सध्या मुंबई शहर व महाराष्ट्रातील इतर जिल्हयांत गेल्या पाच ते सहा महिन्यांत घरफोडया, चोऱ्या, महिलांचे - दागिने, मंगळसूत्र पळविण्याचे प्रकार वाढल्यामुळे त्या चोरटयांना पकडून गजाआड करण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
वाढत्या घरफोडया व चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष कृती आराखडा निर्माण करण्याची गरज झाली आहे. घरफोडया व चोर्या रोखण्याची जशी जबाबदारी पोलिसांवर आहे. तितकीच ती नागरीकांची व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचीही आहे. सर्वच ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्याअपुरी आहे. हे नाकारून चालणार नाही. केवळ पोलिस खात्याचे उणे-दुणे काढण्यापेक्षा अथवा वाढते गुन्हयांचे खापर पोलिसांवर फोडण्यापेक्षा नागरीकांनी आत्मचिंतन करून आपलीही जबाबदारी ओळखली पाहिजे.
रात्री तर चोऱ्या होतातच त्याच प्रमाणात अलीकडच्या काळात भरदिवसा घरफोडया व चोऱयांचे प्रमाण वाढले आहे हेही ठळकपणे लक्षात घेतले पाहिजे. घरफोडया व चोऱ्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या तपासासाठी पोलिस दलाने विशेष पथके निर्माण करण्याबरोबरच अशा चोऱ्या रोखण्यासाठी घरात सोन्या-चांदीचे दागिने किंमती वस्तू व जास्त प्रमाणात रोख रक्कम न ठेवता अशा मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवणे जास्त हिताचे आहे. यादृष्टीने प्रबोधन, करण्याची गरज आहे. तसेच बाजारात सध्या सुरक्षाविषयक अनेक वेगवेगळी उपकरणे उपलब्ध आहेत, जी आपल्या गरजांची पूर्तता करतात व ती उपकरणे आपल्याला परवडणारीही असतात.
फायर अलार्म : घरगुती फायर अलार्म यंत्रणेचा प्राथमिक फायदा सहय्यकाशिवाय आगीपासून सुटका मिळविण्यासाठी लोकांना मदत करण्याच्या विश्वसनीयतेत व क्षमतेत वाढ करणे हा आहे. फायर अलार्म यंत्रणेची अशाप्रकारे आखणी केली आहे की, याद्वारे अचानक लागलेल्या आगीची सूचना दिली जाते.
होम फायर अलार्म : ही यंत्रणा घरफोडीच्या सुरक्षिततेबरोबरच आगीपासूनही बचाव करू शकते. ही यंत्रणा दरवाजे, खिडक्या व घरातील इतर. जागांना घरफोडीपासून सुरक्षित ठेवते
सीसीटिव्ही/कॅमेरा : सीसीटिव्ही कॅमेरा म्हणजेच क्लोज्ड सर्किट टिव्ही. गेल्या काही. दशकांपासून तंत्रज्ञानात वाढ झाल्यावर व परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्याने सीसीटिव्ही यंत्रणा लोकप्रिय झाली आहे. खरेतर सीसीटीव्ही हि सावध निरीक्षणात्मक देखरेखीची यंत्रणा आहे 'ज्यांत. कॅमेऱ्याचा वापर केला आहे. यात व्हिडिओ प्रतिमांची साठवणूक होते किंवा त्या नंतर पाहण्यासाठी साठविल्या जाऊ शकतात. सदर कॅमेरे योग्य जागी स्थापित करता येऊन ते सहज वाहून नेता येतात. हि यंत्रणा जास्त करून मोठमोठी दुकाने, बँका व सार्वजनिक इमारती यांमध्ये प्रामुख्याने वापरली जाते.
व्हिडियो, डोअर फोन/व्हिडिओ इंटरकॉम यंत्रणा, सध्या व्हिडियो डोअर फोन हे अपार्टमेंट्स इमारती,
रहिवाशी संकुले व्हिलाज व बंगल्यांकरिता महत्तवपूर्ण सुरक्षिततेचे साधन बनले
आहे. दरवाजावरील बेल वाजविल्यानंतर अनोळखी
व्यक्तीसाठी दरवाजा उघडणे योग्य नसल्याने हि यंत्रणा याजागी कामी येते. यात प्रवेश करण्याच्या दरवाजाच्या बाहेरील बाजूला कॅमेरा बसविलेला असतो व त्याचे प्रदर्शन
तुमच्या घरामध्ये जसे की, बेडरूम मध्ये केले जाते. ज्यावेळी कुणीही ओळखीची किंवा
अनोळखी व्यक्ती डोअर बेल किंवा इंटरकॉम बटण दाबेल तेव्हा यंत्रणा/ कॅमेरा कार्यरत
होते. आणि बाहेर कोण उभे आहे हे बेडरूममध्ये बसविलेल्या तुमच्या मॉनिटरवर दिसते. या
यंत्रणेमुळे तुम्ही बाहेरील बाजूस ऊभे असलेल्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या पाहू शकता
आणि तुमच्या अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवू शकता.
आपला शेजारी खरा पहारेकरी या उक्तीप्रमाणे बाहेरगावी जाताना अथवा घरी येण्यास उशीर होणार असेल तर शेजाऱ्यांना कल्पना देणे केव्हाही योग्य. तसेच पोलिसांनी किती चोऱ्यांचा तपास लावला याचाही लेखाजोखा होणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने प्रत्येक भागातील गृहनिर्माण संस्थांच्या बैठका बोलावून प्रबोधन करणे गरजेचे आहे. तरच घरफोडया व चोऱ्यांना आळा बसेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.