साहित्य:- १ कप मैदा, दोन बारीक कापलेले कांदे, २-३ हिरव्या मिरच्या, १ कप बारिक केले पनीर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, दोन चमचे घी.
कृती :- मैद्यात थोडे मीठ टाकून ते व्यवस्थित मळून घ्यावे. मळलेल्या पिठाला थोडा वेळ तसेच राहून द्यावे. तोपर्यंत तव्यावर घी गरम करून घ्यावे. त्यामध्ये कापलेला कांदा त्यास व्यवस्थित परतवून घ्यावे. मग त्यात बारीक केलेले पनीर घालावे. नंतर हळद, मीठ, जीरे पावडर आणि लाल मिरची पावडर, हिरव्या बारीक कापलेल्या मिरच्या आणि गरम मसाला टाकून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत परतवून घ्यावे. व्यवस्थित परतवलेले हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवून घ्यावे.
नंतर मैद्याच्या
बनविलेल्या पिठाच्या लहान लहान चपात्या करून घेणे. त्या बनविलेल्या चपातीमध्ये आपण परतवून घेतलेले मिश्रण भरून घ्यावे. नंतर त्या चपातीला अशाप्रकारे गोल गुंडाळावे, रोल करावे की, त्यातील मिश्रण बाहेर येणार नाही. खालील बाजूने देखील व्यवस्थित पॅक करून घ्यावे, आणि अशाप्रकारे पनीर रोल तयार झाला. एका डिशमध्ये चटणीसोबत सर्व करा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.