भारनियमनाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलयं. पावसाळा संपला आणि ऑक्टोबर हीट सुरू झाली. ऑक्टोबरच्या हैराण करणाऱ्या उन्हात भारनियमन अचानक वाढलं. कारण म्हणे कोळशाचा पुरवठा कमी झाला आहे. तेलंगनात आंदोलन सुरू असल्याने तेथील खाणीतून होणारा कोळशाचा पुरवठा थांबवला गेला आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना आवश्यक असलेल्या कोळशाची कमतरता भासू लागली. भारतात बहुतांश वीज प्रकल्प हे कोळशावर आधारलेले आहेत. त्यामुळे आपोआपच वीज निर्मिती कमी झाली. पण, फक्त हेच कारण आहे का? खरंतर गेल्या आणि त्या अगोदरच्या दशकात नव्या वीज प्रकल्पांच्या निर्मितीकडे आपण फारसे लक्ष्य दिले नाही.
काळानुरुप वीजेची मागणी वाढत राहिली आणि तुटवडा होत गेला. जाग आली तेव्हा खूप उशीर झाला होता. आता नवे वीज प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण यातून हा वीज तुटवडा भरुन निघायला बराच वेळ लागले. हे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत वीजेची मागणी आणखी वाढलेली असेल. इंधनाच्या बाबतीतही तेच आहे. मागणी वाढत आहे व पुरवठा कमी होत आहे. यामुळेच इंधनाच्या किंमती अधिक वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता वीज वीज व इंधन बचत करून या समस्येत हातभार लावायला हवा. आपण छोट्या छोट्या गोष्टीतून ऊर्जा व इंधन बचत करू शकतो.
ट्युबलाईट किंवा बल्बऐवजी सीएफ्एस् किंवा लिडचा बल्ब वापरा. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेताना स्टार रेटिंग असणारे उपकरण घ्या.
वापर
होत नसल्यास उपकरणे प्लगपासूनच बंद करा. उदाहरणार्थ
टीव्ही, संगणक, मोबाईल चार्जिंग, एसी, विनाकारण जळणारे
बल्ब स्वयंपाक करताना कुकरचा वापर करा.
पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा, आधी भिजवून मगच डाळी शिजवाव्यात. अन्न शिजविताना जास्तकरून खोलगट भांड्याचा वापर करा कारण पसरट भांड्यातून वाफ लवकर उडून जाते. गॅसचा बर्नर स्वच्छ करा. निळ्या रंगाऐवजी जर नारिंगी किंवा पिवळ्या रंगाची आच दिसत असेल तर बर्नर स्वच्छ करा.
दुचाकी, चारचाकी वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा. चाकात योग्य प्रमाणात हवा भरा. चाकात हवा नसल्यास इंधन अधिक जळते. विनाकारण सारखे ब्रेक लावू नका.
उन्हाळ्यात खिडक्या उघड्या ठेवल्यास पंखे व दिव्यांचा वापर कमी होईल.
ग्रामीण भागात १० ते १२ तास लोडशेडिंग होते. शेतीला दोन व उद्योगांना आठवड्यात एक दिवस वीज नसते. अशा परिस्थितीतही मुंबईत एसीला प्रचंड वीज लागते. शेती व उद्योगांचा विचार करून एसी वापरू नयेत. प्रत्येक व्यक्तीने बीजबचत म्हणजेच वीजउत्पादन हे सूत्र काटेकोर अंमलात आणावे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.