Ticker

10/recent/ticker-posts

सलाम या कोविड योद्धांना

 -दादासाहेब येंधे  (dyendhe1979@gmail.com)

पोलीस  : कोरोनामुळे लॉक डाऊन लावण्यात आला. या लॉक डाऊनमध्ये मुख्य भूमिका बजावली ती पोलीस दलाने. नागरिकांनी घराबाहेर पडू  नये, तसेच सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून कडेकोट बंदोबस्त केला. प्रसंगी नागरिकांना लॉक डाऊनमध्ये घराबाहेर पडू नका अशी हात जोडून विनंतीही केली. 


लॉक डाऊनमध्ये घराबाहेर पडण्याची अनुमती नव्हतीफक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडणे अपेक्षित होते.पणकाही हौशी नागरिक बाहेर पडत होतेयासाठी पोलिसांना कडक शिस्तीचे धडे दिलेअनेकांवर पोलीसांनी करवाईदेखील केली.


परिचारिका : रुग्णालयात दाखल झालेल्या बाधितांचे मनापासून सेवा करणाऱ्या परिचारिका कित्येक रुग्णांसाठी देवदूत ठरल्या. आपल्या जिवाची पर्वा न करता covid-19 या आजारातून रुग्णांना बरे करण्यासाठी परिचारिकांनी जीवाची बाजी लावली.



डॉक्टर : कोरोना काळात डॉक्टरांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कोविड-१९ च्या आजारातून रुग्णांना बरे केले. या काळात अनेक डॉक्टरांनाही करण्याची बाधा झाली. कित्येक जणांचा मृत्यूही  कोरोनामुळे झाला. पण, एकही डॉक्टर  कोरोनाच्या लढ्यातून मागे हटला नाही; प्रसंगी गल्लीबोळात जाऊनही रुग्णांची काळजी घेतली.


आरोग्य कर्मचारी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरोघरी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे काम आरोग्यसेवकांनी केले.

                                        


रुग्णवाहिका चालक : कोविड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याकरिता कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना रुग्णवाहिका आणून घराघरातून पेशंट रुग्णालयापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.



सफाई कर्मचारी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच करचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत होते. पीपीई किट, मास्क,  इंजेक्शनच्या सुया, मेडिकल वेस्ट आदी कचराही रोज वाढत होता. त्याची योग्य रीतीने विल्हेवाट सफाई कर्मचाऱ्यांनी लावली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या