केवळ स्वत:च नव्हे तर इतरांनाही त्यांनी जागृत केले पाहिजे ही काळाची गरज आहे...
जगाने २९१ व्या शतकात पदार्पण केले तरी, मुलगा न होता मुलगी झाल्यास आई-वडील, नातेवाईक नाकं मुरडताना दिसतात. आई-बाबा मला मारू नका, मला जगू द्या, मला असं दूर का लोटता असे उद्गार आहेत स्त्री पिंडाचे (स्त्री भ्रूणाचे). सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये मुलांना लग्नासाठी मुली न मिळण्याचा प्रश्न समाजामध्ये उग्र रूप धारण करू लागला आहे. मुलगी नकोच असा प्रत्येकाने केलेला विचार हेच या मागचे कारण आहे. केवळ लग्नाची समस्या म्हणून नव्हे तर सामाजिकदृष्ट्या व ढासळणारा तोल भविष्यात फार गंभीर ठरत जाणारा आहे. स्त्रियांचा मानसिक, लैंगिक, शारीरिक छळ, हुंडाबळी, बलात्कार, शोषण, गर्भपात, विनयभंग, अपहरण अशा गुन्हेगारीमुळे स्त्रियांचा आवाज क्षीण झाला आहे.
देशात ०-१४ वर्षांच्या वयोगटातील पुरुषांची संख्या १ हजार आणि महिलांची संख्या ९०० इतकी कमी आहे. इतकेच नव्हे महाराष्ट्रातील विकसित जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे, याचे कारण म्हणजे काही वर्षांपासून गर्भजल परीक्षा त्यातून स्त्री भ्रूणहत्येची समस्या. ज्याला त्याला वंशाचा दिवा मुलगाच हवा ही पारंपरिक मानसिकता कारणीभूत आहे. तितकीच गर्भातील बाळ मुलगा की, मुलगा हे पाहण्यासाठी सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता हेही कारण देता येईल. विकसित जिल्ह्यांमध्ये सहजासहजी या सुविधा उपलब्ध असल्याने या भागात मुलींचे प्रमाण झपाट्याने घटताना दिसून येते. विशेषत: यामधून कायद्यातून वेगवेगळ्या पळवाटा शोधण्याचा मार्ग अवलंबला जातो. तसं पाहता स्त्री ही आपल्या आयुष्यात सुरुवातीला वडिलांची त्यानंतर तिच्यावर नवऱ्याची जबाबदारी असल्याचे दिसून येते हे म्हणजे तिचं आयुष्य हे फक्त या तीन पुरुषांभोवती फिरते, यावरून खालील ओळी आठवतात.
“लेकीचा ग जलम ! भाड्याचा बईल...'
कधी
इसावा हुईल! देवा नव्हं
लेकीचा
ग जलम! देव देऊनी
चुकला
बैल
घाण्याला जुंपला गं जलमभरी...'
या ओळींतून भारतीय स्त्रीची विशेषत: ग्रामीण स्त्रीची किती दुरावस्था होत आहे हे स्पष्ट होते. या सर्व अत्याचारांचे बतिच्या दु:स्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. त्यामुळेच भौतिक सुखाची लालसा, नैतिक मूल्यांचा ऱ्हास यामुळे स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन 'एक उपभोग्य वस्तू' असा झाला आहे. यांमुळेच स्त्रीचा छळ, हुंडाबळी, बलात्कार व स्त्री भ्रुणहत्या 'यांचं वाढतं प्रमाण अस्वस्थ करणारं आहे.
स्त्री म्हणजे आई, बहीण, आत्या, आजी आणि बायको या सर्वांचं एक जिवंत उदाहरण. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, आशा भोसले, कल्पना चावला या सर्वांच्या प्रेरणेमुळे व उल्लेखनीय कामगिरीमुळे स्त्रियांचे मनोबल उंचावले आहे; परंतु घरात मुलगा जन्माला आला म्हणजे वंशाला दिवा मिळाला असे चित्र आपल्याला समाजात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गर्भनिदान करून जर गर्भात मुलगी आहे हे सिद्ध झाले तर ताबडतोब एखाद्या स्थानिक डॉक्टरला गाठून त्याच्याकडून गर्भपात करून घेतला जातो. ग्रामीण भागात तर असे डॉक्टर केवळ ३००० ते ५००० रुपये घेऊन गर्भाची भ्रूणहत्या करतात. मुलीच्या जन्मापासूनच तिच्यावर अन्याय व्हायला सुरुवात होते.
मुलगी जन्माला आली की, सर्वांच्याच कपाळावर आठ्या पडतात व मुलगी झाली असे म्हणून गळा काढून रडतात. ग्रामीण भागातंच नव्हे तर शहरी भागांतसुद्धा असे प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. कुणी कचरापेटीत, कुणी रस्त्याच्या कडेला, 'तर कुणी निर्जन ठिकाणी मुलीचा गर्भ टाकून पोबारा करतात; सध्या भारतात मलांच्या तुलनेत मुर्लीचे प्रमाण शेकडा ३२ टक्क्यांवर आले आहे. असे जर घडत राहिले तर भविष्यात मुलाला बायको मिळणे कठीणच पण आपल्यालाही आई, बहीण, आजी, मावशी यांच्या प्रेमाला पोरके व्हावे लागेल.
मुलगी ही माहेरच्यांचाच नव्हे तर सासरच्याही कुळाचा उद्धार करते हे समाजाला कळते, पण वळत नाही असच वाटत आहे. अंधश्रद्धाळू लोकांच्या नादाला लागून मुलीच्या गर्भाची हत्या करण्यात येते व स्त्री भ्रूणहत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसविण्यात येते. त्याकरिता स्त्री जन्म वाचविण्यासाठी स्त्री-पुरुषांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ स्वत:च नव्हे तर इतरांनाही त्यांनी जागृत केले पाहिजे ही काळाची गरज आहे. मुलगाच हवा असा आग्रह धरणे जोपर्यंत सामाजिक अप्रतिष्ठेचे होत नाही, तोपर्यंत मुलगी जातच दुर्मिळ होत जाईल नाही तर असे म्हणावे लागेल. वंशाचे दिवे, विखुरले तरी ही मिणमिणती पणती प्रकाशात राहील अखंड एक कोपरा ठेवा तिच्यांसाठी, नाही तर जगणं हे कुणासाठी......?
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.