हिंदू संस्कृतीत दैवत एक असले तरी त्याची जागृतस्थाने अनेक ठिकाणी असतात. आपल्या खंडेरायाचीदेखील महाराष्ट्रात ८ आणि कर्नाटकात ३ अशी १९ जागृत स्थाने आहेत. नाशिक ते जेजुरी एवढ्या पट्ट्यातच खंडेरायाची जवळपास ११०० मंदिरे आहेत. एकट्या दख्खनचे पठार म्हणतात त्यात खंडोबारायाची ६०० मंदिरे आह्हेत. असे असले तरी खालील १९ देवस्थानांचे महत्त्व हे भक्तांसाठी वेगळेच आहे. विशेष म्हणजे खंडोबारायांची ही मंदिरे जेजुरीच्या किल्लेवजा मंदिरासारखीच आहेत.
१. या ११ देवस्थानांपैकी ज्याला आदिस्थान म्हणतात ते जेजुरी येथे आहे. ते पुण्यापासून ४८ किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे येथे खंडोबारायाची २ मंदिरे आहेत. त्यातील चढून जाण्यास जे अत्यंत अवघड आहे त्या मंदिराला कडेपठार म्हणतात. तर दुसऱ्या मंदिराला गडकोट म्हणतात. या मंदिरात जाण्यासाठी ४५० पायऱ्या असून १८ कमानी आहेत. ३५० दीपमाळा आहेत. त्यामुळे गडकोट मंदिरांतील मूर्तीचे दर्शन घेणे भक्तांना सुलभ ठरते. परंतु ज्यांनी कडेपठारच्याच मंदिरातील खंडोबारायाचे दर्शन घेण्याचा नवस केलेला असतो अथवा त्यांना तिथेच नवस फेडायचा असतो असे भक्त मात्र कितीही कष्ट सोसावे लागले तरी कडेपठारच्याच मंदिरात जाऊन दर्शन घेतात व नवसपूर्ती करतात.
२. सातारा जिल्ह्यातील राजापूर अथवा पाली किंवा पालीपेंबर येथे खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.
३. अहमदनगर जिल्ह्यातील शेंगुड गावी.
४. औरंगाबाद जिल्ह्यातील सातारे.
५. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी
६. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गण.
७. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील देवगड
८. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुकयातील चंदनापुरी. अशी ही ८ जागृत देवस्थाने आहेत.
कर्नाटकातील, देवस्थाने
१. बिदर जिल्ह्यातील खानापूर किंवा मइलकारपूर अथवा आदिमैईलार
२. धारवाड जिल्ह्यातल्या मइलारालिंगा येथे
३. बेळगाव जिल्ह्यात मंगासुली येथे आणि धारवाड जिल्ह्यातील देवरगौडा येथे मइलारा मंदिर आहे.
खंडोबा हे अपत्यप्राप्तीच्या नवसाला पावणारे दैवत आहे. अशी आख्यायिका आहे. जे विवाहानंतर त्याच्या दर्शनाला जातात त्यांना ते संतती देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे येथे येणारे भक्त सांगतात. त्यामुळेच खंडोबा महाराजांच्या भक्तांच्या घरात विवाह झाल्या-झाल्या नवीन जोडप्याने जेजुरीला दर्शनाला जाण्याचा रिवाज आजही पाळला जातो. दैत्यांचा वध करण्यासाठी खंडेराय महाराजांनी भगवान शंकराकडे खड्गाची मागणी केली होती, ते खड्ग सदैव त्यांच्या हाती असते. त्यामुळेच ज्या समाजाचा संबंध शस्त्राशी आहे अशा समाजाचेही ते कुलदैवत आहे.
खंडोबारायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे देवत्व हे एकात्मतेचे प्रतीक आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजापासून ते बहुजन समाजातील बहुतांश घरांमध्ये आज चंपाषष्टीचा कुळधर्म केला जातो. खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी या काळात साजरे होते. या सष्टीला चंपाषष्टी असे म्हणतात. आता हे नवरात्र याच काळात साजरे करतात. कारण खंडोबारायांनी मणी-मल्ल या दैत्यांविरुद्धचे युद्ध प्रतिप्रदेला सुरू केले आणि चंपाषष्टीला या दैत्यांचा वध करून विजय प्राप्त केला त्या विजयाचे प्रतीक म्हणून हे षडरात्र साजरे होते. अनेक जागृत देवस्थानांच्या ठिकाणी उत्सवाची परंपरा वेगवेगळी आढळून येते. पेंबर येथील खंडोबाच्या देवस्थानी यात्रा आणि उत्सवाचा प्रारंभ चंपाषष्टीला होतो तो पौर्णिमेपर्यंत चालतो. जेजुरी येथे सोमवती अमावस्येला खंडोबारायांचा पालखी उत्सव असतो. यावेळी खंडोबा महाराज आणि म्हाळसामाता यांच्या प्रतिमा गडकोट मंदिरातून पालखीतून मिरवत नेल्या जातात आणि कऱ्हेच्या पाण्यात त्यांना मंगलस्नान घातले जाते. नंतर पुन्हा मिरवत मंदिरात आणले जाते. पालीपेंबर येथे दरवर्षी खंडोबाराय आणि म्हाळसामाता यांचा विवाहसोहळा होतो. कर्नाटकात खंडोबा हे मईलारा नावाने पुजले जात असल्याने तिथे त्या नावाने उत्सव साजरा होतो. मलाईरायांचा उत्सव दसऱ्याला होतो, तो देवरगौडा येथे होतो.
तर तिथेच दुसरा उत्सव माघ एकादशील सुरू होतो. बेल्लारी जिल्ह्यातील मईलारा येथे माघ महिन्यात ११ दिवसांचा उत्सव होतो. या दोन्हीही उत्सवांच्या मागे खंडोबारायांनी मणी आणि मल्ल या दैत्यांवर मिळविलेल्या विजयाची पार्श्वभूमी आहे. चैत्रपौर्णिमा आणि सूर्यदेवतेचा असणारा रविवार हे दोन्ही दिवस खंडोबारायांची पूजा व नवसपूर्तीसाठी पुण्यप्रद समजले जातात. कर्नाटकातील मन्नमइलार किंवा मइलार येथे आणि आंध्र प्रदेशातील वरंगळ जिल्ह्यातील कोमाखाली येथेदेखील खंडोबारायाचे मंदिर आहे. खंडोबाच्या भक्तांसाठी जागरण-गोंधळ हा महत्त्वाचा विधी असतो. तो घरात कुळधर्म म्हणून तर नवसपूर्तीसाठी किंवा परिवारात झालेल्या बाळाच्या आगमनानंतर अथवा विवाहसोहळ्यानंतर केला जातो. जागरण अथवा गोंधळाचा विधी पारंपरिक गोंधळींद्वारेच केला जातो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.