Ticker

10/recent/ticker-posts

आरोग्यदायी दुधात भेसळ करणाऱ्या माफियांना आवरा !

भरमसाट वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे मागणीत झालेली वाढ याचा गैरफायदा भेसळमाफिया आपला नफा वाढवण्याकरिता करत आहेत... 


भारत देशाला शेतीप्रधान आणि गावागावांनी वसलेला देश म्हटले जाते. एकेकाळी भारतात मोठमोठ्या वस्ती असलेली गावे होती आणि त्यांचा मुख्य धंदा शेती व्यवसाय हा होता. प्रत्येक घराघरात त्याकाळी गाय, बैल, म्हैस, शेळ्या-मेंढ्या पाळण्यात येत होत्या. त्यांच्या दुधापासून लोक शुद्ध घी, दही, ताक, मावा, लोणी यांसारखे पदार्थ बनवून ते खाण्यासाठी वापरत असत. कालांतराने शेतीनंतर पशुपालन या व्यवसायाकडे शेतकरी वळला. परिणामी, देशात (भारतात) दुधाची नदी वाहत आहे असे म्हटले जाऊ लागले.  प्रत्येकाला स्वस्त दरात दूध मिळू लागले. त्यामुळे लोक तंदुरुस्त मजबूत बांध्याचे बनू लागले. म्हशीपेक्षा गायीच्या दुधात असलेल्या घटक द्रव्यांमुळे गायीचे दूध जास्त उपयोगी असते.


डॉक्टरसुद्धा सांगतात की, रोज दूध प्यायले पाहिजे. जमलच तर सकाळ-संध्याकाळ एक-एक ग्लास दूध प्रत्येकाने प्यायला हवे. दुधात कॅल्शियम, विटामिन, प्रोटीन, खनिज क्षार, कार्बोहायडरेटस्सहित चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक असलेली बरीचशी पोषक द्रव्ये असतात. दूध हे संपूर्ण आहार आहे, तसेच शक्तिदायक आणि बुद्धिवर्घक असून, आयुर्मान वाढवणारे आहे. बऱ्याच रोगांवर औषध म्हणूनही त्याचा वापर होतो. शरीरातील पचनक्रिया वाढवण्यासाठी आवश्यक असणारे ओमिनो अँसिड आपल्याला दुधातूनच मिळते. एक लिटर दुधातून एका दिवसात मानवाला कॅल्शियम तसेच लोह, फॉस्फरस, विटामिन , सी. डी मिळतात. लहान मुले व वृध्दांकरीता दूध पचनीय असते. दूध पोटात गेल्यावर त्याची लगेच पचनक्रिया होण्यास सुरुवात होते. जास्तीत जास्त दीड तासांच्या आत पचन होते. कमी वजन, जास्त प्रमाणात होणारी ऍसिडिटी कमी करण्यासाठी, रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी तसेच अन्य बऱ्याच रोगांवर दूध हे रामबाण औषध म्हणून मानले जाते.

 

दुधापासून बनवलेले पदार्थ दही, ताक, तूप वगैरे मानवी शरीराच्या विकासासाठी उपयुक्त असे आहे. एका वयस्कर व्यक्तीने दिवसातून कमीत कमी १५० मिली.  तसेच लहान बालकांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी कमीत कमी २५० मिली. दिवसातून एकदा प्राशन करणे जरुरी आहे. असे दुधाचे कितीही गुणगान गायले तरीही ते कमीच आहे. परंतु नीती सोडलेले राजकारणी आणि देश-विदेशांचे हित जोपासण्याकरिता विकासाच्या नावाखाली कत्तलखाना युग सुरू करून देशाच्या अनमोल पशुधनाचा नाश करीत आहेत. कत्तलखान्यांना कानुनी स्वरूप जेवढे दिलं आहे त्याचं प्रमाणं खूप कमी आहे. सरकारने धन आणि मतांसाठी आपली लक्तरे वेशीवर टांगून या कत्तलखान्यांना सबसिडीही दिली  आहे.

