-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
२०२० हे वर्ष नेहमी स्मरणात राहील असेच राहिल. कारण जगातील प्रत्येकाला
हे वर्ष आपल्या आयुष्यातून कधीही पुसता येणार
नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या वर्षातला प्रत्येक अनुभव जीवनाचा नवरंग
दाखवणारा होता. कोरोनाने पूर्ण वर्षावर काळी छाया सोडली होती. तरीही, याच वर्षाने न्यु नॉर्मलची व्याख्याही जगाला समजावून सांगितली तसेच आरोग्याबद्दल
जागरुकही केले. या दशकातील सर्वाधिक घडामोडीचे हे वर्ष आज संपत आहे, आणि ते संपावेच असे जगातील प्रत्येकाची इच्छा आहे. ती आज पूर्ण होत आहे.
कायम स्मरणात राहतील अशा घटना
कधीही न थांबणारी, स्तब्ध झालेली मुंबई...
कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेली कोविड सेंटर
आपलं घर-गाव गाठण्यासाठी कामगारांची जीवघेणी धडपड
पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला
मुंबई लोकल थांबली - जीवनवाहिनी म्हणून ओळ्खली जाणारी मुंबई लोकल २२ मार्च २०२० ते ३० जूनपर्यंत उपनगरीय सेवा पूर्णतः बंद होती. त्यानंतर सुरूवातीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल अंशतः सुरू करण्यात आली.
सोसायट्यांची खबरदारी : सोसायट्यांनी कोविड-१९ च्या भीतीमुळे बाहेरील कुणीही व्यक्ती आपल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये शिरू नये म्हणून मुख्य गेटवर बांबूचे गेट बांधून खबरदारी घेतली.
दिवा पेटवून कोरोना योद्धांना मानवंदना :
पंतप्रधान मोदीजी यांनी घरात दिवे लावून कोरोना योद्ध्यांना सलामी करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.
कोविड योद्ध्यांवर
पुष्पवृष्टी
भारतात कोविड-१९ चे रुग्ण
वाढत असताना रुग्णांना आधार होता तो फक्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा. कारण त्यांच्याजवळ
जाण्यास कुणाला परवानगी नव्हती. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनी
या जीवनमरणाच्या प्रसंगी आपली जबाबदारी चोख पार पाडली. या योद्धांवर तसेच मुंबईतील जे. जे., नायर, आदी रुग्णालयांवर हेलिकॉप्टर तसेच फायटर विमानातून पुष्पवर्षाव करून कोविड योद्धांचा अनोखा सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.