Ticker

10/recent/ticker-posts

अशा नराधमांना मृत्युदंडच हवा

पोलिसांनाही वेळ  दवडतातपास सुरु आहेगुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा  होईल असे नेहमीचे उत्तर  देता बलात्कार करणाऱ्या सगळ्या नराधमांचा तपास करून त्यांच्या मुसक्‍या आवळाव्यातआरोपींना जामिनावर सुटता येऊ नये म्हणून सक्षम पुरावे कोर्टासमोर सादर करावेत म्हणजे न्यायालयाला अशा नराधमांना कठोर शिक्षा करणे शक्य होईलबऱ्याचदा अशा प्रकरणात पोलिस कच्चे पुरावे सादर करतातपरिणामी,आरोपी सहजपणे जामिनावर सुटतातयाचा परिणाम खटल्यावर हो ऊन आरोपी किरकोळ शिक्षेवर सुटतात आणि पुन्हा तेच आरोपी निर्ढावलेल्या स्थितीत तेच-तेच अपराध करत राहतात.
 

आठ-दहा वर्षापूर्वी ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोठेवाडी येथे दरोडे आणि बलात्काराचे गुन्हे झाले होते, त्याच जिल्ह्यामध्ये वीरगाव येथे पुन्हा एक दुर्घटना घडली. सात दिवसांपूर्वी वडील वारलेले... म्हणून वडिलांच्या अंत्यविधीसाठी माहेरी आलेल्या मुती, पित्याला पाणी दिलेली एक मुलगी, विधवा, वृध्दा तिच्या मुलींना मानसिक आधार देण्यासाठी आलेल्या महिला या सगळ्यांनी भोगल्या केवळ नरक यातना!

 

अकोले तालुक्यातील देवगण रोडवरील वीरगावच्या टेमगिरे वस्तीवर अगदी गरिबीच्या परिस्थितीत एक कुटुंब जीवन कंठत होते. पोटी पुत्र नाही याचे दुःख  ठेवता हलाखीतच सहाही मुलींचे जेमतेम परिस्थितीतील परिवारामध्ये त्यांची लग्ने करून दिली. त्यातच घरातील या कर्त्या पुरुषाचे निधन झाले. आपल्या पित्याचे छत्र हरपल्याने सहाही मुली पोरक्या झाल्या. वडिलांच्या मृत्यूचे दुःख घेऊन त्या माहेरी आल्या. अंत्यविधी आटोपल्यानंतर चौघी माहेरी परतल्या. दोघी, एक जिने पित्याला पाणी पाजले दुसरी आईला सोबत म्हणून माहेरीच राहिल्या. दररोज कुणी ना कुणी पुरुष सोबतीलाही थांबले.  पण, लहानसे घर असल्याने रात्रीच्या वस्तीला जागा नाही.  पाऊसही सुरु असल्याने बाहेर अंगणात झोपणेही शक्य नव्हते. म्हणून पुरुष मंडळी वस्तीला थांबले नाहीत.  मात्र, जाताना दशक्रियेच्या बाजारहाटासाठी एकमेकांकडून जमा केलेले दहा हजार रुपये या महिलांकडे देऊन निघून गेले. दुःखद वातावरणा पित्याची आठवण काढत या सर्व महिला शुक्रवार दि. जुले २०११ च्या रात्री उशिरा झोपल्या. 


दाराची कडी वाजली म्हणून एखादी महिला लघुशंकेसाठी उठली असावी अशी बाकीच्या महिलांची समज झाली असावी. पण जिने कडी उपडली, तिला काय करावे सुचेना झाले. कोण आहे बघण्यासाठी पुढे सरसावली तर कानाखाली थप्पड, या अचानक प्रहाराने तो खाली पडली. कोण आहे हे बघण्यासाठी इतर उठल्या; पण साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याआधी पाच- सहा नराधम घरात घुसले. या मस्तवाल गुंडांनी या महिलांना धमकावत घराच्या बाहेरील बब्लब फोडला. पैसे, दागिने कुठं लपविलेत..काही महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलंकार हतर लहान-मोठे दागिने त्यांनी हस्तगत केलेलगोलग रोख रक्कमही हिसकावून घेतली


