स्वत:ला वाटेल तसेच मुलांनी करावं असा आग्रह खरेतर पालकांनी ठेवूच नये
समृद्धी बर्याच वेळापासून विडीयो गेम खेळत छोाती. हे पाहून तिची आर्ह नलिनी रागावून म्हणाली, 'बेटा समृद्धी, पहिला तू तुझा होमवर्क कर, नंतर विडीयो गेम खेळ.”
ही गोष्ट फक्त समृद्धीचीच नाही
तर प्रत्येक पालक या समस्येने
ग्रासले आहेत. त्यांना असं वाटतं की,
आपण मुलांना जबरदस्तीने धमकावून, ओरडून आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून घेऊ शकू. परंतू,
ते साफ खोटं आहे
कारण की, मुले
पालकांना अशाप्रकारे फसवतात की, पालकांनी तसा
जराही विचार केलेला नसावा. हाच खरा बालिशपणा आहे
तो पालकांचा, स्वत:ला वाटेल
तसेच मुलांनी करावं असा आग्रह खरेतर पालकांनी ठेवूच नये.
याबाबतीत
मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी
मुलांच मन खेळण्याकडे असेल,
टिव्ही बघण्याकडे असेल त्यावेळी त्यांना अभ्यास करण्यासाठी पालकांनी जबरदस्ती करणे योग्य नाही.
तर मुलांच्या मनातील विचार समजणे गरजेचे आहे. मुलांना जेव्हा
अभ्यास करायला सांगाल त्यावेळी त्यांच्यावर नजर ठेवा की,
ते अभ्यास करत आहेत की नुसताच
टाईमपास.
मुलांचे खेळण्याकडे मन असेल तर त्यांना पहिले मनसोक्त खेळू द्या. नंतरच त्यांना होमवर्क करायला सांगा.
मुलांचे अभ्यास करण्यात लक्ष नसेल त्यावेळी त्यांच्यावर तुम्ही जबरदस्ती कराल पण, ते तेव्हा अभ्यासात लक्ष देणार नाहीत. पण, ज्यावेळी त्यांचा अभ्यास करण्याचा मूड असेल तेव्हा ते कमीत कमी वेळेत बरोबर आपला अभ्यास पूर्ण करतील. त्यांचा मूड नसेल त्यावेळी ते एक अक्षरही मनापासून वाचणार नाहीत.
कधी-कधी पालक अति प्रमाणात मुलांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करण्यासाठी दबाव आणतात, पण याचा परिणाम असा येतो की, त्यांचं मन अभ्यासावरून उडते व त्यांची इच्छा असूनही ते अभ्यास करू शकत नाहीत.
तात्पर्य
हे आहे की, मुलं
जे काम पहिले करावयास
मागतात ते त्यांना पहिले
करू द्या. ते खेळू इच्छितात
तर त्यांना खेळू द्या. आराम
करायचा असेल की, कार्टून बघायचं असेल तर त्यांना
मनाई करू नका.
दहा-पंधरा मनं तर कुणालाही
नसतात. ते तर एकच
असते, मुलं तर एका
वेळेला एकच काम करू
शकतात. ते त्यात रूची,
आवड-निवड ठेवतात. मग
अभ्यास करताना त्यांचं मन का लागत
नाही, याचं कारण शोधा.
आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका.
कधी-कधी मुलं अभ्यासापासून दूर पळतात, त्यांना अभ्यास आवडत नाही. परतु अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे त्यांना वेळोवेळी पालकांनी पटवून देणे गरजेचे आहे.
जर मुले तुमच्या गप्पा
गोष्टी ऐकत असतील किंवा खेळत असतील तर त्यावेळेस त्यांना चुकूनहि बोलू नका की,
“ जा अभ्यास करायला बस !'' त्यामुळे जाणते अजाणतेपणामुळे
तुमच्या विरूद्ध कठोर बनतात व
त्यांना तुमचा राग येतो.
कठोरता
मुलांच्या सुद्रुढ भविष्यासाठी कधीठी चांगली नाही. तेथे त्यांच्याबरोबर प्रेमाने,
गोड बोलून वागा. त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोला. त्या बोलण्यातून ते
काहीतरी बोध घेतील असे
बोला.
ज्यामुळे
त्यांची तुमच्याबरोबर चांगली मैत्री बनेल आणि मग
नंतर बघा. काय चमत्कार
होईल. तुमची प्रत्येक गोष्ट मुले ऐकतील...आणि तुम्ही त्यांना अभ्यास करा म्हटले की
ते अभ्यास करावयास बसतील. त्यांना तुम्ही धमकावयाची गरजच भासणार नाही.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.