Ticker

10/recent/ticker-posts

झुमका गिरा रे...

 कानातलेसुद्धा फॅशनेबल असणे गरजेचे 

-दादासाहेब येंधे

सध्याच्या फॅशनमध्ये आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपणदेखील तशा फॅशन, स्टाइल केल्या पाहिजेत. काही वेळेस कपड्यांमध्ये विविधता आणून आपण स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, मार्केटमध्ये उठून दिसण्यासाठी जरा हटके स्टाईल देखील महत्त्वाची असते. आपण एखादा ड्रेस किंवा कुर्ता परिधान केला की, प्रथम लक्ष जाते ते कानाकडे... कपड्यांसोबतच आपल्या चेहऱ्याला शोभतील असे कानातलेसुद्धा फॅशनेबल घालणे गरजेचे आहे. तरच आपण इतरांपेक्षा उठून दिसू...



सुंदर दिसण्यासाठी किंवा लग्नाला जायचं म्हटलं की, अगदी साडीपासून ते कानातले झुमक्यांपर्यंत सर्व काही परफेक्ट असलं पाहिजे. कारण नुसतं मेकअप, साडी नीटनेटकी असून फायदा नाही तर कानातलेदेखील तितकेच स्टाईलीश हवेत. प्रत्येक चेहऱ्याच्या साईजनुसार मार्केटमध्ये कानातले उपलब्ध आहेत. चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला कानातले शोभून दिसतील असेच कानातले वापरावेत.



गोल चेहरा : तुमच्या गालाला, चेहऱ्याला लांबी प्रधान करण्यासाठी लांबसर आणि पातळ कानातले असायला हवेत. गोल चेहरा असणाऱ्या महिलांनी मुलींसाठी ड्रॉप रिंग्स किंवा वळलेले रिंग्सदेखील छान दिसतील.



चौकोनी चेहरा : तुमचा चेहरा चौकोनी (स्क्वेअर) असल्यास तुमच्या चेहऱ्याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा. रुंद कानातले वापरण्यापेक्षा लांब कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. चौकोनी आकाराचे दागिने सुट करणार नाही, तो टाळलेला बरा..



हार्ट शेप चेहरा : हृदयाकार  चेहऱ्याकरिता झुमके शोभून दिसतील. वरील बाजूने पातळ तसेच खालील बाजूने रुंदीला जास्त असणारे झुमके हार्टशेप असणाऱ्या शरीराला शोभून दिसतील. 



ओव्हल फेस : या चेहऱ्याचा आकार सर्वोत्तम आहे. बऱ्याच महिलांचा चेहरा हा  ओव्हल फेस आकारात असतो. या चेहऱ्यावर प्रत्येक साईजचे स्टड, ड्रॉप, झुमके सूट होतात.








Photo:google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या