महिलांशी असभ्य वर्तन करतानाच दोन-चार धान्यांच्या गोण्यांवरही ब्लेड मारून त्यात दागिने पैसे लपविले तर नाही ना, याची खात्री करून धान्य अस्ताव्यस्त केले. येवढेच नव्हे तर घरातील एकमेव  मोबाईल ताब्यात घेऊन फोडून टाकण्यात आला होता. बचावाचे सर्व मार्ग संपले तरी महिला प्रतिकार करीतच होत्या. छोट्या घरातील चुलीच्या कोपर्‍यात वृद्ध महिलांना लोटून देत नराधमांनी मारहाणीबरोबर आई-मावशींसमोर दोन मुलींना जबरदस्तीने विवस्त्र केले. वृद्धांना मारहाण करत दोघे घराबाहेर पहारा करत होते. तर तीन-चार जण आळीपाळीने आपले आधीच काळे करून आलेल्या तोंडालाच नव्हे तर माणुसकीलाही काळीमा फासत होते. आळीपाळीने या नराधमांनी हे पाशवी कृत्य करताना दोन-तीन तास अक्षरशः नंगानाच केला. या गुन्ह्यात गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.


ताजी घटना ही आरोपींची विकृती आहे. असे गुन्हे संघटीतपणे होत असतात, पण याबाबतीत पोलिसांनाच वेठीस  धरणे ही गोष्ट योग्य नाही. हे टाळण्यासाठी पोलिसांनी 'बेसिक पोलिसिंग' केले पाहिजे. या गुन्हयात दरोडा घालताना महिलांवर बलात्कारही करण्यात आले आहेत. बर्‍याच दरोड्यांमध्ये स्त्रियांवर बलात्कार होतात; पण त्याची नोंद होत नाही. याचे कारण आपल्यावर बलात्कार झाला आहे हे सांगण्यास स्त्रिया पुढे येत नाहीत. हे कोठेतरी थांबायला पाहिजे. पोलिसांनाही देळ न दवडता, तपास सुरु आहे,  गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होईल असे नेहमीचे उत्तर न देता बलात्कार करणार्‍या सगळ्या नराधमांचा तपास करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात. आरोपींना जामिनावर सुटता येऊ नये म्हणून सक्षम पुरावे कोर्टासमोर सादर करावेत म्हणजे न्यायालयाला अशा नराधमांना कठोर शिक्षा करणे शक्य होईल. बर्‍याचदा अशा प्रकरणात पोलिस कच्चे पुरावे सादर करतात. परिणामी आरोपी राहजपणे जामिनावर सुटतात. याचा परिणाम खटल्यावर होऊन आरोपी किरकोळ शिक्षेवर सुटतात आणि पुन्हा तेच आरोपी निर्ढावलेल्या स्थितीत तेच-तेच अपराध करत राहतात. असे घडू नये म्हणून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून, भविष्यात पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस आरोपींचे होणार नाही. घटना घडून जातात पण, त्या जखमांसारख्या असतात. जखमाही भरून येतात पण त्याचे वण कायम राहतात हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात अजूनही पोलिसांचेच राज्य आहे हे गुन्हेगारांना समजले पाहिजे. मृत्यूदंडासारखी शिक्षा बलात्कार्‍याला झाली पाहिजे. 


खरे तर अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण संरक्षण दल वाढविण्याची गरज असून तसा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यायला हवा. पण,  रारकार याबाबत कितपत पावले उचलते याविषयी शका आहे. कारण एतिकडे पोलिसांना काम करू दिले जात नाही आणि जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या बदल्या केल्या जातात, त्यांना काम करणे नको करून सोडले जाते. ही गृहखात्याची नामुष्की आहे. वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने आता तरी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. तरच अशा मोकाट गुन्हेगारीला आळा घालता येईल.   





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या