प्रेम कर भल्लासारखं, बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये ऊगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’’
शिरवाडकरांनी अतिषय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रूक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्धा या हिंदुभुमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे.
सध्या भारतात वेलेन्टाईन डे च्या नावाने प्रेमवीरांच्या प्रेमाला प्रचंड महापूर आला आहे. प. पु. संत वेलेन्टाईन डे हे हया प्रेमवीरांचे प्रेमगुरू. १४ फेब्रुवारी हा त्यांचा प्रेमदिवस. म्हणजेच संत वेलेन्टाईन हयांची पुण्यतिथी, आता हा वेलेन्टाईन कोण होता? हे या प्रेमवीरांच्या खानदानीलाही माहिती नसेल. पण आम्हाला पाश्चात्यांची नक्कल करायची सवय लागली आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे करीत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
दरवर्षीप्रमाणे पुन्हा वेलेन्टाईन डे जवळ आला असून वातावरणात प्रेमाचा मादक सुगंध दरवळायला सुरूवात झाली आहे. पाश्चात्य देशांतूनच वेलेन्टाईन डे चा उत्सव आयात करण्यात आहे. म्हणतात ना, चहापेक्षा चहाची किटलीच जास्त गरम असते, अगदी त्याप्रमाणेच विदेशी लोक त्यांचा उत्सव साजरा करत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने भारतीयच त्यांचे उत्सव जास्त प्रमाणात साजरे करताना दिसताहेत.
आजकाल वेलेन्टाईन डे साजरा करताना प्रेमाच्या नावाखाली जे चालू आहे त्यात निर्दोष प्रेमाची किंवा पती-पत्नी यांमधील अभिव्यक्तीची कोणतीही गोष्ट दिसून येत नाही. त्यात फक्त प्रेमाचे नाटक करून भोळयाभाबडया मुलींना योजनापूर्वक फसविण्याचेच षडयंत्र रचण्यात येते आहे. लग्न झालेल्या जोडप्यालाही स्वतःच्या जीवनसाथीबरोबर वेलेन्टाईन डे साजरा करण्याची जेवढी इच्छा नाही त्यापेक्षा कितीतरी पट इच्छा त्यांना विवाहबाहय संबंध ठेवण्यात होत आहे. ऐन तारूण्यात प्रवेश केलेल्या मुलींसाठी तेरा ते एकोणीस हे वय अत्यंत जिव्हाळयाचे असते. या वयात हार्मोन्समध्ये बदल होत असल्यामुळे त्यावेळी त्यांच्या नजरेत कुणीही एखादा चांगला दिसणारा युवक दिसला की त्यांना त्याच्या प्रेमात पडावे असे वाटते. पण, त्यांना हे ठाऊक नसते की, हे प्रेम नाही तर एक फक्त शारिरीक आकर्षण आहे.
काॅलेजमध्ये शिकणारे मजनू सारखे कित्येक युवक संपूर्ण वर्ष भोळयाभाबडया मुलींना आपल्या जाळयात अडकविण्यासाठी आपले जाळे टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, काही मुली इतक्या हुशार असतात की, त्या अशा मजनूंच्या सामान्य गोष्टींना भूलत नाहीत. अशा मुलींना प्रेमात ओढण्यासाठी आणि फसविण्यासाठी वेलेन्टाईन डे चा उत्सव आपल्याकडे करताना काहीजण दिसून येत आहेत. त्यामुळे ऐन तारूण्यात आलेली आणि काॅलेजात शिकणारी मुलगी जेव्हा वेलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी अती उत्साही असेल तेव्हा तिच्या भोळेपणाचा कुणी फायदा घेऊ नये यासाठी स्वतःच्या मुलीची काळजी घेणाऱ्या आई-बापांनी दक्षता जरूर घेतली पाहिजे. ती काळजी घेण्यासाठी काही प्रेमाच्या टिप्स्...