 

सध्या देशात ३३,४०० कायदेशीर कत्तलखाने चालतात. परंतु त्यातील कित्येक कत्तलखान्यांत गैरफायदेही उठवतात. रोज जवळजवळ लाख जनावरांची कत्तल या कत्तलखान्यांत होते. खरेतर दुभत्या कमी वयाच्या जनावरांची कत्तल करू नये. असा कायदा असतानादेखील या कायद्याला धाब्यावर बसवून दुभत्या व कमी वयाच्या जनावरांचीदेखील या कत्तलखान्यांत अमानुषपणे कत्तल करण्यात येते. त्यात आणखी भर म्हणजे देशभरात ५५० नवीन आधुनिक कत्तलखाने खोलण्यासाठी सरकार विचाराधीन असून, त्यांना करोड रुपये सबसिडी म्हणून देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे दुभत्या जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ज्या देशात एकेकाळी दुधाची गंगा वाहत होती, त्या देशात दुधाची आज वाणवा आहे. परिणामी. दुधाचा आजचा भाव २० रु.वरून ३० रु. लिटर तसेच तूप २५०-३०० रु. किलो झाले आहे. जर दुभत्या जनावरांची अशीच वर्षानुवर्षे  कत्तल होत राहिली तर काही दिवसांनी दूध १०० रु. लिटरमध्ये मिळणेसुद्धा मुश्कील होईल. दुधाच्या बाबतीत काही वर्षांपासून एक ज्वलंत प्रश् समोर उभा राहिला आहे तो म्हणजे दूध शाकाहारी की मांसाहारी? खरेतर काही देशांत पाळीव जनावरांचा सांभाळ एका कुटुंब सदस्याप्रमाणे होतो. गाय किंवा म्हशीला वासरू झाल्यावर प्रथम त्या नवजात वासराला पहिले दूध पिण्यास देऊन नंतर उरलेल्या दुधाचा खाण्यासाठी किंवा पूजाअर्चा करण्यासाठी वापर करीत असत. म्हणून ते शाकाहारी.  परंतु पशुवध केल्याने दुधाचा प्रश्न समोर उभा असून, पशुमालक आणि आणि दूध डेअरीवाले जास्त नफा मिळविण्यासाठी जे हिंसक प्रकार करतात, त्यामुळे दूध हे भारत व अमेरिकेमध्ये मांसाहारी बनलेय. गायी- म्हशीने एकदा वासराला जन्म दिल्यानंतर जवळजवळ १० महिने ती दूध देते. सामान्य पद्धतीने त्या ते वर्षांनी गरोदर राहून जवळजवळ वासरांना जन्म देतात. परंतु सध्याच्या काळात दर वर्षाला गायी- म्हशींना कृत्रिम रीतीने (इंजेक्शन देऊन) त्यांना लस टोचण्यात येऊन त्या पुन्हा दूध देऊ लागतात मालकांना वर्षभर दूध मिळते.


