२९/१/२०

समुपदेशनाची गरज

समुपदेशनाची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिस व वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण, अद्याप कित्येकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. 
स्वतःच्या गाड्या रस्त्यावर आल्यानेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. एका बाजूला वाहन खरेदीचे प्रत्येक मुंबईकराने उचललेले पाऊल आणि दुसरीकडे त्यांनी वाहतुकीचे नियम मोडण्यात घेतलेल्या आघाडीने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईतील ६०% वाहन चालक नियम मोडतातच मोडतात. वाहतुकीसाठी नियमन करण्यासाठी लावण्यात आलेली बॅरिकेट्स, मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करणे, नो पार्किंग, एक दिशा मार्ग असे फलक उखडून फेकून देणे, हेल्मेट न घालता मर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन चालवणे, नो एंट्रीमध्ये वाहन चालवणे, बाईक स्वरांचा तर यात पहिला नंबर लागतो. आता तर  ऑनलाईन खरेदी घराघरात पोहोचली आहे. परिणामी, घरबसल्या सगळ्या गोष्टी खरेदी करता येऊ लागल्या आहेत. खाद्यपदार्थ, फास्टफूड क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवण्याकडे झुकला आहे. खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर ते खाद्यपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपन्यांमध्ये यामुळे  मोठया प्रमाणात स्पर्धा  दिसून येत आहे. त्यामुळे बाईक वरून ऑर्डर घरपोच पोचविणारे बाईकस्वार रस्त्यावरून कशाही बाईक चालविताना दिसून येतात. ऑर्डर लवकर पोहचविण्याचा नादात त्यांना वेगाचेही भान राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबईत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पण, कारवाई  करण्यात आलेले बहुतांश दुचाकीस्वार हे तरुण आहेत. पोलिसांच्या केवळ दंडात्मक कारवाईचा त्यांच्यावर फारसा परिणाम होईल असे सध्या तरी वाटत नाही. त्यातच अपुरे ज्ञान, शारीरिक व मानसिक दुर्बलता, मद्यपान आदींचे प्रमाणही अशा तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे आर्थिक दंडाबरोबरच त्यांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करायला हवेत. 
पोलिसांनी रस्त्यावर बाईकस्वारांवर कारवाई केल्यास पोलीस कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. नो पार्किंगच्या ठिकाणीही कशाही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नागरिकांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला दिसत नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था पोलिसांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूक करूनही शहरात हवा तितका बदल घडलेला दिसत नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे, पार्किंगचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई, जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.१८/१/२०

