Ticker

10/recent/ticker-posts

आहारात बदल करून उन्हाळ्यात राहा तंदुरुस्त

 आला उन्हाळा तब्बेत सांभाळा


-दादासाहेब येंधे 

निसर्गाच्या नियमानुसार वातावरणात बदल होणं स्वाभाविक असतं. निसर्गाच्या नियमानुसार बदल वेळोवेळी होतच असतात. ते आपल्या हातात नसतं. मात्र, या बदलांना जुळवून घेणं आपल्या हातात असतं. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या आपल्याला भेडसावतात. मग, डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. पण, ऋतुमानानुसार आहारात बदल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. यासाठी हा आहार नेमका कसा असावा, आहारात बदल करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.


उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते. आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अपचन, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे या समस्या उन्हाळ्यात प्रामुख्याने उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार तसेच आहार-विहारानुसार हे लक्षण कमी अधिक असतील देखील मात्र, या वातावरणाशी जुळून घेणे थोडंसं कठीण होतं. आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराचे तापमान नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करत असते. मेंदूतील हायपोथँलीमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरातील पाण्याची कमतरता भासू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो आणि तहान भागवण्याची प्रक्रिया घडते. खूप थंडी असो किंवा उष्णता शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रित केले जाते. मात्र, ही पातळी नियंत्रण राखण्याची यंत्रणा नीट काम करून न शकल्यास समस्या उद्भवतात तसं उन्हाळ्यात घाम येऊन हे तापमान योग्य राखले जातं. मात्र, यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणं गरजेचं असतं. या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट चयापचय क्रियेवरून हिटस्ट्रोक, सनस्ट्रोक होऊन अस्वस्थ वाटणं, चक्कर येणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणं गंभीर स्वरूप धारण करून कधी कधी आपल्या जीवावरदेखील बेतू शकते. पण, आहारात योग्य तो बदल केल्यास उन्हाळ्यात देखील तंदुरुस्त राहाता येईल. उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे याची माहिती...



भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. भरपूर म्हणजे फक्त पाणी पितंच राहणे नव्हे तर जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा कंटाळा न करता पाणी प्यावे. शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. मातीच्या माठातील पाणी पिणे केव्हाही चांगले.


जिरे पाणी

आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या मसाल्यापैकी एक म्हणजे जिरे. या जिऱ्याचे विविध पदार्थांत आपण वापर करतो. त्याचबरोबर जिरे विविध आजारावर सुद्धा परिणाम करत असतात. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही जिरे पाणी घेतल्यास नक्कीच फरक पडेल. रात्री एक ग्लास पाणी जिरे भिजत ठेवावे आणि सकाळी ते जिरे पाणी प्यावे. उष्णता तर कमी होतेच; त्याबरोबरच वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल.


सब्जा पाणी

उन्हाळ्यात बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होत असतो. सब्जाचे बी हे तुळशीचे बीयांपेक्षा थोडं मोठे आणि करड्या रंगाचे असते. सब्जा पाण्यात घातल्यावर फुगते हे सब्जाचे पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सब्जाचे बी पाणी, दुधातून किंवा सरबतातून घेतल्यास उष्णतेचे विकार लवकर बरे होतात.



कोकम सरबत

कोकम सरबत उष्णतेवर गुणकारी आहे. कोकम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. यात साखर, चवीपुरते काळे मीठ किंवा जिरेपूड टाकून घ्या आणि त्या पाण्याचे सेवन करावे.




ताक

ताक पिणे हा एक पर्याय आहे. जो उष्णता रोखण्यास आपल्याला नेहमी मदत करेल. उष्णतेमुळे थकल्यासारखे जेव्हा वाटतं तेव्हा ताक पिल्याने एनर्जी येते. ताक रोज दुपारी प्यावे. रात्रीचे ताक शक्यतो पिऊ नये.




Photo:google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या