आहे. याउलट डाएटिंगचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. जर तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर एक महिना नियमित चालून बघा आणि स्वत:च फरक बघा.


लक्षात ठेवा, जर पचन संस्था व्यवस्थित कार्य करत नसेल तर शरीराच्या अन्य भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. चालण्याने खाल्लेल्या अन्नाचं पचन योग्य होतं. जे लोक भरपूर खातात आणि चालण्यात मात्र मागेपुढे पाहतात, त्यांना गॅस, अपचन, शरीर जड होणे, उत्साह न. वाटणे यांसारख्या समस्यांनाकसामोरं जावं लागतं. जर शरीरास अपायकारक असणारे पदार्थ बाहेर टाकले गेले नाहीत तर अनेक समस्या निर्माण होतात. चालण्याने शरीरातील पेशींची सक्रियता वाढते. घाम आणि लघवीद्वारे शरीरास अपायकारक असलेले घटक बाहेर टाकलेकजातात. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीरात अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो. यामुळे केवळ शरीराचीच नव्हे तर मेंदूची कार्यक्षमताही वाढते.


सर्वोत्कृष्ट व्यायाम

एकाच जागी बसून राहण्याने शरीर निष्क्रिय होते. परिणामी वजन वाढते, पायाच्या टाचा दुखायला लागतात. त्यासाठी चालणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठून चालण्याने शुद्ध हवेचाकअनुभव घेता येतो. जर तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालायला जाऊ शकता. पायी चालण्यामुळे शरीराद्वारेकइन्सुलिनचा परिणामकारक वापर केला जातो व त्यामुळे मधुमेहासंबंधीच्या समस्या नियंत्रित राहतात. संधीवातामुळे होणारी सांधेदुखी कमी करण्यासाठी पायी चालण्यामुळे मदतच होते. पायी चालण्यामुळे संताप, राग, चिडचिडेपणा, चिंता इत्यादी नकारात्मक भाव कमी होतात. चालण्यासाठी एक निश्चित ध्येय ठेवा. हे अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असावं.अर्धा किलोमीटरपेक्षा कमी नसावं. 


जर लोक पायी चालू लागले तर तन, मन, धनाने समृद्ध राहू शकतील. लक्षात ठेवा, पायी चालण्यासारखा मोफत सर्वोत्कृष्ट दुसरा कोणताच व्यायाम नाही. हा व्यायाम करून अबालवृद्ध स्वस्थ आणि निरोगी राहू शकतात, तर मग चलताय ना पहाटे-सकाळी चालायला, फिरायला, चालण्याचा आनंद घ्या. कदाचित चालण्याची गोडी निर्माण होऊन तुम्ही नेहमीसाठी चालण्याच्या, व्यायामाच्या प्रेमात पडाल. मग तुम्ही काय विचार केलाय... चला, चालायला लागा...


चालण्यासाठी खास टिप्स

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण त्यामध्येही काही नियमांचं पालन करायला हवं. तुमच्या खांद्याच्यामध्ये डोकं सरळ ठेवून सरळ दिशेने चाला. 

हात सरळ आणि खांढे ताठ ठेवून चालणं फायदेशीर ठरतं. 

चालताना पाय उचलून जमिनीवर ठेवा. 

पाय ठेवताना सर्वप्रथम तुमची टाच जमिनीला टेकवून नंतर टाचेपासून पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण पाय टेकवा. या पद्धतीने चाललात तर चालण्याचा त्रास होत नाही. 

चालणं हा सोपा व्यायाम आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी दररोज साधारण अर्धा तास चालण्याचं ध्येय निश्चित करा, जर तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं असेल तर कॅलरीज जाळण्यासाठी रोज एक तास चालणं अत्यंत गरजेचं आहे. 

चालल्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग करा. त्यामुळे आलेला शीण निघून जातो.   









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या