मोबाईल भिजल्यास काय कराल
-दादासाहेब येंधे
सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. कुठेही बाहेर जाताना किंवा पावसात भिजण्याचा आनंद घेताना आपण मोबाईलवर गाणे ऐकतो. पण, कालांतराने लक्षात येते की आपल्या मोबाईलमध्ये पाणी गेले आहे. भर पावसात आपण मोबाईलवर बोलत असतो. त्यामुळे आपल्या कळत नकळत मोबाईलमध्ये पाणी शिरतं. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच काळजी घ्या आणि आपले गॅजेट्स बंद पडल्यापासून काळजी घ्या.
मोबाईल, लॅपटॉप बंद करा..
आपले गॅझेट मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा आदींमध्ये पाणी गेल्यास तुमचे गॅझेट सर्वप्रथम बंद करा. परिणामी, ओलसरपणामुळे होणारं अतिरिक्त नुकसान टाळता येईल.
मोबाईलमधील मेमरी कार्ड, सीम कार्ड, मागील पॅनल सुती कापडावर पसरून ठेवा.
घरातील तांदळाचा वापर करा...
मोबाईल मध्ये गेलेले पाणी शोषून घेण्यासाठी तो तांदळाच्या ठेवावा. हा उत्तम पर्याय सध्या समोर येत आहे. एका पसरट भांड्यात तांदूळ घ्या. त्या भांड्यात मोबाईल ठेवा. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवा. जेवढा जास्त वेळ तुमचा मोबाईल बंद असेल तितका तो आत जास्त कोरडा होईल. जास्तीत जास्त एक दिवस मोबाईल भांड्यात बंद करून ठेवा. जास्त पाणी गेले असेल तर आणखी जास्त कालावधीसाठी देखील तुम्ही आत मध्ये ठेवू शकता. तांदळामधून बाहेर काढताच मोबाईल ऑन करण्याची घाई करू नका. तुमच्याकडे स्पिरीट असल्यास कापसाचा बोळा त्यात बुडवून आतल्या सर्किटवर फिरून घ्या. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि लवकरात लवकर मोबाईल कोरडा होईल. स्पिरीट नसल्यास सर्व भाग स्वच्छ कापडाने पुसून घ्या. पाणी निघून गेल्याची खात्री होताच सर्व केलेले सुटे भाग पुन्हा जोडा आणि मोबाईल ऑन करा.
१. घरातून बाहेर पडताना सोबत सुती कापड ठेवा. प्रवासात मोबाईल ओला झाला तर त्या कापडाने स्वच्छ करता येईल.
२. बाजारात वायरलेस गॅजेट्स मिळतात तसेच हेडफोन, चार्जर इत्यादी. त्यातील अनेक गॅजेट्स वॉटरप्रूफ सुद्धा आहेत मान्सून वगळता इतर वेळी सुद्धा ते उपयोगी ठरतात. त्यांचा पावसाळ्यात वापर करता येईल.
३. घराबाहेर पडताना गॅजेट्स ठेवण्यासाठी झिपबॅग जवळ ठेवा. पारदर्शक आणि वापरायला सोप्या अशा या झिप बॅग्समध्ये गॅझेट्स ठेवा. जेणेकरून, पावसाच्या पाण्यापासून बचाव होईल.
४. कोणताही ऋतू असुद्यात एखाद्या गॅझेट अचानक बंद पडू शकते. अशावेळी प्रत्येक गॅजेट्सचं बॅकअप घेणे गरजेचे आहे. रिमाइंडर लावून वेळोवेळी बॅकअप घेणे गरजेचे आहे.
५. पावसात मोबाईल भिजू नये म्हणून ठिकठिकाणी प्लॅस्टिक कव्हर बाजारात मिळतात. ते विकत घेऊन मोबाईल त्यात ठेवा. त्यामुळे मोबाईल भिजणार नाही.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.