दुचाकी स्वराचे सुरक्षाकवच म्हणजे हेल्मेट

दुचाकी स्वराचे सुरक्षाकवच म्हणजे हेल्मेट
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
बरेचसे पालक आपल्या मुलांना कौतुकाने दहावी बारावी झाली की गाडी घेऊन देतात तेव्हा ती मुलं पंधरा-सोळा वर्षांच्या आत असतात. कॉलेजला जायला गाडी हवी म्हणून विनापरवाना दुचाकी चालवणे किंवा चालवू देणे कितपत योग्य आहे? हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला बाइक घेऊन देताना विचार केला पाहिजे. १८ वर्षांखालील मुलांनी वाहन परवाना नसताना दुचाकी वापरायची, त्यावर त्यांनी हेल्मेट घातलेले नसतं आणि नंतर अपघातांचे प्रमाण वाढल्याची चर्चा करत बसायचं हे योग्य आहे का? वाहन चालवण्याचा परवाना असणे किंवा नसणे याला आपण किती महत्त्व देतो? प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन तिथे स्वतः वाहन चालवून इंग्रजी 8 काढून दाखवून किती लोकांनी परवाना मिळवला आहे? 8 काढून दाखवायचे म्हणजे नक्की काय? हेच नागरिकांना माहिती नसते. वाहन परवाना मिळवताना कित्येक लोक फक्त दलालाला पैसे देतात आणि परवाना मिळवायची वाट बघत घरात बसून राहतात, आठ-पंधरा दिवसांत घरपोच वाहन परवाना मिळतो. हे असले प्रकार थांबले पाहिजेत. कारण अशा प्रकारांमुळे वाहन चालक हा योग्य प्रकारे वाहन चालविण्यास सक्षम नसतो. त्यास रहदारीचे नियम माहिती नसतात. थोड्याशा अंतरासाठी कशाला हवे हेल्मेट म्हणत गाडी पळवतात. पोलिसांनी अडविताच त्यांच्याबरोबर हुज्जत घालताना दिसून येतात.
मुळात हेल्मेट दुचाकी वाहनांचे अपघात टाळू शकत नाही. परंतु, अपघात झाल्यास वाहनचालकाच्या डोक्याला मार लागल्यास मृत्यूच्या दारात जाण्यापासून रोखण्याचा संरक्षणासाठी मदत करीत असते. अपघाताच्या वेळी डोक्याला लागणारा जबरदस्त धक्का बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे आणि संरक्षण देण्याचे बहुमूल्य कार्य फक्त हेल्मेटचा करू शकते. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ प्रमाणे हेल्मेटचा वापर देशात करण्याचे बंधन बऱ्याच वर्षापासून आहे दुचाकी अपघाताबद्दल केलेल्या संशोधनातून डोक्याला मार लागून दुचाकी वाहन चालक जबर जखमी होण्याचे आणि मृत्यू होण्याचे कारण स्पष्ट झालेले आहे. या दुचाकी वाहनांच्या अपघातांमुळे जगातील बऱ्याच देशांनी दुचाकी वाहन चालकाला हेल्मेट वापरण्याची सक्ती केलेली आहे. आपल्या देशातील दिल्ली राज्याने ३५ वर्षापासून आणि पंजाब, केरळ, गोवा राज्याने तर राजस्थानमधील जयपूरमध्ये कर्नाटकमधील बंगलोरमध्ये आणि आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये हेल्मेट वापरण्यासाठी सक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईतही दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती करण्यास सांगितले जात आहे. दुचाकी वाहनांच्या अपघाताच्या वेळी वाहनचालकाला कोणतेही संरक्षण असल्यामुळे डोक्याला मार लागून जबर जखमी होण्याची व त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने समोर आलेले आहे. दुचाकी वाहन चालक कार ड्रायव्हर जवळजवळ तीस पटीने जास्त अपघाताची जोखीम घेत असतो.
कवटीच्या आतील मेंदू शरीरातील हालचालींवर नियंत्रण करीत असतो. मेंदूची रचना सूक्ष्म व गुंतागुंतीची असून त्यास लागलेल्या मारामुळे अथवा लागलेल्या झटक्यामुळे छोटासा धक्का पण मेंदूच्या नियंत्रण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करून मोठ्या प्रमाणात शारीरिक नुकसान होण्याची संभावना असते. त्यामुळे डोक्याचे व त्यातील मेंदूचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुचाकी वाहन अपघातात जखमी होणाऱ्या साधारणपणे ८० टक्के व्यक्तींना अपघातात डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागलेला असतो. तसेच ६८% दुचाकी वाहन चालक हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला बसल्यामुळे अतिशय गंभीर जखमी होत असतात. हेल्मेटचा वापर करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हेल्मेटमुळे वाहनचालकांच्या दृष्टीत काहीही फरक पडत नाही. उलट आपल्या डोक्याचे संरक्षण होते. तसेच आता कित्येक बाईकमध्ये हेल्मेट वाहनांमध्ये ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांना होणारा त्रास केस गळण्याची कारणे आणि मानेला त्रास होत असल्याबद्दल तक्रारसुद्धा चुकीची आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये वाहनांना वेग कमी मिळत नसल्यामुळे हेल्मेट वापरण्यास विरोध करणारे दुचाकी वाहन चालक, अपघातानंतर रस्त्यावर पडत असताना, गुरुत्वाकर्षणामुळे प्रेशरमुळे, वाहनाच्या दुप्पट वेगाने रस्त्यावर पडत असतो, या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
 दुचाकी वाहन अपघातात घरातील कमावत्या आधारभूत व्यक्तीला झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे जबर जखमी व्यक्तीमुळे अपंग झालेल्या व्यक्तींना पुढील आयुष्य दुःखात पार करणाऱ्या, त्यांच्या कुटुंबाला सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, यातना जीव घेणाऱ्या असतात. आधुनिक जास्त वेगवान आणि मजबूत दुचाकी वाहनांमुळे, दुचाकी वाहन अपघातास मोठ्या प्रमाणात सापडून डोक्याला मार लागून जबर जखमी होण्याच्या व मृत्युमुखी पडण्याच्या वाढत झालेल्या भीषण प्रमाणाचा गांभीर्याने विचार करून हेल्मेटचा वापर सक्तीने करण्याचे आवश्यक व निकडीचे झालेले आहे.
८/१/२०

