खाकी परिधान केलेला रागीट स्वभावाचा, कडक शिस्तीचा असा काहीसा अनेकजणांचा समज आहे. मात्र, या खाकीत माणुसकी जपणारेही अनेक व्यक्तिमत्व दडलेले आहेत. अशाच अनेक व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत सहाय्य्क पोलीस निरीक्षक भीमसेन गोरख गायकवाड! भीमसेन गायकवाड यांनी अनेकदा कर्तव्यापलीकडे जाऊन माणसं जपली आहेत. त्याची अनेक उत्तम उदाहरणे देखील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या मातीत गायकवाड दाम्पत्याच्या पोटी भीमसेन यांचा जन्म झाला. कर्म मनुष्याचे जीवन घडवत असते, अशी शिकवण लहानपणापासून घरातून मिळाल्यामुळे त्यांनी बीएससी, एससीएम या पदवी संपादन केल्या. लहानपणापासून पोलीस खात्याचे स्वप्न असल्याने त्यांनी एमपीएससीची स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. ट्रेनिंग पूर्ण करून त्यांनी सन २०१२ साली मुंबई पोलीस दलाच्या वाकोला पोलीस ठाण्यातून कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली. वाकोला पोलीस ठाण्यात उत्तम कर्तव्य बजावल्यामुळे एक डॅशिंग आधिकारी म्हणून ते नावारूपाला आले. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून त्यांना गुंडविरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली. आपल्या कर्तव्याच्या अनोख्या पद्धतीने त्यांनी वाकोल्यामधील गुंडागिरी मोडित काढली. कर्तव्य बजावत असताना एक दिवशी त्यांच्याकडे एक दाम्पत्य आले. मुलीचे लग्न मोडल्याची तक्रार केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी मुलीच्या पालकांना धीर देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. पैशांचे नियोजन होत नसल्याने लग्न मोडत असल्याचे लक्षात येताच भीमसेन गायकवाड यांनी सदर मुलीला आपली बहीण माणून लग्नातील जेवनाचा खर्च स्वत: केला. अन् आजच्या घडीला सदर महिला सुखाने संसार करत आहे.
१७ जानेवारीमधे चार्ज घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी महिन्याभरात मोटारसायकल चोरणाऱ्या ७ आरोपींना अटक करून २७ महिंद्रा पिकअप मोटारसायकल जप्त केल्या. कोरोना संकट काळात पालघर जिल्ह्यात गाजलेल्या गडचिंचले साधू हत्याकांडमधील आरोपीला अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यांसह २५ लाखांचा बोगस सॅनिटायझरचा साठा जप्त करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्यांचा पर्दाफाश केला. लॉकडाऊनमधे घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना लाखमोलाचे सहकार्य केले. अशाप्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळात कर्तव्यासोबत माणुसकी जपून खाकीची प्रतिमा जनमानसात आणखी उजळवली आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.