गरीबांचे दारिद्रय नष्ट होण्यासाठी या अफाट संपत्तीचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. मंदिरांची संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठीच झाला पाहिजे...
भारतीय
इतिहासात ३० जून २०११
हा दिवस मंदिरात दडविलेल्या
सुवर्ण खजिन्याचा शोध करणारा
सुवर्ण दिन ठरला आहे.
केरळमधील थिरूवअनंतपुरम येथील सुप्रसिद्ध मंदिर पदानाभनस्वामी मंदिरात सुमारे दिड लाख कोटी
रूपयांहून जास्त होणाऱ्या किंमतीचे सोने सापडले आहे.
पूर्वी आंध्रप्रदेशातले तिरूपती बालाजीचे मंदिर हे भारतातले पहिल्या
क्रमांकाचे गर्भश्रीमंत मदीर समजले जात
असे. आंध्रप्रदेश बजेटच्या निम्मी संपत्ती सुमारे पन्नास 'हजार कोटीची संपत्ती' तिरूपती या एकटया देवस्थानकडे
असल्याचे सांगितले जात असे. पण,
त्यापेक्षा कितीतरी अधिक
सुमारे एक ते दिड
कोटी सुवर्ण संपत्ती एकटया पद्मनाभनस्वामी मंदिरात असल्याचे प्रत्यक्ष मोजमापावरून सिद्ध होत असल्याने पद्मनाभनस्वामी मंदिर हे
खरे सुवर्ण मंदिर ठरले असून ते
केवळ भारतातलेच नव्हे तर जगातले क्रमांकएकचे मंदिर ठरेल
असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पद्मनाभनस्वामी मंदिर, तिरूपती देवस्थान याशिवाय आंध्रातील सत्यसाईबाबा ट्रस्टकडे कोटींपेक्षा अधिक रक्कम प्रत्यक्ष मोजली गेली आहे. अलिकडेच त्यांच्या वाहकांकडे ३५ लाख रूपये तर मंदिराच्या एका खोलीत ७६ लाखाचे घबाड मिळाले. आहे. आयुष्यभर भीक मागून, फाटके कपडे घातलेल्या शिर्डीवासी साईबाबांनी श्रद्धा, सबुरीची शिकवण दिली, याच बाबांना सध्या देवस्थानने सोन्याने मढविले आहे. महाराष्ट्रात पंढरपूर, शनिशिंगणापूर, तुळजापूर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, उत्तरेकडील दिलवारा जैन मंदिर, रनकपूर मंदिर, अमरनाथ, केदारनाथ, बद्रिनाथ, मथुरा, वृंदावन, वाराणसी, दक्षिणेकडील मिनाक्षी, रामेश्वर, अक्षरधाम, जगन्नाथ पुरी (पूर्व) गोकर्ण सूर्यमंदिर व काळीबारी. अशा भारतातील अनेक लहान मोठया देवस्थानांकडे अमाप संपत्ती आहे. ती मंदिरे कोणत्याही धर्माची असोत, त्यांची संपत्ती गोळा केली तर एक भला मोठा डोंगरच तयार होईल. यात शंकाच नाही. भक्तीच्या नावाखाली काळापैसा जमा केला जातो अणि तो समाजसेवा या गोंडस नावाखाली व्यवहार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. हे कटू सत्य नाकारता येणार नाही. पण आपल्या देशातील कोणतेही हिंदू देवस्थान राष्ट्राच्या संकट समयी व आपत्कालीन परिस्थितीत धावून जात आल्याचे दिसून येत नाही, अंधश्रद्धेच्या नावाखाली जनतेकडून मंदिरांमार्फत बऱ्याच प्रमाणात पैसा गोळा केला जातो, हा पैसा जनतेचा असल्याने तो सरकारी तिजोरीतच जमा करावा. त्यामुळे असा पैसा किंवा संपत्ती राष्ट्राची संपत्ती आहे, असेच म्हणावे लागेल. ती मूठभर लोकांच्या हाती जाऊ न देता सरकारी तिजोरीत जमा करायला हवी, याउलट थायलंड या बौद्ध राष्ट्रातील बुद्ध विहारात प्रचंड सुवर्ण संपत्ती आहे. एकदा थायलंड देश असाच आर्थिक इबघाईला आलेला असताना, तेथील बुद्ध विहारातील भिक्खुंनी सरकारला धीर दिला आणि म्हणाले की, सरकारचे आर्थिक संकट आम्ही बुद्ध विहारातील सोने देऊन दूर करू. सरकारने धीर सोडण्याचे, घाबरण्याचे कारण नाही. भारतातील देवस्थानांना असे जेव्हा सूचेल ना तेव्हा तो दिवस सुवर्ण सुदिन म्हणाव लागेल.
आपल्याकडे जमा झालेल्या पैशांचा आपण 'कर' जबरदस्तीने भरतो. सरकारी तिजोरीत हा कर जमा होतो. परंतू देवळांमध्ये जमा झालेल्या संपत्तीचा कोणताही कर भरला जात नाही हे यावरून सिद्ध होत आहे. अनेकदा अर्थसंकल्पासाठी खर्च होणाऱ्या पैशांपेक्षाही देवस्थानांमध्ये असलेली संपत्ती अधिक दिसून येते. तेंडुलकर समितीने आपल्या देशात दारिदयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ३७-२ टक्के दर्शविली आहे. त्यातील ग्रामीण भागात ४१.८ टक्के तर शहरी भागांत. २५.७ ठक्के लोक दारिद्रयात आहेत. म्हणजेच २०११, च्या जनगणनेच्या आधारे भारतातील सुमारे ३८ कोटी जनता अर्ध उपाशी पोटी जीवन कंठत आहेत. आजघडीला भारतात शंभर कोटीहून अधिक लोक दररोज वीस रूपयांपेक्षाही कमी पैसा मिळवित आहेत. अशा गरीबांच्या विकासासाठी या मंदिरांतील संपत्तीचा उपयोग होऊ शकतो.
अनेक संस्थांमध्ये मोफत
भोजन, रूग्णवाहिका, ऑपरेशन केली जातात; त्याबरोबरच
रस्ते, धरणे, शैक्षणिक कामे, रेल्वे मार्ग अशा मोठ्या प्रकल्पांसाठीही
या पैशांचा उपयोग होऊ शकतो. देवाशी
संबंधित गोष्टींचा प्रश्न निर्माण झाला की, अनेकजण
आपल्या धर्मभावना दुखावल्या अशी भूमिका अवलंबितात,
त्याला धार्मिक रंग दिले जातात; पण
या देशातील दिनदुबळी जनता हीच परमेश्वर आहे, निःस्वार्थीपणे केलेली
समाजसेवा हिच खरी मनाची
श्रीमंती आहे हे प्रत्येकाने
समजून घेतले पाहिजे. पद्मनाभनस्वामी मंदिरातील संपत्तीवरून देवस्थानांच्या संपत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गरीबांचे
दारिद्रय नष्ट होण्यासाठी या
अफाट संपत्तीचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे.
मंदिरांची संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती
आहे, त्याचा उपयोग राष्ट्राच्या
विकासासाठीच झाला पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.