उत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू लक्षात घेउन तो उत्सव साजरा झाला पाहिजे.
जेणेकरून, त्या उत्सवाची मजा लुटता येईल
-दादासाहेब येंधे
सध्या
उत्सवांचे दिवस आहेत. यात
जास्त करून हौशी तरुणांचा
सहभाग
मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात गोकुळाष्टमी - दहीहंडी सारखे उत्सव आपल्याकडे वर्षानुवर्षे साजरे होत आहेत. अशा सणांमध्ये
समाजातील सर्वच स्तरांचा सहभाग असणे गरजेचे आहे, उत्सवाच्या निमित्ताने
असंख्य लोक एकत्र येतात,
त्यांच्यात परस्पर संबंध वाढावा, हा उत्सवांचा मूळ
हेतू असतो. पण, गेल्या काही
वर्षापासून या उत्सवाने बाजारू स्वरूप धारण केल्याचे वेळोवेळी
निदर्शनास येत आहे. या उत्सवात
राजकीय व्यक्तींचा मोठा सहभाग असतो. यात
राजकारण्यांची आयती पोळी भाजून
निघत असली, तरी सामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम
होणार, याची त्यांना जराही
चिंता नाही.
दरवर्षी साजरा होणा-या दहीहंडी
उत्सवातील घटना पाहिल्या की, याची
प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. राज्यात
दरवषी जागोजागी दहीहंडी ऊत्सव मोठ्या जल्लोषात पार पडतो. त्यासाठी
विविध राजकीय पक्ष आपल्याच पक्षाचा प्रचार व्हावा, म्हणून आधीच मंडळवाल्यांना हेरून ठेवतात व
आमिष म्हणून स्वतःच्या नावांच्या व पक्षाच्या बॉड्या, हाफ पॅन्ट
तसेच मोठमोठ्या रकमा जाहीर करतात.
त्या मिळविण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ सुरू राहते. मोठमोठे
थर रचून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आखला जातो. त्या
फोडताना अनेक गोविंदांना जखमी व्हावे लागते.
दहीहंडी फोडताना ऊचावरून पडून डोक्याला मार
लागणे, हात - पाय मोडणे, चक्कर
येऊन पडणे, खरचटणे या गोष्टी आता
नवीन राहिलेल्या नाहीत, असे म्हटल्यास वावगे
ठरू नये. दरवर्षी असे
प्रकार राज्यात ठिकठिकाणी होतच असतात. दहीहंडी
फोडण्याकरिता एकावर एक माणसांचे थर
रचले जाऊन अधिकाअधिक ऊंच
थर कोणाचा, यासाठीही वेगवेगळ्या पथकांमध्ये स्पर्धा लागलेली दिसून येते. दहीहंडीचे थर रचणे, हे
एक कौशल्याचे व नियोजनबद्ध काम
असते. वरच्या थरावरील एखादा गोविंदा पडला, तर त्याला खाली
झेलण्यासाठी बराचसा
घोळका असणे गरजेचे असते.
खालच्या थरावर पुरेशी व योग्य माणसे
असल्याशिवाय थर लावले जाऊ
नयेत. कारण असे विनाकारण धाडस करणे धोक्याचे
ठरू शकते. पण बक्षिसांच्या व चढाओढीच्या
आशेने अनेक पथके पुरेशी
काळजी न घेता, एकावर
एक थर रचत असतात. योग्य
ती काळजी न घेतल्यामुळे उंचच
उंच थर लावल्यास वरील थरावरचा गोविंदा
खाली पडण्याची दाट शक्यता असते.
खालच्या
थरावरील गोविंदानी त्याला न सावरल्यास तो
जमिनीवर आपटून जखमी होण्याची अथवा
मृत्युमुखी पडण्याचीही भीती असते. दरवर्णी मुंबईतील के. ई. एम्,
जे.जे, तसेच सायन
रुग्णालयात असे बरेचसे गोविंदा जखमी अवस्थेत अथवा
मृत्युमुखी पडलेले दिसून येतात. खरेतर गोविंदा पथकांना पुरेसे मनुष्यबळ असल्याशिवाय उंच थर लावू
न देण्याची व्यवस्था करायला हवी. आधी पुरेसे
मनुष्यबळ दाखवा आणि मगच थर
रचा, असे बंधन त्यांच्यावर घालायला
हवे. राजकीय मंडळींनी लाखांच्या वर बक्षिसांची रक्कम दिल्यामुळे अधिकाअधिक
बक्षिसे असणा-या ठिकाणीच
गोविंदा पथकांची
अधिक गर्दी दिसून येते. बक्षीस
मिळविण्याच्याच हेतूने ही भाऊगर्दी झालेली
असते, हे काही वेगळे
सांगण्याची गरज नाही.
पूर्वीही
उंच थर रचून दहीहंडी
फोडण्याचा कार्यक्रम व्हायचा. श्रीकृष्ण जयंतीच्या (कृष्णाष्टमी) दुसऱ्या दिवशी दहीकाला, दहीहंडी अशी नावे ह्या उत्सवाला
शोभतच नाहीत. 'गोयंदा' हया शब्दातच गोंधळ, 'जल्लोण, चढाई, राडा हे सारं
येतं. उल्हासाचा इतका मोठा सण इतर
धर्मात, इतर देशांत क्वचितच
असेल, याचं कारण बहुधा हा सण कष्टऱ्यांचा
आहे. 'गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या
तान्ह्या बाळा',
असे म्हणताना खोडकर, दंडेल कृष्णाच्या सगळ्या पौगंडलीला डोळ्यासमोर येतात. सुंदर गाण्यांची रेलचेल असायची, महिला वर्ग खिडक्यांमधून या
गोविंदांच्या अंगावर फुगे मारायच्या, बादली
भरून पाणी ओतून गुपचूप
आत निघून जायच्या, तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे,
गोपाळा म्हणत खिडक्या, गॅलरीतल्या वहिन्या/गावश्यांना छेडणे असा कार्यक्रम ठरलेलाच
असायचा. एकदम श्रीकृष्ण टाईप' हंड्या पाहण्यासाठी बराचसा जनसमुदाय रस्त्यावर असायचा. त्याची मजा काही औरच
होती. तथापि तेव्हाची दहीहंडी साहसी व सांघिक असायची.

आज त्यामध्ये राजकीय पक्षांनी घुसखोरी केली. त्यातूनच बक्षिसांसाठी राजकीय मंडळी स्वत:चे नाव मोठे
व्हावे, म्हणून बक्षिसांसाठी लाखो रूपये मोजत
आहेत. तो पैसा, बक्षिसरूपाने
मिळविण्यासाठी उंचच
उंच थर रचून गोविंदा
पथके जीवावर उदार होतात, ज्यातून दरवर्षी जखमी होत असलेल्या
गोविंदांची संख्या वाढत जात आहे. एकंदरीत
हे सर्व चित्र पाहता,
आता उत्सवांचेही राजकीयकरण व व्यापारीकरण झाल्याचे
स्पष्ट होते. त्यातूनच अनेक दुर्घटना घडत असतात. असे
करण्याऐवजी उत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू लक्षात
घेउन तो उत्सव साजरा झाला पाहिजे. जेणेकरून
त्या उत्सवाची मजा लुटता येईल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.