खरेतर हा मृत्यू म्हणजे लोकांच्या हलगर्जीपणाचा आणि स्वतःच्याच जीवनाबद्दलच्या बेफिकिरीचा आहे. रेल्वे रूळ ही काही फिरायला जाण्याची किंवा त्यावर बसून गप्पा मारण्याची जागा नाही. खरे तर रेल्वे रूळ ओलांडून जाणे, हा गुन्हा आहे.
दादासाहेब येधे
पंजाबामध्ये दसऱ्याच्या दिवशी 'रावणदहना'च्या निमित्ताने कडाडलेल्या दारूगोळ्यांच्या दणदणाटात रेल्वे गाडीचे हॉर्न ऐकू ण आल्यामुळे त्या गाडीखाली चिरडून जवळजवळ ६१ लोकांना प्राणास मुकावे लागले. अंगावर काटा आणणारी ही घटना असून, त्याबद्दल आपल्याच घरातील माणूस दगावल्याची भावना देशभरात निर्माण झाली. अमृतसरजवळ असलेल्या दोडा रेल्वे फाटकावर ही दुर्घटना घडली, तेव्हा तो रावणदहनाचा सोहळा पाहण्यासाठी आधीच लोक थोड्या उंचावर असलेल्या रेल्वे रूळांवर जाऊन उभे राहिले होते.
रावणदहन
झाल्यावर आगीने भडका घेतला आणि
आणखी काही लोकांनी स्वतःला
वाचवण्यासाठी रेल्वे रूळांवर धाव घेतली; पण
प्रत्यक्षात ते मृत्यूला आमंत्रण ठरले.
हे लोक रूळांवर गेले,
त्याचक्षणी जालंदरहून अमृतसरला जाणारी रेल्वे भरधाव वेगाने आली आणि त्या
गाडीखाली ६१ लोकांना मृत्यू
झाला. तर कित्येकजण जखमी झाले. आत्तापर्यंत
आपल्या देशात झालेले रेल्वेचे बहुतांशी अपघात हे मानवीय चुकीमुळेच
झाल्याचे दिसून येते. यात नैसर्गिक आपत्तीमुळे
घडलेला अपघात क्वचित घडलेला असावा. पण, संबंधित कर्मचाऱ्यांनी
आपले काम प्रामाणिकपणे केले
नाही किंवा त्यांची चूक झाली किंवा
लोकांच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडले
आहेत. यातील एखाददुसरा अपघात सोडला तर बाकीचे अपघात
होणे आपल्याला नक्कीच टाळता आले असते. रेल्वे
फाटकांदरम्यान मानवाच्या
चुकीमुळे अपघात होऊन हजारो नागरिकांना
आजपर्यंत आपले जीव गमवावे लागले
आहेत. पंजाब- अमृतसरमधील अपघात हा मानवी चुकीमुळेच
झाला आहे. यात शंकाच
नाही.
खरेतर
हा मृत्यू म्हणजे लोकांच्या हलगर्जीपणाचा आणि स्वतःच्याच जीवनाबद्दलच्या
बेफिकिरीचा आहे. रेल्वे रूळ
ही काही फिरायला जाण्याची
किंवा त्यावर बसून गप्पा मारण्याची
जागा नाही. खरे तर रेल्वे
रूळ ओलांडून जाणे, हा गुन्हा आहे.
तरीही कोणत्याही क्षणी गाडी येण्याची शक्यता
असतानाही, हे लोक रूळांवर ती
'प्रेक्षक गॅलरी' असल्याप्रमाणे जमा झाले होते.
पंजाब सरकारने या अपघाताची चौकशी करण्याची समिती नेमली आहे. या घटनेचे सर्व तपशील चौकशीतून बाहेर येतील आणि दोषी कोण हे कळेल; परंतु लोहमार्गावर उभे राहण्याच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. रेल्वे रुळांवर जाणे हाच खरेतर गुन्हा आहे. सामाजिक जीवनात जगत असताना काहीतरी शिस्त अंगी बाळगावी लागते. पण, सध्या सार्वजनिक जीवनातली शिस्त मोडणे, म्हणजे आपण इतरांपेक्षा काहीतरी नवीन करीत आहोत, मोठा पराक्रम गाजवीत आहोत की काय अशा आर्विभावात लोक वागत आहेत. स्वतःच्या जीवाची किंमत ओळखण्याची सवय भारतीयांना नाही हे यातून स्पष्टपणे जाणवते. मानवी जीवन हे मौल्यवान आहे आणि ते जपले पाहिजे. घडून गेलेल्या या अपघातातून तरी नागरिकांनी बोध घ्यावा.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.