शुद्ध मध कधीही खराब होत नाही
-दादासाहेब येंधे
मंधमाशीचा डंख जरी तीव्र वेदना देत असला तरी मधमाशीच्या पोळयातून मिळणारी मध मात्र एकदम गोड असते असे म्हठल्यास वावगे ठरू नये. पूर्वीच्या काळापासून अनेक गोष्टींसाठी आपण मधाचा उपयोग करीत आलो आहोत. आयुर्वेदामध्येही मधाविषयी तोंडभरून गुणगान गायले गेले आहे. देवाच्या अभिषेकासाठी त्यानंतर प्रसादरूपाने उपयोगात येणाऱ्या पंचमृतातील एक अमृत म्हणजे मध. पण, ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत घडते अगदी तशोच भेसळ मधामध्येही सर्रासपणे होताना दिसून येत आहे.
कित्येकजण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी तर बरेचजण शरीराची जाडी कमी व्हावी म्हणून लिंबू पाण्यात मधाचा एक चमचा टाकून ती घेत असतील तर कित्येकजण भूख वाढावी म्हणून चाटण करून मधाचा वापर करतात. आजकाल बऱ्याचअंशी मधाचा वापर वाढत चालला आहे. उत्पादन कमी आणि बाजारात मागणी मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मधात भेसळीचे प्रमाण बरेचसे वाढले आहे.
पण, यापुढे सावधान ! जर कधी मध घ्यायला तुम्ही जाल, तेव्हा त्याची बाटली नीट पारखून पहा. त्यावर एक्सपायरी डेट लिहिली आहे का ते शोधा, अर्थात, प्रत्येक पदार्थावर किंवा औषधावर 'एक्सपायरी' डेट असते. मधाच्या बाटल्यांवरही 'एक्सपायरी' डेट बघायला गेले तर सगळयाच बाटल्यांवर तारीख आढळून येईल, पण म्हणून लगेच ती बाटली खरेदी करू नका. याचे कारण म्हणजे मध कधीही जुना होत नाही. त्यामुळे 'एक्सपायरी डेट असणारं मध हे बनावट असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शुद्ध मध कधीही खराब होत नाही. त्यामुळे त्यावर 'एक्सपायरी' डेट असण्याची गरजच नाही. शिवाय, हल्ली मिळणारा बहुतांश मध हा बनावट असतो. या आरोपाला पुष्टी देणारे एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरेंटमेंट॑ या दिल्लीतील निमसरकारी संस्थेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ही चाचणी केली आहे. यात देशामध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे मध विकले जाते. त्यातील कित्येक कंपन्यांच्या मधामध्ये प्रतिजैविकांचे प्रमाण आढळून आल्ले आहे.
महाराष्ट्रात तर महाबळेश्वर हे शुद्ध मधासाठी प्रसिद्ध आहे. फळा-फुलांच्या हंगामात जमा झालेलं मध त्या - त्या फळाच्या अथवा फुलाच्या नावानं तेथे ओळखलं जातं. त्यातच शुद्ध मधाची खात्री असल्याने महाबळेश्वरच्या मधाला सगळीकडूनच मागणी असते. पण काही दिवसांपासून महाबळेश्वरच्या दुकानांतच नव्हे तर रस्त्यांवरदेखील मधाची विक्री होताना दिसून येत आहे. पाणचट मधाच्या बाटल्या चढया दराने विकणाऱ्या विक्रेत्यांवर काहीही कारवाई होत नसल्याने बनावट मधाचा धोका वाढला आहे. शुद्ध मधाऐवजी काकवी आणि गुळाचं पांणी याची भेसळ करून छोठया बाटल्यांमध्ये मध विकण्याचं प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथून शुद्ध मध घेऊन जाणाऱ्यांची फसवणूक तर होतेच पण त्यातील प्रतिजैविके आणि इतर भेसळ असल्याने प्रकृतीला मोठा धोकाही पोहचू शकतो.
मधाचा वापर रोज होत असल्याने काही प्रमाणामध्ये प्रतिजैविके आपल्या पोटात जात आहेत. आणि हे 'स्लो पॉयझनिंग' ठरू शकते. मध शुद्ध आहे की नाही याची खात्री करण्याचे मार्गही बरेच आहेत. जर मध फ्रिजमध्ये ठेवला तर त्यात साखर असली तर मधाचा रंग सफेद होईल. भेसळीशिवाय मध सफेद होत नाही. याचप्रमाणे मधाचा एक र्थेब पाण्यात टाकला तर तो तळाला जाऊन बसेल व नंतर पाण्यात मिसळतो.
असे भेसळयुक्त मध शरीराला हानी पोहोचवणारेच ठरू शकते. म्हणून झोपलेल्या सरकारी यंत्रनेने वेळीच जागे होण्याची गरज आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण, 'आयएसआय', हे मानांकन देणारे 'भारतीय मानक मंडळ' आणि कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी 'अँग्रीकल्चरल प्रोडयुस ग्रेडींग अँन्ड मार्किंग' या यंत्रणांनी गुणवत्तेकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. तरच गोड मधाची कहाणी गोड होईल अन्यथा नागरीकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागेल हं...!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.