रेशनवर रास्त दराने धान्य मिळणं हा नागरिकाचा हक्क आहे, ती दयाळूपणे घातलेली भीक नव्हे
रेशनच्या दुकाना समोरच्या रांगा आणि रेशन दुकानदाराची अरेरावी, याचा अनुभव अनेकांना असतो. आता, निदान शहरांमध्ये तरी मुबलक धान्यपुरवठा असल्याने अनेक लोक रेशनदुकानांकडे फिरकत नाहीत. तरीही राॅकेलसाठी किंवा बाजारापेक्षा स्वस्त साखरेसाठी रेशनदुकानाची पायरी अनेकांना चढावी लागते. रेशन दुाकनदाराच्या अरेरावीला बळी पडावे लागते, कधी कधी प्रकरण हमरीतुमरीवर जाते. त्यासाठी रेशनचे सर्वसाधारण नियम काय आहेत ते आपण जाणून घेणे गरजेचे आहे ते पुढीलप्रमाणे:
dks.kkyk
dks.krs js’ku dkMZ feGrs \
ika<js
dkMZ ¼,ih,y½ |
ds'kjh ¼,ih,y½ |
fioGs ¼chih,y½ |
vaR;ksn; |
vUuiw.kkZ |
1
yk[k :- P;k oj okf”kZd mRRiUu vlysys dqVqac |
15
gtkj rs 1 yk[k :i;kaP;k njE;ku okf”kZd mRiUu vlysys dqVqac |
15
gtkj :- P;k vkr okf”kZd mRiUu vlysys dqVqac |
fioG;k
dkMZ/kkjdkaiSdh vfrxjhc vlysyh dqVqacs |
65
o”kkZaP;k oj o; vlysyh o dks.kR;kgh isU’ku ;kstuspk ykHk feGr ulysyh fujk/kkj
O;Drh |
१) रेशन कार्ड काढण्यासाठी पुढील कादपत्रे लागतात.
i . आधीचे कार्ड रद्द केल्याची/नाव कमी केल्याची स्लिप
ii .सध्याच्या वास्तव्याचा एक पुरावा (उदा. घरखरेदी पत्र, भाडे करारपत्र, भाडे पावती, लाईट बिल इ.)
iii . १६ वर्षाखालील मुलांचा जन्मदाखला.
२) परित्यक्ता व निराधार विधवांना आधीचे कार्ड रद्द करणे/नाव कमी करणे ही अट षिथील करण्यात आली आहे.
३) बेघरांना कोणत्याही कागदोपत्री पुराव्यांषिवाय 3 महिन्यांसाठी तात्पुरते कार्ड/फूड कुपन मिळते.
४) बीपीएल (पिवळे कार्ड) व अंत्योदय या योजनांच्या लाभाथ्र्यांना दरमहा ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे. अंतर्गत प्रमाणात बदल होऊ षकतो. (उदा. गहू २० किलो ऐवजी १५ किलो व तांदूळ १५ किलो ऐवजी २० किलो)
५) राॅकेलचे प्रमाण व दर सर्वत्र सारखे नाहीत. आपल्या भागातील तहसील कार्यालयातून/ रेषन कार्यालयातून याबाबतची माहिती घ्यावी.
६) २ गॅस सिलेंडर असलेल्यांना राॅकेल अजिबात मिळत नाही
७) १ गॅस सिलेंडर असलेल्यांना ३लीटर/ ४लिटर राॅकेल दरमहा मिळते.(निष्चित प्रमाणाची माहिती तहसील/रेषन कार्यालयातून मिळवावी)
८) अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थींना राॅकेल मिळत नाही.
९) राॅकेल हे पहिल्या पंधरवडयात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत ते घेता येते. त्याचा हप्ता बुडत नाही.
१०) दारिद्रयरेशेखालील व अंत्योदय धान्य, हे महिन्यात चार हप्त्यांतही घेता येते किंवा चालू महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.
११) रेशन दुकानदाराने धान्याचे नमुने सीलबंद प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेच पाहिजेत. उघडया वाटयांमध्ये ते ठेवणं योग्य नाही कारण नंतर त्यात मिसळामिसळी होऊ शकते.
१२) रेशनदुकानामधला माल घेताना तांदूळ घेतलेच पाहिजेत तरच राॅकेल मिळेल, अमुक किलोपेक्षा कमी माल देणार नाही, असे काहीही नियम सरकारने केलेले नाहीत. ग्राहकाला हवं तेवढं धान्य, हवं ते धान्य दुकानदाराने द्यायलाच पाहिजे. फक्त धान्याची ‘अप्पर लिमिट’ वरची मर्यादा सरकार घालतं ती पाळावी लागते.
१३) रेशनकार्ड ठेवून घेण्याचा, रद्द करण्याचा कोणताही अधिकार रेशनदुकानदाराला नाही. तो असं म्हणत असेल, तर तो दादागिरी करतो आहे, त्याला शासन होऊ शकतं, हे ग्राहकांनी पक्कं ध्यानी धरावं.
१४) साप्ताहिक सुट्टीखेरीज दररोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास रेशनदुकान उघडं ठेवणं, हे कायद्याने बंधनकारक असतं. ही वेळ कदाचित थोडी मागेपुढे होऊ शकते. म्हणजे सकाळी ९ ते १ ऐवजी १० ते २ होऊ शकते; पण कामाच्या दिवशी, आज सकाळी रेशनचं धान्य मिळणार नाही, फक्त संध्याकाळीच मिळेल, असं कोणीही रेशन दुकानदार म्हणू शकत नाही.
१५) रेशन दुकानदार मापात फसवत असेल, राॅकेल फेसात मारत असेल तर ‘‘वजनमाप अधिकाऱ्यांना बोलावून दुकानाची तपासणी करता येते. वजनमाप अधिकाऱ्यांचे कार्यालय प्रत्येक तालुक्यात तसेच शहरात असते.
१६) रेशनवर धान्य घेताना एका दिवसात एका कार्डधारकाच्या नावाची एकच पावती फाडता येईल, असा नियम कुठेही नाही. मात्र, प्रत्येक खरेदीची पावती व्हायलाच हवी आणि पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असायला हवा. पावती मराठी भाषेतच लिहिलेली असावी, असा महाराष्ट्र शासनाचा दंडक आहे.
१७) रेशनदुकानात ठळक, स्पष्टपणे वाचता येईल, असा माहितीफलक असलाच पाहिजे. दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तहसीलदार/रेशन कार्यालय यांचा पत्ता व फोन, रेशनकार्डांची संख्या, मालाचा भाव, माल देण्याचं प्रमाण वगैरे माहिती त्यावर लिहिणे दुकानदारास बंधनकारक आहे.
१८) प्रत्येक रेशनदुकानात तक्रारवही असलीच पाहिजे. तिच्या प्रत्येक पानावर क्रमांक आणि तहसील/रेशन ऑफिसरचा शिक्का असलाच पाहिजे. मात्र, तक्रार नोंदवणाऱ्यानेही तक्रार लिहून खाली स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता व सही केली पाहिजे. आपण जबाबदार व जागरूक नागरीक असलो तर कधीही भ्रष्टाचार होणार नाही हे वेळीच ओळखावे.
रेशनवर रास्त दराने धान्य मिळणं हा नागरिकाचा हक्क आहे, ती दयाळूपणे घातलेली भीक नव्हे याचं भान रेशनदुकानदार व ग्राहक या दोघांनीही ठेवले पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.