Ticker

10/recent/ticker-posts

सोशल मीडियाचा वापर सुरक्षितपणे करा

अशाप्रकारे सुरक्षित ठेवा अकाउंट

सायबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याचा दुरुपयोग करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, सोशल मीडिया वापरू नका. पण, ते करताना त्यात सावधगिरी बाळगा. सुरक्षितपणे आपले पासवर्ड कुणालाही कळणार नाहीत असे ठेवा.

-दादासाहेब येंधे


ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहेत. एका चुकीच्या लिंकवर क्लिक आणि होत्याचं नव्हतं अशी स्थिती सध्या अनुभवयास मिळत आहे. आतापर्यंत अनेक लोकांना असा फटका बसला आहे. तसेच गुन्हेगारांचा छडा लावणंही कठीण झालं आहे.


सोशल मीडियाचा वापर करत असताना फसवणूकीचा सामना सध्या मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यूजर जर सावध राहिला नाही तर त्याचे नुकसान होऊ शकते. 

तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात संपर्क आणि संवाद यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून सोशल मीडिया पुढे आला आहे. त्याच्या माध्यमातून आपण आपले म्हणणे एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास आपणास मदत होत आहे. तसेच जगभरातील माहिती मिळवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी देखील आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा वापर करता येत आहे. खरेतर त्याच्याशी प्रत्येक वर्ग जोडलेला आहे. पण, युवकांमध्ये सोशल मीडिया जास्त प्रमाणात लोकप्रिय आहे. प्रसिद्ध होण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीमध्ये लपलेली असते  त्यासाठी सोशल मीडिया एक सोपे माध्यम आहे. पण, त्याचा वापर करताना थोडासाही निष्कळजीपणा धोकादायक करू शकतो.


पासवर्ड आणि डेटा चोरी किंवा लीक होणे, हॅकिंग असे त्रास आता सामान्य गोष्टी झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याचा दुरुपयोग करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, सोशल मीडिया वापरू नका. पण, ते करताना त्यात सावधगिरी बाळगा. सुरक्षितपणे आपले पासवर्ड लक्षात ठेवा.


पासवर्ड - पासवर्ड हे सोशल मीडिया युज करण्याची पहिली पायरी आहे. तिला मजबूत बनवा. ज्यामुळे हॅकर्स पासवर्ड सुलभतेने जाणू शकणार नाहीत. प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवा. त्याचबरोबर पासवर्ड काही दिवसानंतर नेहमी बदलत रहा.


फ्रेंड रिक्वेस्ट - अनोळखी व्यक्ती किंवा तुम्ही ज्याला चांगल्या प्रकारे ओळखत नाही. त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो स्वीकारू नका. कारण ते फेक अकाउंट ओपन करून फसवतात.


अनोळखी लिंक उघडू नका - आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर येणाऱ्या अनोळखी लिंक वर क्लिक करू नका. हा तुमच्या अकाउंटची माहिती चोरण्याचा एखाद्या हॅकरचा प्रयत्न असू शकतो. थोडासा जरी संशय आला तरी स्थानिक पोलीस किंवा सायबर पोलिसांना तात्काळ कळवा.


प्रोफाईल आणि फ्रेंड लिस्ट लॉक - फसवणूक करणाऱ्या हॅकरनी फसवणुकीचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. ते युजरचे डिटेल्स चोरून फेक अकाउंट तयार करतात. नंतर त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून इमर्जन्सी सांगून पैशाची मागणी करतात. अशा प्रकारे पैसे मिळाल्यानंतर ते अकाउंट बंद करून गायब होतात.


टू स्टेप व्हेरिफिकेशन - युजरला मीडिया कंपनी टू स्टेफ व्हेरिफिकेशन सुविधा देते. अकाउंटला लॉगिन करण्यासाठी युजरच्या मोबाईलवर ओटीपी किंवा सुरक्षा कोड पाठवला जातो. तो कोड इन्सर्ट करून अकाउंट लॉगिन होईल. जर कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या अकाउंटला लॉगिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो वन टाइम पासवर्ड किंवा सुरक्षा कोडशिवाय ती व्यक्ती तुमचे अकाउंट लॉगिन करू शकणार नाही.


प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे लोकेशन शेअर करणे गरजेचे नाही. सोशल मीडियावर आपली खाजगी माहिती, खाजगी फोटो तसेच अशी माहिती जी केवळ तुमच्याजवळ असावी, ती कधीही सोशल मीडियावर शेअर करू नका किंवा कॉपी करून ठेवू नका. जर कोणी तुमच्याकडे अशी माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका. जोपर्यंत एखाद्या पोस्ट विषयीचा खरेपणा तुम्हाला कळून येत नाही. तोपर्यंत ती माहिती शेअर करू नका. कायद्याचे उल्लंघन करणारी पोस्ट करू नका.(लेखक क्राईम रिपोर्टर आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या