Ticker

10/recent/ticker-posts

प्रश्न विद्यार्ध्यांच्या सुरक्षिततेचा

शिक्षणाचे झालेले सार्वत्रिकरण आणि स्पर्धा यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावत चालल्याने मुलांकडून पालकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आपल्याला जे आयुष्यात करता आले नाही ते आपल्या मुलांनी केलेच पाहिजे आणि ते करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. या हट्टापायी पालक आपल्या मुलांवर जबाबदारी आणि अपेक्षांचे ओझे वाढवतच चालले आहेत. अपेक्षांचे हे ओझे पेलण्याची आपल्या मुलांमध्ये क्षमता आहे की नाही, याकडे सोविस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहेया अट्टाहासापोटी पालकच आपल्या मुलांना माणसांच्या गर्दीत लोटून देत आहेत असे एकंदर चित्र दिसून येत आहे. या अपेक्षांचे ओझे पाठीवर वागवत फिरणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत  जाण्यापासून ते घरी परतेपर्यंत रोज नवनवीन परिस्थितींचा सामना करावा लागतो. याचा पालक म्हणून आपण कोठेतरी विचार करण्याची गरज आहे.


मुलांना शाळेत सोडण्यापासून ते शाळेतून घरी आणण्यापर्यंत पालकांची जबाबदारी पणाला लागते. मात्र, सध्या  पालकांच्या होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षांमुळे मुलांची अक्षरशः शेळया-मेंढया कोंडाव्यात तशी जीवघेणी वाहतूक केली जाते. आपल्या मुलासाठी स्वतंत्र रिक्षा, टॅक्सी, अथवा कार नाही म्हणून पालक विद्यार्थ्याना या संकटासमोर लोटून देतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही ठिकाणी रिक्षा, सुमो किंवा अन्य तत्सम वाहनांत विद्यार्थ्यांची ने-आण सुरू असते. एका रिक्षातून चार विद्यार्थ्यांची ने-आण होऊ शकते; पण त्याच एका रिक्षातून सात ते आठ विद्यार्थी कोंबून शाळेतून ये-जा करणाऱ्या रिक्षा रोज नजरेस पडतात. धावण्याच्या योग्यतेच्या नसलेल्या भंगार गाड्यांमधून मुलांची शाळा वारी सुरू असते


स्कूल बस चालविण्यासाठी खालील नियमांची पूर्तता करणे वाहतूकदारांसाठी सक्तीचे आहे.

- विद्यार्थ्याच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक.

- फक्त विद्यार्थ्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसचा रंग पिवळा असेल व त्यावर १५० मि. मी. तपकिरी पट्टा सर्व बाजूंनी खिडकीखाली रंगवून त्यावर. शाळेचे नाव लिहिण्यात यावे.

- बसला मागे पुढे ३५० बाय ३५० मि. मी. आकाराचा फलक लावण्यात यावा. त्यावर गणवेशातील विद्यार्थी व विद्यार्थीनींचे चित्र रंगवून त्याखाली स्कूल बस असे लिहावे.

- शाळा आणि मार्ग क्रमांकाचा फलक लावण्यात यावा.

- विद्यार्थ्याची अन्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बससाठी रंगाचे बंधन नाही; मात्र अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या बसवर ४०० मि. मी. चा पट्टा बंधनकारक आहे.

-वाहतूकीची बस १५ वर्षांपेक्षा जूनी नसावी. 

बसमध्ये विद्यार्थ्याच्या नावाची यादी, त्यांची इयत्ता, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट तसेच गाडीत बसण्याचे उतरण्याचे ठिकाण नमूद करावे.

- बसचालक आणि बसवाहक अडचणीच्या प्रसंगात शाळेला माहिती देऊन विद्यार्थ्याच्या - सुरक्षित वाहतूकीची पर्यायी, व्यवस्था करतील.

- बसच्या पायरीची उंची जमिनीपासून २२० मि. मी. पेक्षा जास्त नसावी. पायरीचा पृष्ठभाग गुळगुळीत नसावा.

- स्कूल बसमध्ये चढताना, दरवाज्यात विद्यार्थ्यांना सहज पकडता येईल अशी लोखंडी दांडी असावी.

- बसच्या आतील भागात ठराविक अंतरावर उभे लोखंडी - दांडे बसविण्यात यावेत, प्रेशर हॉर्नचा वापर करू नये.

- बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी. एबीसी प्रकारचे आयएसआय प्रमाणित पाच किलो वजनाचे दोन फायर इवस्टिंग्युशर' बसवावेत.

- बसमध्ये आसनांच्या खाली दप्तर ठेवण्यासाठी जागा असावी.

- स्कूल बस चालकाला किमान ६ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असावा.

 -पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मुलाला घ्यायला आल्यास त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेऊन जावे पालकांना बोलावून मगच विद्यार्थ्यांना त्यांच्या ताब्यात  दयावे.

 - कॅनव्हासचे हुड असणाऱ्या गाडया स्कूल बस म्हणून वापरता येणार नाहीत.

- बसला आप्तकालीन दरवाजा व खिडकी ही राज्य परिवहन प्राधिकरणाच्या धोरणानुसार असावी.

- बसची बांधणी बस बॉडीकोड डिझाईननुसार असावी.

-स्कूल बसच्या प्रत्येक मॉडलसाठी  परिवहन आयुक्तांची परवानगी घ्यावी.

- बसला आतून चाइल्ड लॉक असावे.

- बसला धोक्याची सूचना देणारे इंडिकेटर्स असावेत. हे इंडिकेटर्स विद्यार्थी बसमध्ये चढत असताना किंवा उतरत असताना इंडिकेटर्स वाजतील. हे नियम वाहतूकदारांसाठी  सक्तीचे असले तरी त्याची योग्य अंमलबजावणी करून घेणे ही प्रत्येक पालकाचे नुसते कर्तव्य नसून जबाबदारी देखील आहे.  


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या