हा खेळ सावल्यांचा
-दादासाहेब येंधे
खूपसे हळवे असे हे नजाकती गीत. नव्या सासुरवाशीणींना आषाढ पाघोळयांसाठी ५-७ दिवस माहेरी घेऊन जाण्याची किंवा माहेरी पाठवण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. पावसाच्या सरी म्हणजे जणूकाही माहेरवाशिणी आहेत आणि उसंतीचे चार क्षण संपवून त्यांना आता पुन्हा सासरी जावे लागत असल्यामुळे रडू फुटले अशा प्रकारचे हे वर्णन या शब्दरचनेतून अनुभवायास मिळते.
गाणं ऐका...👇
हे गीत म्हणजे एक प्रकारचे रूपक काव्य आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलींचे चेहऱ्यावरचा निखार, त्यांचे लकाकणारे रूप, त्वचेवरचा हळदी रंग, हसू आणि आसू, ऊन-पावसाचा खेळ हे सारे समरसून एक झालेले आहे. त्या नवविवाहित मुलींची पाठवणी करताना माहेरच्या नातेवाईकांच्या मनाची अवस्था काय होते, याचे ही कारुण्यपूर्ण वर्णन ह्या शब्दरचनेतून आपल्याला ऐकायला मिळते. म्हणूनच या गीतातील भावना आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्या आपल्या जाणिवांशी नाते सांगतात.
हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील हे गीत असून संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं असून गीत सुधीर मोघे यांचे आहेत. तर स्वर अनुराधा पौडवाल व आशा भोसले यांचे आहेत.
आला आला वारा संगे पावसाच्या धारा..
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाई लकाकतं रुप
माखलं गं ऊनं जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणींत आसवांचा झरा
आजवर यांना किती जपलं जपलं
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं
चेतवून प्राण यांना दिला गं उबारा
येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुललं बाई पावसानं मुलूख ग सारा
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.