अशा गैरंकारभारामुळे जनावरांच्या शरीरात पचनशक्ती गर्भपिशवीचा ऱ्हास पावून त्यांना किटोसीन नावाचा रोग होतो. निकृष्ट प्रकारचा आहार वेळेवर पाणी  प्यायल्याने व अशक्तपणाने त्यांना 'रुमेनाडोसिस' नावाचा रोग होऊन-जनावरे अशक्त दिसून कमी प्रमाणात दूध देतात. त्यांच्या शरीराचा समतोलपणा व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शने, हार्मोन्स तसेच मोठ्या प्रमाणात ऑन्टिबायोटिक लसी टोचण्यात येतात. या सर्व कारणांमुळे दुभत्या जनावरांचे आयुर्मान कमी होऊन त्या दूध कमी प्रमाणात देऊ लागतात आणि त्यामुळे मग त्यांना कत्तलखान्याचा थेट रस्ता दाखवला जातो. गायी- म्हशींमध्ये ज्याप्रमाणे कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा घडवून आणली जाते ती जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी वापरली जाते. काहीजण म्हणतात की, गायी-म्हशींनी जास्त प्रमाणात आणि जाडसर दूध देण्यासाठी त्यांना ऑक्सिटोसिन नावाची लस टोचली जाते. परंतु हे साफ खोटे आहे, तर गायी-म्हशींनी आपल्या सडांतून दूध व्यवस्थित सोडावेत म्हणून ते इंजेक्शन दिले जाते. पण वर्षानुवर्षे या इंजेक्शनची त्यांना सवय लागल्याने त्यांच्या शरीराला त्याचा सवय होऊनही कधी कधी त्या दूध देईनाशा होतात. त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाला सूज, येऊन त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात. गोठेधारी  डेअरीवाल्यांकडे गुरांच्या संख्येएवढे मनुष्यबळ नसल्याने जनावरांचे दूध मशीनच्या साहाय्याने काढण्यात येते. गायी-म्हशींच्या सडांना दूध काढण्याची मशीन अडकवण्यात येऊन त्यांचे दूध काढण्यात येते. परंतु जर वेळेवर या मशीनला सडांपासून वेगळे केले नाही तर (मशीन बंद केले नाहीतर) त्या सडांतून दुधाऐवजी रक्तही मशीन खेचून घेते. परिणामी गायी-म्हशींना असह्य वेदना होतात. 


दूध डेअरीत पोहोचेपर्यंत त्यात बऱ्याच म्रमाणात भेसळ झालेली असते. दूध खराब होऊ नये म्हणून, त्यात युरिया मिसळून ते डेअरीत दिले जाते. जे मानवाच्या शरीराला हानिकारक आहे. या युरियाचे थोडे जरी प्रमाण जास्त झाले तर माणूस ते प्यायल्याने बेशुद्ध होऊ शकतो. कित्येक ठिकाणी युरिया, झिंक ऑक्साईड तर सफेद सफेद रंगाकरिता व्हायटिंग पावडर, चुना व इतर केमिकल मिसळून दूध राजरोसपणे विकले जाते; तसेच दुधावर योग्य प्रकारची जाडसर साय व फेस येण्याकरिता त्यात कलाईतांबे किंवा शिसे यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यामुळे मानवाच्या किडनीवर त्याचा आघात होऊन मेंदूच्या शिरांवर देखील मोठ्या प्रमाणात बिघाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  


ऑक्सिटोसिनयुक्त् लस दिलेलं दूध प्यायल्याने लहान मुलांना लवकर चष्मा लागण्याची स्त्री-पुरुषांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते. ज्यामुळे अकाली म्हातारपण येणे, केस गळणे, त्वचारोग यांसारख्या रोगांचा त्यांना सामना करावा लागतो. भरमसाट वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे मागणीत झालेली वाढ याचा गैरफायदा हे भेसळमाफिया आपला नफा वाढवण्याकरिता करताना दिसत आहेतकाही दिवसांपूर्वी पोलिसांनी घातलेल्या धाडींमध्ये दूध, पनीर, मावा, खावा असे पदार्थ रासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेले आढळले. गाई-म्हशींच्या दुधापेक्षा रासायनिक पदार्थ वापरून कृत्रिम पद्धतीने तयार केलेले दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ स्वस्तात तयार होतात, असे पदार्थ किंवा मिठाई सध्याच्या बाजारभावाने विकल्याने व्यापाऱ्यांना भरपूर नफा कमवता येतो. काही ठिकाणी तर हे भेसळमाफिया दूध वितरित करणाऱ्या कंपन्यांच्या पिशव्यांमधील काही दूध काढून घेऊन त्यात पाणी भरून त्या पिशव्या लायटरच्या साहाय्याने चिटकवत असताना पोलिसांना आढळून आले. असे भेसळयुक्त दूध व अत्यंत हानिकारक आहे. त्याकरिता शरीर स्वस्थायाला उपयुक्त असणाऱ्या दुधाला विकृत करणाऱ्या भेसळमाफियांना आणि ते विकणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी, भेसळीचा हा भस्मासूर वेळीच आवरला नाहीतर स्वास्थ्याला धोका निर्माण होईल.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.