Ticker

10/recent/ticker-posts

व्यसनांच्या दुकानदारीला लगाम घाला

सध्या कुटुंब व्यवस्थाच व्यसनापांयी कशी गुदमरते आहे याची अनेक उदाहरणे आपल्याला पावलोपावली पाहावयास मिळत आहेत. कारण आपले सरकार व्यसनांची संख्या आणि दुकानदारी कमी करण्याऐवजी त्यात आणखी भर घालत आहे. आधीच गुटख्याच्या व्यसनाने अनेक तरूणांचे गळे भरलेले आहेत. त्यातच बीअरबार आणि डान्सबार प्रकरणांनी घरेच्या घरे उदध्वस्त केली. यात आणखी भर म्हणून की काय नाक्‍या-नाक्यांवर उघडलेल्या हुक्का पार्लरने पुन्हा कुटुंबव्यवस्थेला घरघर लावली. भारतात तरुणांची संख्या जास्त प्रमाणात आहे. 


अशावेळी या तरूणांना जपण्याची मोठी जबाबदारी सरकारची आणि समाजावर येऊन ठेपते. मुंबईत अशा प्रकारच्या हुक्का पार्लर्समुळे विनाकारण तरुण पिढी, एका नव्या व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे. बराच आरडाओरडा झाल्यानंतर महापालिकेने या हुक्का पार्लर्सना परवानगी नाकारली आणि बरेचसे बंदही केले. परंतु हुक्का पार्लरवाल्यांनी चोरी-चोरी, छुपके-छुपके मागच्या. दाराने प्रवेश देऊन अनेक ठिकाणी आपली दुकाने पुन्हा चालू केली आहेत. खिशामध्ये पैसा नसतानाही आई-बापाच्या जिवावर ऐश करण्याची अनेक तरुणांची सवय असते. पैशाचा चुराडा करून आयुष्याचाही धुराडा हे लोक करून घेतात


ज्या गुटख्याच्या व्यसनामुळे आज संपूर्ण तरुण पिढी बरबाद होत आहे. एकाच वेळेला दोन दोन वेगवेगळ्या गुटख्यांच्या पुडया तोंडांत टाकून मेंदूला झिंग आणली जाते. परंतु या गुटख्यांमुळे तोंडाचा कॅन्सर होतो हे या तरुणांना पटवून देण्याची गरज आहे. गुटखा, पान मसाल्याने अलीकडच्या पाच-दहा, वर्षांमध्ये तरूण पिढीमध्ये, एक क्रेझ निर्माण केली आहे. गुटखा खाणे म्हणजे एक वेगळे 'स्टॅंडर्ड' आहे, असा समज तरुणांमध्ये रूढ झाला आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गुटखा ही चीज कुणाला माहितही नव्हती. त्यावेळी फक्त तंबाखूच खाल्ली जात होती. कालांतराने प्रथम वैशाली बार, सुगंधी गुटखा बाजारात आला, खेडेगावातील शाळकरी मुलांनी तर सुगंधी स्वाद असलेल्या या वैशाली नामक गुटख्याची / सुगंधी सुपारीची वर्गणी काढून चव घेतली. मसाला बार नावाचा गुटखा आलात्यानंतर विविध गुटखा कंपन्यांनी  व्यसनाधीन तरुणांची वाढती संख्या हेरून आपापले प्रॉडक्ट बाजारात आणण्यास सुरुवात केली. मग मसाला बारसुगंधी सुपारी/गुटखा आला या बारनंतर युवकांना किमाम एकशेवीस-तीनशे तंबाखूचे व्यसन जडले. हळूहुळू मग तंबाखूची सवय जडली. तंबाखू सोडत मग साधा पानमसाला खायला. प्रारंभ झाला


यानंतर १२०- ३०० बारची सवय जडली. आता तर या गुटख्याची सवय इतकी लागली आहे की, मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग गुटखा सेवन करीत आहे. तरूण वर्गच नव्हे तर महिलादेखील गुटख्याच्या आहारी गेल्या आहेत. अशा गुटखा, शौकिनांमुळे सार्वजनिक रस्ते, सिनेमागृहे, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, रेल्वे  स्थानक, बसस्टँड आदी ठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याने रंगलेला परिसर तसेच अस्ताव्यस्त गुटख्यांच्या पुडया पडलेल्या आढळतात. ज्यांना अशा व्यसनांची सवय नाही त्याना सार्वजनिक ठिंकाणी सभ्यपणाने वावरण्याची बंदी असल्यासारखे चित्र दिसून येत आहे


तरुण वय हे दुधारी शस्त्रासारखे असते. ते योग्य, रितीने सांभाळले गेले पाहिजे. वाईट गोष्टींचा समाजामध्ये इतका भडीमार होत आहे की, चांगल्या गोष्टींकडे तरुणांचे लक्ष जातचं नाही. अशा या बिकट परिस्थितीत भारताकडे असलेल्या या युवा शक्‍तीला विधायकतेकडे नेण्याचे मोठे प्रयत्न करावे लागतील, गुटखा तसेच हुक्का पार्लरला परवानगी देणारे सरकार घरभेदीपणा करीत आहे. आज हुक्क्याच्या व्यसनामुळे जर अख्खे कुटुंबच आचके द्यायला लागले आणि गुटख्यामुळे कॅन्सर रोगी वाढले तर उद्या हीच समस्या उग्र रूप धारण करील आणि तरुण वर्ग पोखरून काढील म्हणून सरकारने ताबडतोब तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी करणा-या गुटखा आणि हुक्का पार्लर या व्यसनांच्या दुकानदारीवरच बंदी घालण्याची -या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. ती प्रत्यक्षात आली तर खरोखरच गुटखा आणि हुक्कामुक्त अन व्यसनमुक्त तरुण पिढी निर्माण होईल.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या