मीराबाईची रौप्यपदकापर्यंतची प्रेरणादायी संघर्षकथा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
सायखोम मीराबाई
चानू... भारतीय वेटलिफ्टिंगमधले
मोठं बनलेलं नाव. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांची अपेक्षा असलेल्या भारतीय
खेळाडूंमध्ये मीराबाईचे नाव आघाडीवर होतं. मीराबाईने एकूण ५० किलो वजनी गटात
रौप्यपदक पटकावले. भारताच्या पदकांचे खातं उघडलं. मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि 'क्लीन अँड जर्क'मध्ये १३० किलो वजन उचलले. मीराबाईने
एकूण २०० किलोग्रॅम वजन उचलून रौप्यपदक पटकावण्याची कमाल
केली.
या कामगिरीनंतर
तिच्यावर चारही बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. यासाठी तब्बल
२१ वर्षांपूर्वी म्हणजे २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये करणाम मल्लेश्वरीने
वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची
कमाई करणारी मिराबाई ही भारताची पहिलीच वेटलिफ्टर ठरली आहे. मीराबाई चानूचा ऑलिम्पिक पदक पटकावण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपं नव्हता. लहानपणी चुली:साठी लागणारी लाकडे
उचलणारी मिराबाई आज भारताची आघाडीची वेटलिफ्टर आहे. इतकेच नाही तर आता ती ऑलिम्पिक
पदक विजेतीही झाली आहे.
८ ऑगस्ट १९९४ रोजी मणिपूरची
राजधानी इन्फाळमध्ये जन्मलेली मिराबाई २६ वर्षांची आहे. मीराबाईने वयाच्या अकराव्या वर्षी
एका स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर मागे वळूनही पाहिले
नाही. त्यानंतर तिने जागतिक तसेच आशियाई स्तरावरील कनिष्ठ २०१४ मध्ये स्कॉटलंड
इथल्या ग्लासगोमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटात
तिने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर ती चांगलीच नावारूपाला आली. त्यावेळी ती अवघ्या वीस वर्षाची होती. २०१७ च्या जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने
सुवर्णमय कामगिरी केली. या स्पर्धेत तब्बल २० वर्षांनी एखाद्या भारतीय वेटलिफ्टरने सुवर्णपदक पटकावलं होतं. मीराबाईची कारकीर्द अशा पद्धतीने घडत होती.
२०१८ मध्ये दुखापत झाल्यामुळे वर्षभर तिला कोणत्याही
स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. मात्र, २०१९ मध्ये तिने
जबरदस्त पुनरागमन केलं. आता पदक जिंकून तिने भारताची मान उंचावली आहे. टोक्यो ऑलंपिकमध्ये
पदक विजयाबद्दल मिराबाईला अवघ्या देशाकडून आज घडीला शुभेच्छा दिल्या
जात आहेत. मात्र, येथपर्यंत पोहोचण्यासाठी तिचा एक जबरदस्त जीवन संघर्षही अनुभवयास मिळतो.
मीराबाईचा
जन्म मणिपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातल्या मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी
आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांमधली ती सर्वात लहान. पण, येताना सर्वात जास्त
लाकडे घेऊन यायची. तिने आणलेली मुळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता
येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा
होती. पण, मिराला तिरंदाज व्हायचे होते. मात्र आठवीच्या पुस्तकात तिने मणिपूरच्या कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचे ध्येय ठरलं. तिने वेटलिफ्टर व्हायचं असे ठरवल्यानंतर खडतर परिश्रम करत राज्य आणि
राष्ट्रीय पातळीवर तिने उत्तम चमक दाखवली.
ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्र सरकारने ७१ लाख खर्च करून मिराला ट्रेनिंग आणि प्रॅक्टीससाठी
अमेरिकेत पाठवलं. तेथील खडतर प्रशिक्षणामुळे तिला दररोज सराव करणं जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खुश झाले आणि पुन्हा
एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला. टोक्यो ऑलम्पिक! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. ४९ किलो वजनी गटात तिने 'क्लीन अँड जर्क'मध्ये ११५ किलो वजन उचलून 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. जे हात लाकडाची मोळी वाहून आणत होते, तेच हात आज 'ऑलिम्पिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत.ही एक प्रेरणादायी जीवनकथाच म्हणावी लागेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.