Ticker

10/recent/ticker-posts

मतदारराजा जागा राहा!

आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषद निवडणूका लागलीच होणार आहेत. मुंबईवर २० वर्षांपासून अधिक काळ सत्ताधारी असलेल्या  शिवसेना आणि भाजप या पक्षांबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सप, आरपीआय आदी पक्ष डोळा लावून बसले आहेत. आता मायानगरी असलेल्या मुंबईला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्यांचे हात शिवशिवत आहेत. मात्र, मतदार राजाने  यावेळी जागरुक असायला हवे. 


नेतेमंडळीच्या तोंडांच्या वाफांनी नव्हे, तर जागरूक मतदारांच्या प्रभावाने अच्छे दिन येण्याची किमान शक्यता तरी आहे, हे मतदारराजाने लक्षात घ्यायला हवे. आपल्या जगण्याच्या हक्कासाठी आवश्यक अगदी छोट्याछोट्या मागण्यांची तड लावणारा, आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा, केवळ मी, माझे घरदार आणि नातेवाईक एवढ्यापुरता मर्यादित न राहता समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणारा, अगदी तुमच्या- आमच्यातलावाटावा असा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे कर्तव्य पार पाडायला हवे.


लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी केलेल्या राज्याच्या संकल्पनेतून राष्ट्रीय पातळी, राज्य पातळी, जिल्हा पातळी व ग्रामीण पातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणूका पार पाडतात. वर्षानुवर्षे सत्तास्थानी राहिलेल्या राजकीय पक्षांशी नवे राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या स्पर्धा करताना दिसत आहेत. लोकशाहीची ही सगळी प्रक्रिया वरकरणी गमतीशीर वाटते. पण, प्रत्यक्षात अत्यंत गंभीर बाब म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्यावर देश विकासाचे दायित्व केवळ सत्तेसाठी त्यांच्या निष्ठा क्षणात बदलतात. तिकीटांसाठी पक्षबदलुंचे जणू पेवच फुटते. निवडणूक आल्या की उमेदवारी मिळविण्यासाठी यांची लगबग सुरू होते. काही वेळा पक्षाच्या संघटनात्मक निवडणूक होतात. या दोन्ही वेळेला राजकीय आणि वरिष्ठ नेते यांच्यावरील प्रेमाला, निष्टेला उधाण आलेले दिसून येते. मग, पक्षाचे चिन्ह, वरिष्ठांचे फोटो यासह होर्डिंग्ज जाहिराती, पत्रकबाजी यांनाही उधाण येते.


उमेदवारी मिळविण्यासाठी किंवा संघटनात्मक पद मिविण्यात यश आले नाही, तर एका क्षणात राजकीय पक्षांचे चिन्ह, वरिष्ठ नेत्यांचे फोटो बऱ्याचदा काढून टाकतात, तर कधी रस्त्यावर टाकले जातात, तर कधी कचराकुंडीत सापडतात. नाराज मंडळीची निष्ठा एका क्षणात नामशेष होते. व बऱ्याचदा दुसऱ्या क्षणाला ती पक्षाला, आघाड्यांना, गेलेली दिसते. राजकीय निष्ठेचा हा क्षणभंगुरपणा लोकशाहीत सामान्य अनाकलनीय ठरतो. जाणत्या मतदारांनी आपण आता राजा आहोत, याची पुरेपूर जाणीव ठेवून आपल्या माताधिकाराद्वारे अशा वेळोवेळी निष्ठा बदलणाऱ्या तथाकथित सत्ता स्पर्धेपासून दूर केलेलेच बरे. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारराजा जागा राहा, इतकेच सांगावेसे वाटते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या