महिलांसाठी म्हटले जाते की, ती एक शक्ती आहे. ती पाहिजे त्या मार्गाने बळू शकते. सकारात्मक रूपाने वळाली तर खरोखर आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती तारणहार ठरू शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यात एका स्त्रीमुळे संपूर्ण कुटुंबाचा, कुळाचा उद्धार झाला आहे. एवढी समजदारी, संयम, प्रेम, नीडरता अशा सगळ्या गुणांनी ती अग्रेसर असते. (भले डीग्री नसेल) आणि आजकाल असे निदर्शनास येते आहे की, डिग्री आहे, शिकलेली आहे, पण लग्न करून आताच गृहप्रवेश केला, तेवढ्यातच कलह सुरू झालेत. वर्षापूर्वीचे जुने वाप-दादांचे घर विकले जातेय, होत्याचं नव्हतं होऊन जातेय. सगळं क्षर्णाधात सर्वनाश होऊन जाते. असो, असे होऊ नये त्यासाठी प्रत्येक महिलेला स्वत:वर काही प्रयोग करावे लागतील त्यासाठी काही सूचना.
१. परफेक्ट होण्यापेक्षा, स्वत:चे 'बेस्ट'
देण्यासाठी झोकून द्या.
२. स्वतःचंलक्ष (तंदुरुस्ती) स्वत:वरच ठेवा. दुसऱ्यावर
विसंबून राहू नका.
३. स्वत:च्या आंतरआत्म्याचा
आवाज ऐका. (बाह्यगुरू जसे बाबा, बुवा
किंवा वर बसलेल्या देवावर किंवा ग्रहांवर नशिबाचा हवाला देऊ नका.) गुरू किंवा भगवान,
ईश्वर तुमचे मार्गदर्शक होऊ शकतील. पण,
त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे.
४. स्वत:ची
जबाबदारी स्वत:च घ्या.
५. स्वत:ची
चूक झाली असेल तर
मनोमन अथवा देवासमोर उभे राहून क्षमा
मागावी आणि त्यात सुधारणा करा. (दुसऱ्याच्या चुकांचा हिशोब
ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. वेळ
प्रत्येकाला
सूचित करेल) ही गोप्ट श्रमाची
मेहनतीची
आहे.
६. दुसर्या कुटुंबासाठी
किंवा व्यक्तींसाठी तुम्ही 'जजमेंट' करू नका.
७. मुलांना तुमचा
अमूल्य वेळ द्या ज्यात खाणे-पिणे, शिकविणे, शिव,ण्याबरोबरच इतर
अनेक कितीतरी मूल्यांच्या गोष्टीही असतील.
८. नेहमीतुम्ही तुमच्या
कुटुंबाला प्रथम प्राधान्य द्या.
९. ऑफिस, ' करियर आणि कुटुंबात संतुलन राखा.
१०. मुलांना
नको असलेले सल्ले देऊ नका. (त्यांच्या मागे-पुढे ताट घेऊन फिरणे सोडून द्या.) त्यांच्या
खाण्या-पिण्याच्या सवयी बिघडू नका. जसे- बिस्कीट, चॉकलेट रोज-रोज पाहिजे वगैरे.
११. घरात बसून
काम करू शकत असाल तर उत्तम. घराजवळ काम मिळाले तर चांगले. म्हणजे अचानक एखादा प्रसंग
ओढावला तर चटकन घराकडे येता येईल.
१२. तुमच्या
कुटुंबाचे ध्येय निश्चित करा.
१३. आवडी-तिडवी
कामे जी तुमची शक्ती कमजोर करतील, अशी कामे करू नका. जसे, मित्रांबरोबर टवाळकी वगैरे.
१४. तुम्हाला
तुमची कामे लाईनसरच करायची असतील पण योग्य ती निवडून करा. टाईमपास करू नका.
१५. पतीला किंवा
मुलीला तुमच्या शिवाय चालणारच नाही असे होऊ देऊ नका. अशी स्थिती येऊ देऊ नका. गरज असेल
तेव्हा (मन होईल तेव्हा) २ ते ४ दिवस घर दुसऱ्यावर सोपवून निघावे लागत असेल तेव्हा
ती व्यक्ती जबाबदारी घेऊ शकेल अशी बनवावी.
१६. कुठल्याही
संबंधात मान-सन्मान महत्त्वाचा असतो. पतीला किंवा पत्नीला दुसऱ्यांसमोर उलट-सुलट बोलू
नका. एक-दुसऱ्याचा मान सन्मान, आदर राखणे खूपच गरजेचे आहे
१७. मुलांबरोबर
त्यांच्या पालकांचे जवळचे संबंध खूपच महत्त्वाचे असतात. त्यासाठी तुमच्या पतीला किंवा
पत्नीला योग्य आधारद्या. ते तुमच्या मुलांच्या विकासासाठी फायद्याचे ठरेल.
१८, बऱ्याच
महिलांना एकटे राहण्याची भीती वाटते. असलामती वाटण्याच्या भावनेमुळे कोणाबरोबरही लान
करतात. असे करू नये. लग्न हे पवित्र बंधन आहे. ज्याचा पाया फक्त आणि फक्त प्रेमावरच
मजबूत ग्राहू शकतो. बरेचजण पैसा, शिक्षण, घर बघून लग्न करतात, पण समोरील व्यक्ती व्यसनी
किंवा रोगी आहे याचा विचार करीत नाहीत, असा आंधळेपणा करू नये.
१९. सत्य असे
आहे की, संबंध जोडल्यानंतर बरेचसे लोक एकटेपणाचा अनुभव अनुभवतात. (कारण दोघांमध्ये
काही संवाद होत नाही.) दोघांनाही प्रेमाची गरज असते (पण कोण देणार? जवळ आहेच नाही तर?
एखाद अपवाद असू शकतो.)
२०. पती-पत्नी
की, पालक-मुले यांच्यामध्ये 'मत-मतांतरे' असू शकतात पण अशा वेळेस डोके फिरवून नको ते
निर्णय घेण्यापेक्षा फक्त प्रेम आणि आत्त्मीयतेनेच निर्णय घ्या.
२१. सगळं मीच
करतो-करते, असं सारखे-सारखे बोलून एकमेकांना दुखवू नका. उत्पन्न असेल तर धोबी, कामवाली
वगैरेंची मदत घ्यावी पण तेथेही विषमताच निदर्शनास येते. आणि अशा मदतीनंतर स्वत: बाकी
दुसरीकडे वेळ-शक््ती कुठे वापरायच्या त्याचं स्व-अवलोकन करणे गरजेचे आहे. काही वेळा
असा फावला वेळ फक्त कीटी-पार्टी, शॉपिंग, चॅटिंग, निंदा नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यातील
कुसळ बघण्यात आणि त्याची तक्रार करावी. असे तर तुम्ही करत असाल तर ते आजपासून सोडून
द्या.
२२. छोट्या-छोट्या
गोष्टींना कृपया उग्र स्वरूप देऊ नका.
२३. पतीला नेहमी
त्याच्या कुटुंबीयांची तक्रार करणे, टोमणे मारणे असे अधम कार्य कुशल या शोभा देत नाही.
त्यात स्वतःचच नुकसान.
२४. गरजवंतांच्या
मदतीसाठी नेहमी तत्पर राहा. त्यांना पुढे जाण्यास मदत करा. माझं-तुझा यापेक्षा आपल
म्हणण्यास तयार राहा..
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.