तुमच्या मुलीने वेलेन्टाईन डे का साजरा करू नये अशा प्रकारचे भाषण तिला तुम्ही देऊ नका. आजच्या पिढीला अशाप्रकारची भाषणे ऐकायची सवय नाही. त्यासाठी तुम्हीच स्वतः वेलेन्टाईन डे निमित्त एका सुंदर पार्टीचे तुमच्या घरीच आयोजन करा. या पार्टीत तुमची मुलगी तिच्या जेवढया मित्रांना बोलावू पाहते तेवढयांना बोलावू द्या. वेलेन्टाईन डे च्या दिवशी गिफ्ट चे भलतेच महत्त्व असते. श्रीमंत घरातील मुले मध्यम वर्गातील युवतींना महागडी गिफ्ट देऊन आपल्याकडे आकर्शित करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातून जवळीक साधून त्यांना एखाद्या लाॅजवर किंवा हाॅटेलमध्ये बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे मुलीला स्पष्ट ताकीद द्यायची की कुणाकडूनही गिफ्ट स्विकारायचे नाही. वेलेन्टाईन डे च्या आधी किंवा त्यादरम्यान महागडी गिफ्ट मुलीकडे बघायला मिळाली तर सतर्क राहून अशी गिफ्ट कुणी दिली आहेत, कधी दिलीत त्याचा पूर्ण तपास करून आपल्या मुलीला तशी गिफ्ट परत करण्याचा सल्ला द्यावा.
कुणी जर मोबाईल सारखे गिफ्ट दिले असेल तर ते एक सुंदर साधन आहे की, ज्यामुळे आपण आपल्या मुलीपर्यंत लवकर पोहोचू शकतो. वेलेन्टाईन च्या एका सप्ताहात मुलीला मोबाईलवर येणारे प्रत्येक काॅल, मिसकाॅल, मेसेज बघून आपल्या मुलीला कुणी त्रास तर देत नाही ना याचा बरोबर थांगपत्ता मोबाईल सारख्या गिफ्टमुळे लागेल. मुलीच्या मोबाईल फोनवरील येणारे संदेष (मेसेज) तपासून ती चुकीच्या मार्गाने जात असेल तर तिला योग्य वेळीच रोखता येईल.
सध्या वेलेन्टाईन डे च्या पाटर्या फक्त रात्री आणि हाॅटेलातच नव्हे तर दिवसाही एखाद्या मित्राच्या घरी, बंद फ्लॅटमध्ये देखील योजल्या जातात. काही- काही तरूणी काॅलेज किंवा शाळेत जाण्याचा बहाणा काढून अशा पाटर्यांना हजेरी लावतात आणि वासनांध लांडग्यांच्या बळी पडतात. अशा कारणांमुळे वेलेन्टाईन डे च्या जवळील दिवसांत घरातून निघालेल्या मुली खरोखर काॅलेजच्या वर्गात पोहोचल्यात की नाही, याची खात्री मुलीच्या आई-वडीलांनी करणे गरजेचे बनले आहे. त्याचप्रमाणे मुलींना वेलेन्टाईन डे चं महत्तव समजावून सांगताना हेही समजावून सांगणे गरजेचे आहे की, फक्त मित्र-मैत्रिणींबरोबरच नव्हे तर कोणाशीही जवळीक ज्यात शुद्ध (खरे प्रेम) प्रेम तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही वेलेन्टाईन डे तुम्ही साजरा करू शकता. यामध्ये पती-पत्नी, भाऊ-बहिण, पिता स्वतःच्या मुलीवर, आई स्वतःच्या मुलाबरोबर, शिष्य -गुरूबरोबर वेलेन्टाईन डे साजरा करू शकतात.
आजकाल मुलींना काॅलेजमध्ये किंवा शाळेत पाठविणे देखील मोठी जोखीम आहे. पाटण येथील एका शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थीनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावरून पालकांनी शिक्षकांवर देखील कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो. जे वर्ष बाराही महिने अशा परिस्थितीत आपल्या समाजात सुरू आहे तेथे वेलेन्टाईन डे तर मुलींसाठी धोक्याची घंटा बनत आहे. ज्या आईवडिलांना आपल्या मुलीचा पाय खड्डयात पडू नये असे वाटते त्यांनी या दिवशी विशेष सावध राहणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.