मी आत्महत्या केली म्हणजे महान कुणीतरी होईल अशी फाजील भावना मनातून काढून टाका...
जगभरात भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून गणले जाते. परंतु सध्या दररोज वर्तमानपत्र हातात घेतले की, त्यात प्रथम अमुक-अमुक ठिकाणच्या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तर कुणी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली असे वाचावयास मिळते.
२००९ च्या अखेरीस जो आकडा हजारांच्या आसपास होता तोच, डिसेंबर २०१०१ पर्यंत लाखांत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सुजलाम् सुफलाम् म्हणून शेतकर्यांच्या जीवावर बढाया मारणार्या भारत देशात ४० हजार शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसावी. खरेतर व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या आधुनिक समाजात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आढळून येतो, परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नैतिक मूल्यांचा र्हास होऊन सामाजिक विघटनाला चालना मिळते आणि असे विघटन आत्महत्येचे मूलभूत कारण ठरते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्येच आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, हे पुरुष शेतकर्यांच्या आत्महत्येवरून समोर येत आहे. मागचा-पुढचा विचार न करता शेतकरी बांधव बिनधास्त आत्महत्या करतात. आत्महत्येची कारणेही अनेक असतात. उदा. वयात आलेल्या मुला-मुलींची लग्ने, आजारपण, दुष्काळ तसेच शेती व्यवसायात नुकसान झाले की शेतकरी कर्ज काढतो. ते कर्ज फेडणे शक्य झाले नाही तर तो बोजा वाढत जाऊन शेतकरी कर्जबाजारी होतो आणि मग हाच शेतकरी आत्महत्या करून साक्षात मृत्यूला कवटाळतो. त्याचे वृद्ध आई-वडील त्याच्यावर अवलंबून असलेली त्याची लहान मुले, माऊ- बहीण या कोणाचाही विचार न करता शेतकरी आत्महत्या करतात व त्यानंतर त्या संसाराचा डोलारा त्याच्या विधवा बायकोवर येऊन पडतो.
पदरात
कोवळी मुले, म्हातारे सासू-सासरे असताना
ती माऊली आत्महत्या करत नाही तर
ती परिस्थितीशी झगडत राहते. शेतकरी
बांधवांनो! इतर सर्वजण जगण्यासाठी
धडपडत असतातच ना? मग त्यांच्याप्रमाणे
तुम्हीही शेतीबरोबर इतर उद्योग (उदा,
इमूपालन, कुक्कट उद्योग) करा. मी आत्महत्या
केली म्हणजे महान कुणीतरी होईल अशी फाजील
भावना मनातून काढून टाका.
संकटाला
घाबरण्यापेक्षा सामोरे जा व त्या
संकटालाच तुम्ही तुमचा आत्मविश्वास दाखवून द्या. तुम्हाला वाटते की, आत्महत्या केली
म्हणजे आपण सुटलो एकदाचे नाही का? या जबाबदारीतून सरकारकडून आपल्या कुटुंबियांना पैसे मिळतील व
ते ऐश आरामात पुढचे आयुष्य
जगतील. पण असे प्रत्यक्षात
घडतं का? आणि अशी
मदत जरी मिळाली तरी किती असणार
आणि ती किती दिवस
पुरणार? आजपर्यंत
झालेल्या आत्महत्येवरून हेच समोर येत
आहे की, ज्या शेतकर्यांनी आत्महत्या
केल्या त्यांचे प्रश्न आत्महत्या करून सुटले का? त्यांचे कुटुंब
सुखी आहे का? त्याकरिता
आत्महत्या करण्याआधी
स्वहितापेक्षा कुटुंबियांचा विचार श्रेष्ठ माना!
सध्याच्या
काळात शेतकर्यांच्या मतांवर निवडून जाणारे लोकप्रतिनिधी शेतकर्यांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेताना दिसत नाही. शेतीचे प्रश्न, शेती मालाला योग्य
भाव न मिळणे, शासनाची
अकार्यक्षमता यापेक्षा ग्रामपंचायतीची निवडणूक या प्रश्नांना गावोगावी लोकप्रतिनिधी
अवास्तव महत्त्व देताना दिसतात. जागतिकोकरणाच्या
बदलत्या वातावरणात शेतीच्या प्रश्नांचा अभ्यास करणारे कितीजण आहेत? स्वपक्षीय मर्यादांच्या
पलीकडे डोकावून शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे संघर्ष करणारे किती जण आहेत
याचा विचार करण्याची वेळ आज शेतकर्यांवर येऊन ठेपली आहे किंबहुना शेतकर्यांनी तसा
विचार करायलाच हवा.
देशाच्या कृषीमंत्र्याला
क्रिकेटपासून फुरसत नाही. शेतकर्यांनी अपुरे वीज, पाणी यांच्याशिवाय जगावे तर कसे हेच
कळत नाही? योग्य असे कृषीधोरण नाही. केंद्र सरकार पेरण्या उरकल्यानंतर कर्जवाटपांची
योजना जाहीर करते. असे वेळ निघून गेल्यावर आलेले कर्ज कोण घेणार? आत्महत्या केलेले
शेतकरी सुटतात एकदाचे, पण राहिलेले सुपात आहेत. ७० टक्के शेतकऱ्यांकडे पाच एकपक्षा
कमी जमीन आहे. कांदा-बटाटा, केळी, बीटी कापूस, भुईमूग, सोयाबीन, ऊस असे काहीही पेरले
तरी शेतकर्यांची शेती फायद्यात यायला तयार नाही. सरकार एक संवेदनशील
व जबाबदार नेतृत्व म्हणून शेतकर्यांचा अजूनही विचार करताना दिसून येत नाही. आणखी किती बळी, आत्महत्या या सरकारला हव्या आहेत?
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.