Ticker

10/recent/ticker-posts

योगाने साधा मनःशांती

उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राॅल आणि लठठपणा यांसारख्या समस्येवर योगा हा उपाय आहे. 
-दादासाहेब येंधे 

आरोग्यतज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यांसारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याचबरोबर तणावासंबंधित हाॅर्नाेमल नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. हे आता सिद्ध होत आहे.


उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राॅल आणि लठठपणा यांसारख्या समस्येवर योगा हा उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे. असे तज्ञांचे मत आहे. एखादा रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक औषधे खावीत की योगा करावा अशा द्विधा मनःस्थितीत असतात. पण, लोकांनी हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. बऱ्याच जणांना रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर योगा हा एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.


शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे ‘प्राणायम’ प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वास लांबविण्याची क्रिया. जास्तीत जास्त श्वास लांबविणे म्हणजेच श्वासावर नियंत्रण आणणे होय. प्राण म्हणजे वायू. अर्थात, प्राणाची व्याप्ती मोठी म्हणून त्याचा अर्थ प्राणशक्ती होय. प्राणशक्तीचा संबंध मनाशी येतो. मनाचा संबंध हा बुद्धीशी येतो. बुद्धीचा संबंध आत्म्याशी येतो व आत्म्याचा संबंध हा परमात्म्याशी येत असतो. प्राणायाम म्हणजे लयबद्ध पद्धतीने केलेले श्वसन.


७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गतः चालते. प्राणायाम करणारे रागलोभविरहीत, सदैव प्रसन्न असणारे, शरीर व मनाने पवित्र जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पदमासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावीत. त्यामुळे शरीरातल्या नाडया मृदू बनतात. ही आसने दोनदोन वा तीनतीन तास एकाठिकाणी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला हवा. प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार वारा वेगाने वाहणारा नसावा. यासाठीच उघडया जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार हवेमुळे घाम वाळविला जातो. रंध्राबाहेर तो येत नाही. असं होण अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की.


प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगग्रंथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ आहे कुणाकडे? तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासाकडून मार्गदर्शन  घेत राहावे.


दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनी सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अतिकष्ट  झाले असल्यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुफफुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाऱ्यांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका ठेवावा. जड पदार्थ टाळावेत. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवन करू नये. सात्विक आहार म्हणजे वरण-चपाती, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावेत.



पालघर येथे पोलीस दल योगा करताना







टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. आपला लेख वाचला. खरे आहे. योगा केल्याने मनःशांती लाभते. मी रोज योग करतो.

    उत्तर द्याहटवा
  2. आपला लेख वाचून मी प्रभावित होऊन रोज प्राणायम करतोय. आपल्याला धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. योग हा आपल्या देशातील प्राचीन अभ्यास आहे. रामदेव बाबा यांनी आपल्या देशात फिरून याचे महत्त्व सांगितले आहे. त्यासोबतच आपले माननीय पंतप्रधान मोदीजी देखील रोज योगा करतात. आपला लेख उल्लेखनीय आहे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.