मुंबई, दादासाहेब येंधे : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे संकल्पनेनुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे परिसरामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याकरिता पोलीस ठाणे समोरील प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस आमदार व महिला दक्षता समिती सदस्य यांच्याकडून केक कापण्यात आला. महिला रेल्वे प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाकरिता सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे मधील महिला पोलीस अंमलदार, रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी येथील महिला कर्मचारी, सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथील तिकीट तपासणी महिला कर्मचारी, सीएसएमटी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य तसेच महिला प्रवासी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सदर उपक्रमाचे महिला रेल्वे प्रवाशांकडून स्वागत व कौतुक करण्यात आले. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.