Ticker

10/recent/ticker-posts

सफेद विषापासून सावध रहा

आहारात खारट आणि गोड पदार्थ जेवढे जास्त तेवढचं नुकसान जास्त


आपल्या रोजच्या आहारात मीठाचं महत्त्व खूप आहे. प्रत्येक वस्तूत अथवा मसाल्याबरोबर ते जेवणात टाकण्यात येते. मिठाशिवाय जेवण अळणी तर होतेच; शिवाय त्याची चवही लागत नाही. मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील अनिवार्य घटक आहेत. आपल्या जेवणात खारट किंवा गोड या दोन मुख्य चवी कुठलाही पदार्थ जर गोड नसला तर त्याला खारट चव म्हणजे त्यात मीठ असते. जरी पाककृतीत हा घटक महत्त्वाचा असला तरी शरीराला त्याची किती गरज आहे, हा वादाचा मुद्दा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, आपण ज्या प्रमाणात मीठ व साखरेचे सेवन करतो, इतक्या प्रमाणात त्याची गरज शरीराला नक्कीच नाही! पण, आपल्याला आता आपल्या जीभेवर ताबा ठेवायला पाहिजे. शरीराला जमेल तेवढाच खुराक खाण्याऐवजी आपण स्वाद व चव येण्यासाठी मीठ सेवन करतो. रोजच्या जेवणात, सॅलडवर आणि त्याबरोबरच्या लोणच्यातदेखील मीठ टाकून आपण सेवन करतो. याप्रकारे आपल्या शरीरात रोज किती मीठ जातेय याचा आपल्याला थांगपत्ताच नसतो. वैद्यकशास्त्र तर म्हणते की, मीठ आणि साखर हे दोन्हीही सफेद विषासारखेच आहे. मीठ अन्नाला फक्त चव देण्याचे काम करते. त्यात उर्जा नसते. चवीबरोबर मीठ सोडियम नावाचे रसायन आपल्या शरीराला पुरविते. याउलट साखरेतून फक्त उर्जा मिळते. उर्जेबरोबर दुसरे कुठलेही जीवनसत्त्व किंवा खनिज पदार्थ शरीराला मिळत नाहीत.


आधुनिक मेडिकल सायन्सच्या संषोधनातून एक गोष्ट स्पष्ट झालीय की, मीठाशिवाय देखील जीवन चांगल्या प्रकारे जगता येऊ शकते. मीठाचं जास्त प्रमाणात केलेले सेवन हे आरोग्यास हानीकारक असते. आहारात खारट आणि गोड पदार्थ जेवढे जास्त तेवढचं नुकसान जास्त. वेगवेगळया प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यातून शरीराला पाहिजे तेवढं मीठ मिळत असते. जर कुणी मीठ सेवन केलं नाही तरी त्यामुळे शरीरावर कुठलाही परिणाम होणार नाही. प्राचीनकाळातील गोष्ट वेगळीच होती. त्यावेळी शरीरशास्त्री आणि जीवरसायनशास्त्री यांचे म्हणणे होते की, शरीरात मीठाचं प्रमाण कमी झाल्याने शारीरिक क्रिया धीमी होते. त्यानुसार डाॅक्टर त्यांच्या रूग्णांना मीठ खाणं टाळायला सांगताना अडखळत असत. पण, आता परिस्थिती बदलत आहे. आता डाॅक्टर हार्ट अॅटॅक आणि ब्लड प्रेशरच्या रूग्णांना मीठाव्यतिरिक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यांना असा अनुभव देखील आहे की, सर्दी, खोकला आणि इतर सामान्य त्वचा रोगात मीठाचा त्याग केल्याने ते बरे होतात.


जेवणात चव आणण्यासाठी वापरण्यात येणारे मीठ म्हणजे रासायनिक दृश्टीने सोडियम क्लोराईड. त्यात कोणत्याही प्रकारचा पोषक असा गुण नाही. तो भांग आणि तंबाखुप्रमाणे विषारी पदार्थ असून नियमित अतिसेवन करण्याचं जणू आपल्याला व्यसनच जडलं आहे असे वाटत आहे. ज्याप्रमाणे दारूडयाला रोज दारूची नशा केल्याशिवाय  राहता येत नाही त्याप्रमाणेच बरेचजण मीठाशिवाय राहू शकत नाही. जर एकदम तुम्ही मीठ सोडू शकत नसाल तर आहारामध्ये क्रमशः उपयोग कमी-कमी करीत जा. लोणचं, पापड, वेफर, सॅलाडवर मीठ टाकून खाणे यांचं प्रमाण कमी करा. पहिल्या आठवडयात दोन दिवस, दुसऱ्या आठवडयात चार दिवस असे करून नंतर क्रमशः  एकदम बंद करा.


मीठात सद्गुणापेक्षा दुर्गुणच खुप आहेत. जगात कॅन्सर या रोगामुळे जेवढे लोक मृत्यू पावतात त्यापेक्षा कितीतरी जण ब्लडप्रेशरमुळे मृत्यू पावतात. कारण ब्लड प्रेशर वाढविण्यासाठी मीठाचे अति सेवनच जास्त कारणीभूत असते. मनुष्याच्या रक्तात सामान्यपणे ३० ग्रॅम मीठ असते. त्याबरोबरच शरीरातील अन्य जीवकोश तसेच शरीरात होणाऱ्या स्त्रावातदेखील क्षाराचे प्रमाण असते. हे सगळे मिळून अंदाजे ३०० ग्रॅम होते. यावरून एक गोष्ट  स्पष्ट होते की, मिठाशिवाय घेतलेले भोजन देखील रोजच्या जीवनक्रमासाठी सुखद असे आहे. खरेतर बऱ्याच वेळापासून शरीर थकलं असेल तर मीठाचं पाणी पिल्यावर शरीराने गमावलेली तंदुरूस्ती परत मिळते. हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर सलाईनची बाटली चढवितात तेदेखील याकारणासाठीच. परंतु, हृदयाच्या किंवा पचनक्रियेचा रोग असेल तर त्यासाठी मीठ एकप्रकारे विषासमान आहे. मीठ न खाणाऱ्यांपेक्षा मीठ खाणाऱ्यांचे ब्लड प्रेशर जवळजवळ तीनपट जास्त असते. औशधे घेणाऱ्यांसाठी किंवा उपवासासाठीही मीठ मोठया प्रमाणात वापरण्यात येते.


कधीकधी  आपल्या शरीराला बऱ्याच प्रकारच्या क्षारांची गरज असते त्याच्या पूर्ततेसाठी आहारात मीठाची काही प्रमाणात मात्रा असणे गरजेचे आहे. परंतु, ते वनस्पती वर्गातून मिळायला हवे. प्रत्येक वनस्पतीमध्ये क्षारांचे प्रमाण असते. पण, ते खनिज मिठाप्रमाणे खारट नसते. फ्रूट सोल्ट खारं नाही पण कडवट असते. विटामिन हेदेखील एक प्रकारचे क्षारच आहे. गांधीजी सुद्धा त्यांच्या आश्रमात स्वादरहित आहाराचाच आग्रह धरीत असत. साध्या कोहळयाच्या भाजीतही ते मीठ टाकू देत नव्हते. मीठाला तिलांजली म्हणजे ब्लडप्रेशर आणि हार्टअटॅकला तिलांजली.




 


                                        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या