केशरमुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते व बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते
-दादासाहेब येंधे
केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे. किचनमध्ये केशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, केशर अत्यंत महाग असून त्याला प्रचंड मागणी देखील आहे. बिर्याणीसाठी देखील केसरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साधारणपणे केसरचा वापर हा खाद्यपदार्थांमध्ये केला जातो असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधी देखील दूर होतात. त्याचे औषधी गुणधर्मदेखील तितकेच आहेत. चला तर मग केशरचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया...
स्मृती वाढविण्यासाठी - स्मृती वाढवण्यासाठी केसराचा उपयोग होतो. अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी केसर हा एक नैसर्गिक उपाय आहे. हलवा बनवून त्यावर किंवा दुधात केशर मिसळून ते पिण्यासाठी द्यावे. त्यामुळे वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशर उपयुक्त ठरते.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी - केशरमुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते व बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. परिणामी, हृदयविकाराला आळा बसतो तसेच उच्चरक्तदाबाचा धोका देखील कमी होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शांत झोपेसाठी - सध्याच्या धकाधकीच्या युगात पुरेसे झोप मिळणं फारच दुरापास्त झालं आहे. कामाचा ताण, सतत होणारा स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर यामुळे निवांत झोप लागत नाही. खरेतर निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दररोज कमीत कमी आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. मात्र, आजकाल अनेकजण उशिरा झोपतात अन अपुऱ्या झोपेच्या समस्येला सामोरे जातात. परिणामी सकाळी डोळे लाल होतात. पुन्हा झोपावेसे वाटते. चिडचिडेपणा येतो. कामावर लक्ष लागत नाही. म्हणून शांत झोपेसाठी उपाय म्हणून रात्री झोपताना केशराचे दूध प्यायल्याने तुम्हाला शांत झोप लागेल. पण प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळे असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घेतलेला योग्य राहील.
केशरामध्ये विटामिन ई, फॉलिक ऍसिड, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, मॅग्नेशियम यासारखे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका तर कमी होतोच, शिवाय सौंदर्यासाठीही केशर उपयुक्त ठरते. केशरामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढले असेल तर केशर पाणी नियमितपणे दूध पिणे हा त्यावरचा उत्तम उपाय होऊ शकतो. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्याचे काम केशर करते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.