Ticker

10/recent/ticker-posts

आनंदी राहा, फिट व्हा!

 नवीन वर्षी आपण फिट रहाण्याचा संकल्प करूयात...

-दादासाहेब येंधे


सध्या वर्क फ्रॉम होम मुळे बऱ्याच जणांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. परिणामी, आपले वजन वाढत चालले आहे. या विचाराने अनेकजण चिंतेत दिसून येत आहेत. पण, आपण प्रत्येकाने जर स्वतःवर काही बंधन घालून घेतल्यास, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचे पालन केल्यास घरच्या घरी होण्यासारखे काही व्यायाम प्रकार केले तर आपण आपले वजन वाढू न देता फिट होऊ शकाल...चला, तर मग नवीन वर्षी आपण फिट रहाण्याचा संकल्प करूयात...


वजन वाढू न देण्यासाठी वेळच्यावेळी झोप घेऊन सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. रात्री साधारणपणे दहा वाजता झोपून पहाटे सहाच्या दरम्यान उठल्यास प्रत्येकाची झोप पूर्ण होईलच. पण, त्यासोबतच तुम्ही वजन वाढीच्या समस्येपासून दूर राहाल. प्रथमतः सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यास विसरू नका. शरीर डिटॉक्स करण्यासाठी सकाळी उठल्यावर किंवा फ्रेश झाल्यानंतर लगेच कोमट पाण्याचे सेवन करावे असे केल्याने तुमच्या शरीरातील नको असलेली द्रव्यं बाहेर पडतील.



वजन वाढून देण्यासाठी व्यायाम हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही खास व्यामासाठी काही वेळ राखून ठेवणे गरजेचेच आहे. शक्यतो सकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान हलकासा व्यायाम करावा. व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मअप करायला विसरू नये. वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे होऊन व्यामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण येत नाही. किमान २५ मिनिटं व्यायाम करावा. २५ मिनिटापेक्षा जास्त वेळ व्यायाम करायचा असल्यास काही हरकत नाही. पण, व्यायाम करण्याची सवय नसल्यास कालावधी हळूहळू वाढवावा. घरच्या घरी करता येण्यासारखे काही व्यायाम प्रकार पुढील प्रमाणे...


टो टच : - खाली वाकून गुडघ्याला नाक लावावे आणि हाताने पायाची बोटं धरावीत. हे करताना गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्यावी. हा व्यायाम खाली बसून देखील करता येऊ शकतो. साधारणपणे पंधरा वेळा हा व्यायाम केल्यानंतर दहा सेकंदाची विश्रांती घेऊन पुन्हा हा व्यायाम करता येतो.



पुश अप्स :- पोटावर झोपून हात खांद्याच्या रेषा सरळ राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर हात आणि पायाच्या मदतीने शरीराचे वजन सांभाळावे. हातातून वाकून खाली वर असा व्यायाम करा. एका सेटमध्ये १५ याप्रमाणे रोज तीन सेट केल्यास आपल्याला फायदा होईल.


एअर सायकलिंग :- हा व्यायाम प्रकार पोटाचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. यामध्ये जमिनीवर झोपून हातांना डोक्याच्या मागे ठेवावे व पाय सरळ रेषेत वर उचलून सायकल चालवतोय असं समजून पायांची हालचाल करावी. पाय गोल-गोल सायकल चालवण्यासारखे फिरवावेत.



बैठका :- सर्वप्रथम ताट उभे राहून दोन्ही हात समोर ठेवावेत. त्यानंतर हळूहळू गुडघ्यात वाकून खाली बसून उठावे.  बसा आणि परत उठा ही प्रक्रिया साधारणपणे दहा मिनिटे करावी.



वजन वाढू न देण्यासाठी मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या गोष्टींचे कमीत कमी सेवन करा. तेलकट, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड या गोष्टी हळूहळू कमी करा, तसेच घरी बनवलेले जास्तीत जास्त अन्न सेवन करण्याचा प्रयत्न करा.



photo: google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या