भिक्षा मागणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे

भिक्षा मागणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी पैसे किंवा अन्न यासारख्या वस्तूंसाठी याचना करताना कित्येक भिकारी आपल्याला दिसून येतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील औद्योगिकीकरणानंतर विविध स्तरांवर स्थित्यंतरे घडू लागली व त्याचा परिणाम म्हणजे सामाजिक समस्या मोठया प्रमाणात भासू लागल्या. त्यात भिकाऱ्यांचा प्रश्न हा नागरी समस्या म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांत दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे.
दारिद्र्य, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, वृद्धांची आबाळ, घटस्फोट यासारखी कौटुंबिक कारणे तर शारीरिक व मानसिक अपंगत्व, कुष्ठरोग, अर्धांगवायू यासारखे दीर्घकाळ परिणाम करणारे आजार यासारखी जैविक कारणे माणसांना भीक मागण्यास प्रवृत्त करतात. याशिवाय काही जातीजमातींचा पारंपरिक हा व्यवसायही असतो. लहान मुले, महिलांना बळजबरीने शारीरिक, मानसिक त्रास देऊन किंवा अपंग करून भीक मागण्यास रस्त्यावर बसविले जाते. याशिवाय देशातील विविध रेल्वे स्थानके, मठ, देऊळ, मशिदी, स्मशानभूमी, धार्मिक तीर्थक्षेत्रे या ठिकाणीही भीक मागून गुजराण करणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येते.
सध्या मोठ्या प्रमाणात असलेले भिकाऱ्यांचे अस्तित्वच अनेक प्रकारे उपद्रवी ठरत आहे. त्याच्या वास्तव्यामुळे पाण्याचे, हवेचे व परिसराचे प्रदूषण होऊन श्वसनाचे आजर, त्वचेचे रोग, साथींचे रोग यांचा प्रसार होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर चोऱ्या, जुगार, मारामाऱ्या व लैंगिक गुन्ह्यांना पोषक अशी पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे त्या त्या भागातील सुरक्षिततेला त्यामुळे धोका निर्माण होतो. असे पोलिसांचे म्हणणे आहे.सध्या रेल्वे स्थानक हे भिकाऱ्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणून पुढे येत आहे. देशभरातील असंख्य रेल्वे स्थानकांवर, स्थानकाच्या बाहेरील बाजूस हजारो भिकारी वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे. त्यांना ऊन, पाऊस, थंडी यापासून मोफत संरक्षण देणारी रेल्वे स्थानके जणू त्यांच्यासाठी हक्काची घरेच बनू पाहत आहेत. तसेच त्यांच्या मनात येईल तेव्हा ते विनातिकीट एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनकडे रेल्वेने मोफत प्रवासही करीत असतात. बरेचसे मठ, मंदिराबाहेरही भिकाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात असते. या लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी दूसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना अन्न, पैसे देऊन गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पाकिटमारी किंवा चोरी करणाऱ्या मुलांचा याच पद्धतीने वापर केला जात असल्याची उदाहरणे आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की, कित्येक भिकारी, गर्दुल्ले भीक मागत असताना मुंबईतील लोकल रेल्वे मध्ये चढून महिलांकडे एकटक पाहणे, अंगविक्षेप करणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांवर त्यांची एवढी भीती बसली आहे की, महिला प्रवासी महिला डब्यांतून प्रवास करताना कचरतात. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी मुंबईत लोकलने प्रवास करताना प्रवाशांना दिलासा देण्याचे काम पोलीस करतात. प्रत्येक महिला डब्यात एक-एक पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

