Ticker

10/recent/ticker-posts

वारीच्या परंपरेचे महत्त्व

वारकऱ्याचे एकमेव ध्येय असते ते म्हणजे पंढरीतील चंद्रभागेत स्नान आणि विठुरायाचे डोळे भरून दर्शन. या ध्यासापोटी कोणताही वारकरी कधीच वारी चुकवत नाही. गेली अनेक वर्षे ही वारी परंपरा अशीच अविरत सुरू आहे. अनेक शतकांपासून जागतिक स्तरावर देखील या परंपरेवर अभ्यास सुरू आहे.

-दादासाहेब येंधे

आषाढ महिन्यातील एकादशी तिथी म्हणजे आषाढी एकादशी. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शेषशाही भगवान श्रीविष्णू शयन करतात आणि कार्तिक एकादशीला जागृत होतात. त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'देवशयनी आषाढी एकादशी' असे म्हणतात. हा दिवस धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून असंख्य वारकरी पंढरपुरात दाखल होतात. ज्याला पंढरीची वारी असे संबोधले जाते. गेली हजारो वर्षे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही वारीची परंपरा जपली जात आहे. जी सुमारे ८०० वर्षापेक्षाही जुनी असल्याचे सांगितले जाते.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|| कर कटावरी ठेवूनयां||

तुळशीचे हार गळां कासे पितांबर||आवडे निरंतर ते ची रूप||

मकरकुंडले तळपती श्रवणी|| कंठी कौस्तुभमणि विराजित||

तुका म्हणे माझें हेचि सर्व सुख ||पाहीन श्रीमुख आवडीने||

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल विठू नामाचा गजर करीत वारीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजतागायत जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी संपन्न होते. पण, पण, आषाढी एकादशीची वारी ही सर्वात मोठी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. यावेळी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहू मधून संत तुकारामांच्या पादुका पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यावेळी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरलेला दिसून येतो. देवाच्या दर्शनाची आस घेऊन ते अनवाणी पायाने भक्तीचा प्रवास करत असतात. चंद्रभागेत स्नान करून भगवंताचे दर्शन घेतात. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्यालाही विशेष महत्त्व आहे.




पायी चालत वारीची परंपरा अतिशय प्राचीन आहे. इतिहासात नमूद असल्याप्रमाणे तेराव्या शतकात ही परंपरा सुरू झाल्याचे अनेक उल्लेख आढळतात. ज्ञानदेवांच्या घराण्यातून पंढरीच्या वारीची परंपरा आल्याचे समजते. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत विविध जातीपातीच्या लोकांना एकत्रित आणले आणि भक्तीच्या मार्गावर नेले. वारकरी धर्म म्हणजेच भागवत धर्म. ज्याचे व्यापक स्वरूप एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी पुढे कायम राखले. प्रतिवर्षी एकादशीच्या निमित्ताने नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे हा नियमच झाला. ज्याला 'वारी परंपरा' म्हणतात आणि नियमित वारी करणाऱ्याला 'वारकरी' असे संबोधले जाते.


वारकऱ्याचे एकमेव ध्येय असते ते म्हणजे पंढरीतील चंद्रभागेत स्नान आणि विठुरायाचे डोळे भरून दर्शन. या ध्यासापोटी कोणताही वारकरी कधीच वारी चुकवत नाही. गेली अनेक वर्षे ही वारी परंपरा अशीच अविरत सुरू आहे. अनेक शतकांपासून जागतिक स्तरावर देखील या परंपरेवर अभ्यास सुरू आहे.


वारी ही आपल्या संस्कृती परंपरा आणि मूल्यांच्या जतन करणारी जीवनशैली आहे. संतांनी अभंग ओव्या आणि ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून मराठी भाषा साहित्य आणि संगीताचा अमूल्य ठेवा जपला. व्यसनमुक्ती, शाकाहार, सदाचरण आणि नैतिकतेला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे चारित्र्यसंपन्न समाज घडविण्याचे कार्य ही वारी करत आहे.


वारीत हजारो दिंड्या सहभागी होतात मार्गात अन्नदान पाणी वाटप आरोग्य शिबीर वस्त्रदान आणि विविध सेवाकार यांनी स्वार्थ भावनेने केली जातात. त्यामुळे परोपकाराचे संस्कृती अधिक बळकट होते. आषाढी वारी हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक समतेचा आणि समाजप्रबोधनाचा भक्कम पाया आहे. अलीकडच्या काळात हरित वारी स्वच्छ वारी या संकल्पनेलाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल वर बंदी घालून पर्यावरणपूरक पत्रावळी, द्रोण आणि साहित्याचा वापर केला जातो पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान देखील राबवले जाते. ओला, सुखा कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन, वृक्षारोपण स्वच्छ पाणी, अन्नाचे नासाडी टाळणे आणि पर्यावरण पूरक अन्नदान यासारख्या उपक्रमातून वारी पर्यावरण संवर्धनाचा एक संदेश समाजाला देते.

आजच्या धकाधकीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणही मोठ्या प्रमाणात वारीकडे आकर्षित होताना दिसत नाही मानसिक शांतता सकारात्मक ऊर्जा शिस्त आणि अध्यात्मिक समाधानाच्या शोधात अनेक आयटी क्षेत्रातील तरुण स्वतःच्या दिंड्या घेऊन वारीत सहभागी होताना दिसून येत आहे त्यामुळे वारीही आधुनिक पिढीसाठी ही प्रेरणेचा स्त्रोत ठरत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वारे ही मानवी मूल्यांची जिवंत प्रयोगशाळा आहे मानवता निस्वार्थ सेवा प्रेम सहकार्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वारी निस्वार्थ जातृत्व व सहिष्णुतीचे एक जिवंत उदाहरणच म्हणावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या