Ticker

10/recent/ticker-posts

माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा...?

माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा ....?
-दादासाहेब येंधे  

इंटरनेटवरील आधारित जी माध्यमे आहेत, त्यासाठी ‘सोशल मिडीया’ किंवा ‘समाज माध्यमे’ हा शब्द वापरला जातो. फेसबुक, ट्वीटर, युटयुब अशा अनेक माध्यमांचा सोशल मिडीयात समावेश होतो. या माध्यमांत खरंच किती सामाजिकता आहे, की हे आभासी जग आहे, हा एक गहन प्रश्न आहे. 

समाज माध्यमांची ताकद लोकांना दरवेळी सत्ता हस्तगत करायची असते किंवा समीप राहायचे असते म्हणून वापरण्यात येते. यासाठी समाज जसजसा विकसित होत गेला, तसं तशी साधने विकसित होत गेली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माणूस जेव्हा शेती करत होता, तेव्हा कृषिप्रधान समाजाची निर्मिती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर समाज उद्योगप्रधान झाला. आता २१ व्या शतकातील आजचा समाज माहितीप्रधान समाज म्हणता येईल. कारण, माहितीला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व. ही माहिती आपल्याजवळ असणे किंवा या माहितीचे जलद गतीने हस्तांतरण करणे या गोश्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यातील बरीचशी माहिती ही सकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते. कारण, मुख्य प्रवाहातील मुद्रित आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांवर कुणाचे तरी वर्चस्व अथवा मालकी असते. त्यामुळे या माहितीवर हे वर्चस्व सतत डोकावत असते. समाज माध्यमांचे मुलभूत वैषिश्टय असे की, सामान्य माणसांकडे याची मालकी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एक वेगळे आभासी जग प्रत्येक जण तयार करत असतो. अतिषय वेगाने बातम्यांचे आदान-प्रदान या समाज माध्यमांतून होत असते. समाजात जे वेगवेगळे घटक आहेत. जसे - व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य-देष यांना सषक्त करण्याचे प्रयत्न या समाज माध्यमांतून होत आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकिय या सगळयाच दृश्टिकोनातून राश्ट्राला किंवा व्यक्तीला समृद्ध करण्याचे कार्य समाज माध्यमे करत आहेत. या सगळयात जाती, धर्म, लिंग, भाषा यांचा अडसर होत नाही हीच समाज माध्यमांची मोठी ताकद आहे.

सध्या माहितीचे आणि संदेशाचे वहन इतके जलदगतीने होत आहे की १ सेकंदापूर्वी, २ सेकंदापूर्वी काय घडले याच्या अपडेट्स ट्विटर किंवा फेसबुक किंवा व्हाॅटसअॅप यांसारख्या सोल साईट्सवरून त्वरित प्रसारित होत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेवहनाचे प्रमाण सध्या झटपट होताना दिसत आहे. स्वातंत्रयपूर्व काळापासून सुरू असलेल्या संदेषवहनाच्या प्रसारणाची जागा जरी फेसबुक, व्हाट्सअॅपने घेतली असली तरी देखील आजही पुरातन माध्यमांनी त्याच जोषात अजूनही तग धरला आहे. माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून वृत्तपत्र आणि माध्यमांची जागा फेसबुक आणि व्हाॅट्सअपने घेतली आहे. परंतु यामुळे मूळ पत्रकारिता आणि पत्रकारांच्या प्रतिमेला धोका पोहचला आहे. कारण आजकाल माध्यमं इतकी डोईजड झाली आहेत की, कोणीही पत्रकार होऊ कतो. फेसबुक, व्हाॅट्सअॅपमुळे बातमीची मूल्यं ढळली आहेत. कारण, काही वेळेस चुकीची माहिती प्रसारित होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे माध्यमं कधी-कधी घातक आहेत की काय असा सवाल पडल्याशिवाय राहत नाही. प्रसारमाध्यमं आज बाजारीकरणामुळे चुकीच्या बातम्या सादर करून वृत्तपत्राची विश्वासार्हता डळमळवू पाहत आहेत.

मात्र, अती तिथे माती असे जेव्हा आपण म्हणतो, तशी जणू परिस्थिती सध्या आपल्या समाज माध्यमांबद्दल दिसत असून, या माध्यमांच्या उणिवा समोर येत आहेत. या समाज माध्यमांवर खूप सारी माहिती येत असते. माहितीच्या स्पर्धेत खोटया माहितीचे प्रमाणही जास्त आहे. विषिश्ट विधान एखादया नेत्याच्या नावाने फोटोसहित पाठवले जाते. बऱ्याच वेळेला एकच विधान अनेक नेत्यांच्या नावे खपवले जाते. त्यामुळे माहितीच्या सत्यतेवर आणि विष्वासार्हतेवर प्रष्नचिन्ह निर्माण होते. या माध्यमांवर सातत्याने आषयनिर्मिती होत असते. बÚयाच वेळेला या आषयाचा निर्माता कोण आहे, हे सांगणेही अवघड होऊन जाते. या माध्यमांत खाजगीपणाचा अभाव असतो किंवा खाजगीपणाचा भंग पावतो. नुकत्याच झालेल्या केंब्रिज ऍनालिटिका करणामुळे ही गोश्ट समोर आलेली आहे. वेगवेगळे साॅफटवेअर वापरून माहितीत छेडछाड करून भ्रम आणि खोटी माहिती उगाचच पसरवली जाते. दोन समाजात तेढ निर्माण व्हायला समाज माध्यमांतील आषय कारणीभूत ठरतात. अषा या माध्यमांवर किती विष्वास ठेवायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या