Ticker

10/recent/ticker-posts

लग्नसराईत हटके आऊटफिट ट्राय करा

-दादासाहेब येंधे

तुमच्या घरात किंवा एखाद्या नातेवाईकाचे  लग्न असेल तर त्या लग्नासाठी खरेदी करण्याची मजा काही औरच असते तुमच्याही घरी कुणाचं लग्न असेल आणि त्यासाठी तुम्हाला खास तयार व्हायचे असेल तर असे काही पॅटर्न निवडा जे तुम्हाला सहज परिधान करता येतील आणि ट्रेंडीसुद्धा दिसतील.

ब्लाऊजच्या ऐवजी क्रॉप टॉप एक बेस्ट चॉईस : तुम्ही कधीतरी एखाद्या समारंभाच्या वेळी पारंपरिक आऊटफिट्स परिधान करता त्यामुळे दुपट्टा सांभाळताना नकोसे वाटते आणि ते सहभाविकच आहे; पण जर तुम्हाला या त्रासापासून मुक्ती हवी असेल तर टिपिकल ब्लाऊजच्या जागी सुंदर अशा क्रॉप टॉपचा वापर तुम्ही करू शकता. क्रॉप टॉप लग्नसराईत एक बेस्ट चॉईस तुमच्यासाठी ठरू शकते.



हटके प्रिंटला म्हणा 'यस' : लक्षवेधक कलर कॉम्बिनेशन सोबतच फॅब्रिकवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटसुद्धा लग्नात वापरण्यासाठी एक सुंदर ऑप्शन ठरू शकते. सध्या फ्लोरल प्रिंट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण, जर तुम्ही फ्लोरल प्रिंट वापरून कंटाळला असाल तर जॉमेट्रिकल तसेच ॲबस्टेक्ट प्रिंट सुद्धा तुम्हाला पसंत पडू शकतात. फ्लोरल प्रिंटच्या घागरासोबतच नेटवाला दुपट्टा आणि प्लेन ब्लाउजचे कॉम्बिनेशन तुम्हाला हजारोंच्या गर्दीत शोभून दिसेल.



लेहंगा ऐवजी दुसरं काहीतरी ट्राय करा : पारंपारिक लूक लेहंगा वापरून मिळतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. लेहंगाऐवजी देखील अनेक पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जे परिधान करून तुम्ही हटके पारंपारिक लूक मिळवू शकता. सरारा, सलवार, सूट, अनारकली पासून प्लाझो, धोती, पॅन्ट सोबत आणखीही बरेच पर्याय आहेत जे तुम्ही लग्नसराईत वापरू शकता. 


लाल रंगाला म्हणा बाय-बाय : आपण जेव्हा पारंपारिक लूक किंवा पारंपरिक पोशाखाची गोष्ट करतो तेव्हा सर्वात पहिले डोळ्यासमोर येतात ती म्हणजे लाल रंगाची वस्त्रे. पण, यावेळी शक्य असल्यास लाल रंगापासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण की, लाल रंग हा नवरीसाठी राखीव कलर असतो. सध्या पेस्टल कलर लोकप्रिय ठरत आहेत. लग्नसराईत तुम्ही असे काहीतरी ट्राय करू शकता. 


आता पोशाखाला विसरून जा : लग्न प्रसंग असला की, धावपळ तर होणारच आणि धावपळ होत असताना जर तुम्ही महागातले कपडे परिधान केले असतील तर तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटणार नाहीत. आपल्या कामाव्यतिरिक्त जर खास व्यक्तीचं लग्न असेल तर ना-गाणं त्यामध्ये आलंच. तेव्हा अशा कपड्यांची पसंत करा जे वजनाला हलके असतील त्याचबरोबर त्या कपड्यांमुळे तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल. सध्या मिक्स मॅच आणि कॉन्ट्रास्ट खूपच लोकप्रिय आहे. तेही वापरून पहा. महागातले कपडे तुमच्या वॉर्डरोबची जागा अडवून ठेवतीलही आणि असे कपडे तुम्ही तुमच्या जवळचे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या लग्नात वापरू शकाल तेव्हा हलक्या वजनाचे पेहराव तुम्हाला उठून दिसत आणि ते कोणत्याही प्रसंगात वापरण्यास कामी येतील.




सदर लेख लावण्य माया या मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

photo: google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या