Ticker

10/recent/ticker-posts

आशा भोसले : एक सुरांची बाग उजाड झाली...

गोमु संगतीनं', 'जांभूळ पिकल्या झाडाखाली', 'रुपेरी झाडांच्या माडाच्या  बनात ये ना.., 'धुंद कळी', 'या रावजी बसा भावोजी', आणि 'एक झोका काळजाचा ठोका...' ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर रेंगाळतात.

-दादासाहेब येंधे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले या वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) कार्डिॲक अरेस्ट नंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली आहे. आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशी झुंज देत होत्या.  'मल्टी ऑरगन फेल्युअर' मुळे त्यांचं (१२ एप्रिल २०२६ रोजी) निधन झालं.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. 'तोरा मन दर्पण कहलाए' भावपूर्ण गाण्यापासून 'खल्लास' अनेकांची गाणी लीलया गाणाऱ्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकार गायन करताना आपला ठसा उमटवला.

मराठी, हिंदी, बांगलासह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२,००० वर गाणी त्यांनी गायली. 'महाराष्ट्र भूषण' तसेच 'बांगला विभूषण' पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. अशी अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही.


८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी १९४३ मध्ये १० व्या वर्ष गायनाला बडबड केली होती. वयाच्या ९० व्या व्या वर्षी ते गायन सुरूच होतं. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसह कलाकारांसोबत त्यांनी काम केले. रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंत अनेक गायकांसोबत त्यांनी गाणी गायली होती. उस्ताद अली अकबर खान यांच्या १९९५ मध्ये एका अल्बमसाठी त्यांना नामांकन केलेलं होतं.

“पिया तू तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया तुमने”, “ये मेरा दिल” त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. विशेषतः आर डी बर्मन यांच्या सोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासातील एक सर्वात यशस्वी जोडी  ठरली.

आशा भोसले यांच्या सुरेल आवाजाने मराठी संगीतविश्वाला अनेक अजरामर गाणी आहेत. 'गोमू संगतीनं' पासून 'एक झोका.. चुके काळजाचा  ठोका'पर्यंत त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेम, निसर्ग आणि निसर्ग लोकसंस्कृती सुंदर चित्रण, समूहही झुकेत गाणी आज तिकीच लोकप्रिय आहेत.

मराठी संगीतसृष्टीत आपल्या अद्वितीय आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजव संपूर्ण आशा भोसले यांनी अनेक अजरामर मराठी गाणी दिली आहेत. भावगीत, सुगम संगीत आणि क्षेत्रगीत त्यांच्या विविध भावछटा प्रभावीपणे साकारल्या आहेत.

भावगीतांच्या प्रदेशात 'केव्हा तरी पहाटे', 'अरे खोप्यामधी खोपा', 'अशीच अवश्य भेटून जा', 'अजि मी ब्रह्म पाहिले' आणि 'अत्तराचा फाया तुम्ही मला' यासारख्या गीतांनी श्रोत्यांना एक वेगळ्या भावविश्वाची अनुभूती दिली. या गाण्याशी संबंधित त्यांच्या आवाजातील कोमलता, भावनांची खोली आणि शब्दांशी साधलेलं नातं स्पष्ट दिसून येतं.


तर मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अनेक गाजलेली गाणी दिली आहेत. 'गोमु संगतीनं', 'जांभूळ पिकल्या झाडाखाली', 'रुपेरी झाडीत माडांच्या बनात ये ना..', 'धुंद कळी', 'या रावजी बसा भाऊजी' आणि 'एक झोका काळेचा ठोका' ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर रेंगाळतात.


आशा भोसले यांच्या गायकीची खासियत म्हणजे प्रत्येक गाण्याच्या भावनेनुसार त्यांचा आवाज रंगवला. त्यांच्या गाण्यांमध्ये कधी विरह, कधी प्रेम, तर कधी उत्साहाची झलक अनुभव. त्यांचे आपल्यातून निघून जाणे म्हणजे एक सुरांची बाग उजाड झाली आहे असेच म्हणावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या