रेल्वे डब्यांत, रेल्वे स्थानकांवर, स्थानकाबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या भिकाऱ्यांना पकडून त्यांना दंड किंवा शिक्षा करण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करावे. एक ते १८ वयोगटातील भिकाऱ्यांची मुक्तता करून त्यांना निवारा आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संस्थांची मदत घ्यावी. १८ते ६० या वयोगटातील काम करण्याची क्षमता असणाऱ्या भिकाऱ्यांना कामासाठी प्रवृत्त केले जाणे गरजेचे आहे. तर ६० वर्षांच्या पुढील भिकाऱ्यांना विविध एनजीओ च्या मदतीने अनाथाश्रमात सोडण्यात यावे.
भिकाऱ्यांचे पुनर्वसन करताना सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे ते म्हणजे त्यांची मानसिकता बदलणे. कारण काही कारण नसताना भीक मागून त्यांना आयते पैसे मिळत असल्याने किंवा परिस्थितीपुढे हतबल होऊन बहुतांश भिकारी हा भीक मागण्याचा धंदा सोडण्यास तयार नसतात. त्याकरिता विविध सामाजिक संस्थांना पोलिसांनी संपर्क करून त्यांच्यामार्फत भिकाऱ्यांचे समुपदेशन व्हावे. रस्त्यावर कुणी असाह्य चेहरा समोर करून भीक मागण्यास आला असता भिकेपोटी त्यांना पैसे किंवा काही वस्तू देण्यापेक्षा पोलिसांमार्फत त्यांना सुधारगृहात पाठवावे. रस्त्यावर भीक मागणे सोडून ते सुधारगृहात गेले तर खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांच्याही शिक्षणाची सोय होईल.


१/१/२०

माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा...?

माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा ....?
-दादासाहेब येंधे  
इंटरनेटवरील आधारित जी माध्यमे आहेत, त्यासाठी ‘सोशल मिडीया’ किंवा ‘समाज माध्यमे’ हा शब्द वापरला जातो. फेसबुक, ट्वीटर, युटयुब अशा अनेक माध्यमांचा सोशल मिडीयात समावेश होतो. या माध्यमांत खरंच किती सामाजिकता आहे, की हे आभासी जग आहे, हा एक गहन प्रश्न आहे. समाज माध्यमांची ताकद लोकांना दरवेळी सत्ता हस्तगत करायची असते किंवा समीप राहायचे असते म्हणून वापरण्यात येते. यासाठी समाज जसजसा विकसित होत गेला, तसं तशी साधने विकसित होत गेली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माणूस जेव्हा शेती करत होता, तेव्हा कृषिप्रधान समाजाची निर्मिती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर समाज उद्योगप्रधान झाला. आता २१ व्या शतकातील आजचा समाज माहितीप्रधान समाज म्हणता येईल. कारण, माहितीला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व. ही माहिती आपल्याजवळ असणे किंवा या माहितीचे जलद गतीने हस्तांतरण करणे या गोश्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यातील बरीचशी माहिती ही सकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते. कारण, मुख्य प्रवाहातील मुद्रित आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांवर कुणाचे तरी वर्चस्व अथवा मालकी असते. त्यामुळे या माहितीवर हे वर्चस्व सतत डोकावत असते. समाज माध्यमांचे मुलभूत वैषिश्टय असे की, सामान्य माणसांकडे याची मालकी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एक वेगळे आभासी जग प्रत्येक जण तयार करत असतो. अतिषय वेगाने बातम्यांचे आदान-प्रदान या समाज माध्यमांतून होत असते. समाजात जे वेगवेगळे घटक आहेत. जसे - व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य-देष यांना सषक्त करण्याचे प्रयत्न या समाज माध्यमांतून होत आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकिय या सगळयाच दृश्टिकोनातून राश्ट्राला किंवा व्यक्तीला समृद्ध करण्याचे कार्य समाज माध्यमे करत आहेत. या सगळयात जाती, धर्म, लिंग, भाषा यांचा अडसर होत नाही हीच समाज माध्यमांची मोठी ताकद आहे.

