साहित्य :- ३-४ मसाला पापड, एक लिंबू, एक कप वाफवून घेतलेले मक्याचे दाणे, १ वाफवलेला बटाटा, १ बारीक कापलेला कांदा, १ टोमॅटो कापलेला-बिया काढलेला, दोन ते तीन कापलेल्या बारीक हिरव्या मिरच्या, अर्धा कप बारीक शेव, मीठ चवीनुसार, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला.
कृती :- सर्वप्रथम पापडाचे दोन सारखे अर्धे भाग करून घ्यावे. नंतर त्यांना त्रिकोणाकार कोनासारखे बनवून एका लहान ग्लासात सेट करून ३० सेकंदाकरिता मायक्रोवेव्ह
मध्ये ठेवावे. जेणेकरून त्यास आकार आकार येईल. जर मायक्रोवेव्ह
नसेल तर पापड तव्यावर गरम करत असतानाच त्याला त्रिकोणाकार आकार द्यावा. एका प्लेटमध्ये वाफवून घेतलेले मक्याचे दाणे, वाफवलेला बटाटा, टोमॅटो, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेवावी. वरून लिंबू पिळावे. चाट मसाला आणि मीठ चवीनुसार टाकून एकत्र करून घ्यावे. हे तयार झालेले मिश्रण त्रिकोणी बनवलेल्या पापडाच्या कोनामध्ये भरून घ्या. तयार झाला कॉर्न मसाला पापड....
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.