नेेहमीच आपण एकमेकांना सहकार्य केले आहे. अनेक संकटांवर मात करायची, सामना करायचा ही आपली संस्कृती आहे. हे आपले खास वैषिश्टय आहे. सध्या देशासमोर असलेली फार मोठी व भेडसावणारी समस्या आहे ती एड्सची!
अनेक ठिकाणी अनेक प्रकारे याविषयी माहिती वाचावयास मिळत असली तरी एड्स रोगाला कारणीभूत असलेले विषाणू कोणते? त्यांचा परिणाम कया होतो? हे जाणणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
एड्स रोग म्हणजे काय? - एच. आय. व्ही. म्हणजे हयुमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ही एक अति सूक्ष्म अशी विषाणूची जात आहे. चेंडूच्या आकाराचे हे गोलाकार विषाणू सामान्य सूक्ष्मदर्शकात दिसून येत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी अधिक प्रभावी इलेक्ट्राॅन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. एच.आय.व्ही. विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ते प्रथमतः आपल्या शरीरात असणाऱ्या पांढऱ्या पेशींवर हल्ला करतात. पांढऱ्या पेशी हया विषाणूंविरूद्ध लढण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, पण ते विषाणू यशस्वी होऊ देत नाहीत. हया विषाणूंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे विषाणू स्वतःच्या बाहेरच्या आवरणांचे स्वरूप् सतत बदलतात तसेच त्यांच्या संख्येत खूप वाढ होते. तर दुसरीकडे विशाणूंषी लढून दमलेल्या पांढऱ्या पेशींची सतत घट होत राहते. परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण होते आणि आपले शरीर वेगवेगळया रोगांना बळी पडते. या अवस्थेलाच 'एड्स' असे म्हणतात. एच.आय.व्ही. विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराच्या शेवटचा टप्पा म्हणजे एड्स होय. विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ही शेवटची अवस्था केव्हा येईल हे व्यक्तिपरत्वे भिन्न असते.
एच.आय.व्ही.ची लागण कशामुळे होते? - १)असुरक्षित लैंगिक संबंधांतून, २)एच.आय.व्ही. ने दूषित, रक्तामधून ३) एच.आय.व्ही.बाधित मातेकडून तिच्या नवजात शिषूला.
एच.आय.व्ही. चा संसर्ग झाल्यानंतर हा विषाणू शरीराच्या सर्व स्त्रावांमध्ये असतो. पण दुसऱ्यांना लागण होईल अशा प्रमाणात हा विषाणू लैंगिक स्त्राव व रक्तात असतो.
एड्सच्या रूग्णाची लक्षणे - रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन खालील लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. १) वजनात घट, २)सतत जुलाब होणे, ३)ताप, ४)लांबलेला खोकला, न्युमोनिया, ५)गर्भाशयाचा कर्करोग, ६)फुफ्फुसांचा व इतर अवयवांचा क्षय. इत्यादी.
एच.आय.व्ही.ची निदान चाचण्या - अमूक अमूक व्यक्ती ही एच.आय.व्ही.ग्रस्त आहे म्हणण्यापूर्वी तीन प्रकारच्या चाचण्या करून घेणे आवश्यक ठरते १)एलिसा म्सपें २)जलद चाचण्या त्ंचपक ज्मेज ३)वेस्टर्न ब्लाॅक टेस्ट हया चाचण्या खात्रीदायक निदानासाठी आवश्यक आहेत.
एच.आय.व्ही. संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे - काही पथ्य, नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकापेक्षा अनेक व्यक्तींशी शरीरसंबंध टाळावेत. संभोगाच्या वेळी निरोधचा वापर जरूर करावा, निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर टाळा. शिरेद्वारे मादकद्रव्यांचे सेवन टाळावे.
एच.आय.व्ही.ग्रस्त रूग्णावर उपचार - एच.आय.व्ही. ग्रस्त रूग्णावर प्रामुख्याने दोन प्रकारे उपचार केले जातात:- 1) विशाणूंची वाढ रोखायची व नियंत्रित करायची. 2) एच.आय.व्ही. मुळे उद्भवणाÚया संधिसाधू आजारांवर औषधे व उपचार करायचे. केवळ उपचार करणे म्हणजे औशधे देणे एवढेच नाही तर एच.आय.व्ही. ग्रस्त रूग्णाशी कसे वागायचे ? त्याला मानसिक आधार कसा द्यायचा? इत्यादी गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. एडस् संपूर्णपणे बरा करता येत नाही पण नियंत्रित करता येतो.
एच.आय.व्ही. ग्रस्त रुग्णाशी वर्तणूक - एच.आय.व्ही.ची लागण झाल्यावर रूग्ण, मानसिकरित्या एकदम खचून जातो. त्याला एक प्रकारचा धक्काच बसतो. एच.आय.व्ही. बाधित रूग्णाला रोगाशी एकटयाने सामना करणे सोपे नसते. त्याला समजून घेतले पाहिजे व त्याच्याशी योग्य अशी वर्तणूक घरातील मंडळींनी, समाजाने ठेवली पाहिजे. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला पोषक व चौरस आहार दिला पाहिजे. जेवणात मोड आलेली कडधान्ये व पालेभाज्या यांचा वापर केला गेला पाहिजे. अशा व्यक्तीचे सर्व सामान स्वच्छ व व्यवस्थित ठेवले पाहिजे. त्या व्यक्तीचा जीवनाविषयक दृष्टिकोन चांगला व सकारात्मक राहावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केलेे पाहिजेत. एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती पुरूष असला तर त्याला एकवेळ त्याच्या कुटुंबियांकडून आधार मिळू शकतो पण अनेकदा एच.आय.व्ही. ग्रस्त महिलेला मात्र कुटुंबापासून वंचित केले जाते, हे दुर्देवी असे आहे. म्हणून एच.आय.व्ही. ग्रस्त व्यक्ती कोणीही असो. स्त्री, पुरूष किंवा लहान मूल सर्वांनाच प्रेमळपणे वागविले पाहिजे.
एडस् हा रोग एकत्र राहण्याने किंवा एकत्र जेवल्याने किंवा शिंका, खोकल्याने बिलकूल पसरत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. दुर्देवाने ज्याला हा रोग झाला आहे त्याला बहिष्कृत करू नका, त्याला वाळीत टाकू नका. त्याच्या संसर्गाने, सानिध्याने किंवा त्याच्याबरोबर एकत्र जेवल्याने हा रोग होत नाही. तसेच सार्वजनिक शौचालये व स्नानगृहांचा वापर कल्यानेही होत नाही. एच.आय.व्ही. ची लागण पाण्यातून, हवेतून, डास, ढेकूण किंवा एखादा किटक एच.आय.व्ही. बाधित रूग्णास चावून आला व तो आपल्याला चावला तरी आपल्याला हा रोग होणार नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. दुर्देवाने ज्याला हा रोग झाला आहे त्याला बहिष्कृत करू नका, परंतु या बाधित रूग्णाला तुमची गरज आहे. त्याला धीर द्या. आपण त्याला दिलेला विश्वासच त्याचे आयुष्य सुसहय करायला मदत करणार आहे.
मी स्वतः एच.आय.व्ही./एड्स बाधित रूग्णांबरोबर बसून एका डब्यातील जेवण खाल्ले आहे, ज्यामुळे मला आजही काहीही झाले नाही.
Photo : google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.