सध्या माहितीचे आणि संदेशाचे वहन इतके जलदगतीने होत आहे की १ सेकंदापूर्वी, २ सेकंदापूर्वी काय घडले याच्या अपडेट्स ट्विटर किंवा फेसबुक किंवा व्हाॅटसअॅप यांसारख्या सोल साईट्सवरून त्वरित प्रसारित होत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेवहनाचे प्रमाण सध्या झटपट होताना दिसत आहे. स्वातंत्रयपूर्व काळापासून सुरू असलेल्या संदेषवहनाच्या प्रसारणाची जागा जरी फेसबुक, व्हाट्सअॅपने घेतली असली तरी देखील आजही पुरातन माध्यमांनी त्याच जोषात अजूनही तग धरला आहे. माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून वृत्तपत्र आणि माध्यमांची जागा फेसबुक आणि व्हाॅट्सअपने घेतली आहे. परंतु यामुळे मूळ पत्रकारिता आणि पत्रकारांच्या प्रतिमेला धोका पोहचला आहे. कारण आजकाल माध्यमं इतकी डोईजड झाली आहेत की, कोणीही पत्रकार होऊ कतो. फेसबुक, व्हाॅट्सअॅपमुळे बातमीची मूल्यं ढळली आहेत. कारण, काही वेळेस चुकीची माहिती प्रसारित होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे माध्यमं कधी-कधी घातक आहेत की काय असा सवाल पडल्याशिवाय राहत नाही. प्रसारमाध्यमं आज बाजारीकरणामुळे चुकीच्या बातम्या सादर करून वृत्तपत्राची विश्वासार्हता डळमळवू पाहत आहेत.

मात्र, अती तिथे माती असे जेव्हा आपण म्हणतो, तशी जणू परिस्थिती सध्या आपल्या समाज माध्यमांबद्दल दिसत असून, या माध्यमांच्या उणिवा समोर येत आहेत. या समाज माध्यमांवर खूप सारी माहिती येत असते. माहितीच्या स्पर्धेत खोटया माहितीचे प्रमाणही जास्त आहे. विषिश्ट विधान एखादया नेत्याच्या नावाने फोटोसहित पाठवले जाते. बऱ्याच वेळेला एकच विधान अनेक नेत्यांच्या नावे खपवले जाते. त्यामुळे माहितीच्या सत्यतेवर आणि विष्वासार्हतेवर प्रष्नचिन्ह निर्माण होते. या माध्यमांवर सातत्याने आषयनिर्मिती होत असते. बÚयाच वेळेला या आषयाचा निर्माता कोण आहे, हे सांगणेही अवघड होऊन जाते. या माध्यमांत खाजगीपणाचा अभाव असतो किंवा खाजगीपणाचा भंग पावतो. नुकत्याच झालेल्या केंब्रिज ऍनालिटिका करणामुळे ही गोश्ट समोर आलेली आहे. वेगवेगळे साॅफटवेअर वापरून माहितीत छेडछाड करून भ्रम आणि खोटी माहिती उगाचच पसरवली जाते. दोन समाजात तेढ निर्माण व्हायला समाज माध्यमांतील आषय कारणीभूत ठरतात. अषा या माध्यमांवर किती विष्वास ठेवायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.
दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...